"अल निनोच्या आव्हानात्मक काळात संधीत रूपांतर करू अन् पुढील पावसात थेंब न थेंब आपण साचवू" : देवेंद्र फडणवीस
Nashik News : 2023-24 या अल निनोच्या आव्हानात्मक काळात संधीत रूपांतर करू आणि पुढील पावसात थेंब न थेंब आपण साचवू, ज्यामुळे पुढे शेतकऱ्यांना मदत होईल, असे वक्तव्य de
Devendra Fadnavis नाशिक : 67 लाख टँकर आपण भरू शकतो एवढं काम झालं आहे. हे अल निनोचे (El Nino) वर्ष आहे, अडचण येणारच, पाणी कमी आहे आणि हे एक मोठं आव्हान आहे. 2023-24 या अल निनोच्या आव्हानात्मक काळात संधीत रूपांतर करू आणि पुढील पावसात थेंब न थेंब आपण साचवू, ज्यामुळे पुढे शेतकऱ्यांना मदत होईल, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नाशिकमध्ये केले.
जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन टप्पा 2 अंतर्गत जलरथ उद्घाटन सोहळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते नाशिकच्या कॉलेज रोडवरील गुरुदक्षिणा हॉल येथे पार पडला. यावेळी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan), पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse), मंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते.
700 कोटींचा जनसहभाग लाभला
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज मला अतिशय आनंद आहे की, संपूर्ण महाराष्ट्रात आपले जलरथ जाणार आहे आणि याची सुरुवात नाशिकमधून होत आहे. आज मोठ्या पाणी टंचाईतून आपल्याला सामोरे जावे लागते आहे. आज कितीही खोल बोरवेल गेले तरी पाणी लागत नाही. जलसंधारणाला आपण महत्व दिले नाही. अर्ध्या महाराष्ट्रात जलसंधारणाशिवाय आपण काम करू शकत नाही. जलयुक्त शिवारच्या पहिल्या टप्प्यात खूप मोठं काम आपण केलं. पाण्याचे सायन्स लोकांना समजले. 700 कोटींचा जनसहभाग आपल्याला लाभला, असे फडणवीस यांनी म्हटले आझे.
अखेर आपली योजना यशस्वी
ज्यावेळेस औरंगाबाद खंडपीठात एक याचिका झाली. जलयुक्त शिवार चुकीचा आहे असे म्हणत इतर आरोप करण्यात आले होते. त्यानंतर एक समिती तयार करण्यात आली होती. त्या समितीने मराठवाडा दौरा करून भूजल परिस्थितीची गणना केली आणि त्या अहवालात अभूतपूर्व पाणीवाढ झाल्याचे सांगितले. अखेर आपली योजना यशस्वी असल्याचे समोर आले आहे.
बुलढाण्यात याआधी दुष्काळ पडायचा आता बागायती शेती
बुलढाण्यात याआधी दुष्काळ पडायचा तिथे आता बागायती शेती आहे. यासाठी बीजीएस, नाम तसेच रविशंकरजी यांचे विशेष योगदान आहे. अमीर खानच्या पाणी फाउंडेशनने स्पर्धा सुरू केली आणि पाण्याबाबत खूप मोठे काम झाले आहे. हे खरं आहे की सरकार गेल्यानंतर चौकशी लावण्यात आल्या पण काहीच झाले नाही, असेही ते यावेळी म्हणाले.
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करता येईल
67 लाख टँकर आपण भरू शकतो एवढं काम झालं आहे. हे अल निनोचे वर्ष आहे, अडचण येणारच, पाणी कमी आहे आणि हे एक मोठं आव्हान आहे. यावर्षी 24 हजार गावांमध्ये आपण काम करणार आहोत. गाळमुक्त आणि इतर कामे आपण करणार आहोत. 3.2 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. 267 लाख टँकर इतका पाणीसाठा आपण तयार करणार आहेत. 2023-24 या अल निनोच्या आव्हानात्मक काळात संधीत रूपांतर करू आणि पुढील पावसात थेंब न थेंब आपण साचवू, ज्यामुळे पुढे शेतकऱ्यांना मदत होईल. या स्ट्रक्चरमुळे पुढे महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करता येईल, असे ते म्हणाले.
...तर पुढे खूप फायदा होईल
पाऊस कमी पडला तर काय? विहिरींचा पुनर्भरणा केला तर पुढे खूप फायदा होईल. जलजीवन मिशनला जलसंधारणची साथ मिळणे गरजेचे आहे. नाशिक जिल्ह्यात 40 टक्के पाऊस कमी पडला पण हे आव्हान स्वीकारून पुढे जावं लागेल, सर्व जिल्ह्यात काम करू. जलरथ अभियान यशस्वी करूयात, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा