(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुख्यमंत्र्यांकडून शरयू नदीवर महाआरती तर नाशिकमध्ये गोदावरी तीरावर गंगा आरती
Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्येतील शरयू नदीवर महाआरती केली.
Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्येतील शरयू नदीवर महाआरती केली. या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात गोदावरी नदीच्या तीरावर गंगा आरती करण्यात आली. नाशिक शिवसेना शिंदे गटाकडून रामकुंडावर ही महाआरती करण्यात आली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज अयोध्या दौऱ्यावर असून अयोध्या दौऱ्यात जोरदार शक्तीपदर्शन केले. आज दिवसभरात निर्माणाधीन अयोध्येतील राम मंदिराची पाहणी केल्यानंतर सायंकाळी शरयू नदीच्या तीरावर आरती केली. याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या काठावर मुख्यमंत्री एकनाथ यांच्या पक्षाकडून गंगा गोदावरी ची आरती करण्यात आली. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपले आमदार खासदार आणि काही पक्षातील पदाधिकाऱ्यांचं आयोध्येला रामललाच्या दर्शनासाठी गेले असून त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शरयू नदीची आरती करण्यात आली.
याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये देखील अयोध्येला न गेलेल्या पदाधिकाऱ्यांच्या व्यतिरिक्त पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी गंगा गोदावरी नदीची आरती केली. यावेळी विधिवत पूजा विधी करून पाण्यात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी संकल्प सोडला आहे.
गोदावरी नदीच्या तीरावर वसलेल्या नाशिक शहर हे धार्मिक नगरी म्हणून ओळखले जाते. त्यामुळे शरयू नदीप्रमाणे नाशिकच्या गोदावरी नदीला महत्व आहे. त्यामुळे एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्या दौऱ्यात शक्ती प्रदर्शन करत असताना त्यांनी शरयू नदीवर महाआरती केली. त्याचबरोबर अयोध्येतील राम मंदिर परिसराची पाहणी करत अनेक मंदिरांना भेटी दिल्या. तर दुसरीकडे नाशिक शहरात गोदावरी नदीवर गंगा आरती करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून गोदावरी नदीवर आरती करण्यात येते. मात्र आजच्या विशेष दिवसाचे औचित्य साधत आरती करण्यात आल्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या गोदावरी नदीच्या तीरावर अतिशय भक्तिमय अशा वातावरणात शिंदे घाटातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून गंगा गोदावरी मातेची आरती करण्यात आली आहे.
गोदावरी नदीवर रोजच होणार आरती?
अयोध्या, वाराणसी आणि हरिद्वारच्या धर्तीवर नाशिकच्या गोदावरी नदीवर देखील रोज महाआरती होणार असल्याचे काही दिवसांपूर्वी सांगण्यात येत होते. यासाठी केंद्र सरकारकडून 5 कोटी रुपयांचा निधीही मंजूर झाला झाल्याचे सांगितले होते. मात्र अद्याप याबाबत अंमलबजावणी झाल्याचे चित्र नाही. महत्वाचे म्हणजे गोदावरीनदीचे पावित्र्य राखण्यासाठी नमामी गोदा प्रकल्प राबविण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर गंगा आरती करण्याचा विचार आहे. यासाठी निधी देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. अद्याप याबाबत अंमलबजावणी झाली नसल्याचे चित्र आहे.