नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी इगतपुरीचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) यांचा उल्लेख करून ते राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य केले होते. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलेले असतानाच आमदार हिरामण खोसकर हे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या भेटीला भुजबळ फार्म (Bhujbal Farm) येथे दाखल झाले आहेत. त्यामुळे ते आता महायुतीत (Mahayuti) प्रवेश करणार का? याची चर्चा रंगत आहे.

  
 
हिरामण खोसकर हे महायुतीत येणार अशा चर्चा मागील काळापासून रंगल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात भाषणादरम्यान अजित पवारांनी खोसकरांचे नाव घेतले होते. आता हिरामण खोसकर आणि छगन भुजबळ यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


हिरामण खोसकर महायुतीत जाणार? 


तुम्ही महायुतीत जाणार का? अशी विचारणा हिरामण खोसकर यांना केली असता त्यांनी या प्रश्नावर मिश्किल टिप्पणी केली आहे. 20 पैकी 19 जण महायुतीत आहेत. पण मी एकटाच महाविकास आघाडीत आहे, असे त्यांनी म्हटले. छगन भुजबळ हे मंत्री असल्याने त्यांनी भेट घेतल्याची प्रतिक्रिया हिरामण खोसकर यांनी दिली आहे. आता ते खरंच महायुतीत प्रवेश करणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


अजितदादांकडून हिरामण खोसकरांच्या नावाचा उल्लेख


दरम्यान, नुकतीच लोकसभेची निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत नाशिकच्या राजकारणाची चर्चा संपूर्ण राज्यभरात झाली. लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) आता विधानसभा निवडणुकीची (Vidhan Sabha Election) चर्चा रंगू लागली आहे. त्यातच इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर यांची भूमिका नक्की कुठल्या पक्षाकडे यावरून वादाची ठिणगी पडताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खोसकर यांच्या नावाचा उल्लेख केला. नाशिक लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला हवी होती, तसे नियोजन देखील झाले होते. आपले आमदार माणिकराव कोकाटे, सरोज अहिरे यांचे नाव घेताना हिरामण खोसकर यांचाही उल्लेख राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून अजित पवारांनी केला. यामुळे हिरामण खोसकर यांचे नाव चर्चेत आले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Anjali Damania : मी सिद्धांतावर जगते, माझ्यावर थर्ड ग्रेड स्टेटमेंट करणाऱ्या चव्हाणला समज द्या; अंजली दमानिया अजितदादांवर भडकल्या


भाजपाच आमचा बिग ब्रदर, त्यांनाच जास्त जागा मिळणार, विधानसभा जागावाटपाच्या वक्तव्यावर छगन भुजबळांचा यू टर्न