पुणे : मी कोण आहे आणि किती सिद्धांतावर जगते हे अजित पवारांपेक्षा जास्त कुणाला माहिती नसेल, त्यामुळे माझ्यावर थर्ड ग्रेड स्टेटमेंट करणाऱ्या सूरज चव्हाणला त्यांनी समज द्यावी असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी दिला. अंजली दमानिया म्हणजे रीचार्जवर काम करणारी बाई अशी टीका अजित पवारांच्या युवक राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाणांची केली होती. त्यानंतर अंजली दमानिया यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसतंय.
पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी उपमुख्यंमत्री अजित पवार यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली होती. अजितदादांना बोलायला 4 दिवस का लागले असा सवालही त्यांनी केला होता. त्यांतर सूरज चव्हाण यांनी त्यांच्यावर टीका केली होती.
काय म्हणाले होते सूरज चव्हाण?
सूरज चव्हाण हे अंजली दमानिया यांच्यावर टीका करताना म्हणाले होते की, अंजली दमानिया यांच्यावर मी टीका केली होती. कारण सातत्यानं अजित पवार यांची नार्कोटेस्ट करण्याची मागणी केली होती. आमच्यावर आरोप करणाऱ्या व्यक्तीची नार्को टेस्ट व्हायला हवी. मागील एक महिन्याचे त्यांचे कॉल डिटेल्स चेक करायला हवं कारण त्या राजकीय पक्षाचा सुपाऱ्या घेउन बदनाम करत आहे.
काय म्हणाल्या अंजली दमानिया?
अजित पवार, आज प्रचंड राग आला आहे. तुमच्या पक्षातले सूरज चव्हाण इतक्या खालच्या पातळीचे स्टेटमेंट करतात ? आज मला त्या सूरज चव्हाणने “रीचार्जवर काम करणारी बाई” म्हटले? मला? मी काय आहे, आणि किती सिधांतांवर जगते हे तुमच्यापेक्षा चांगलेच कोणालाच माहीत नसेल. ते तुम्ही त्यांना सांगा, मग त्यांच्या डोक्यात प्रकाश पडेल. सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबरोबर ही भाषा? का? त्यांना राजकारणाबद्दल बोलू नये म्हणून? सध्या मर्यादा न पळणाऱ्या असल्या लोकांना तुम्ही असे बोलण्याची मुभा देता?
मला यावर तुमची ताबडतोब प्रतिक्रिया आणि त्यांचाकडून लिखित स्वरुपात माफी हवी आहे. असले थर्ड ग्रेड स्टेटमेंट्स आणि त्यांची मेंटालिटी त्यांनी त्यांच्या खिश्यात ठेवावी. मला इतर महिला राजकारण्यांची प्रतिक्रिया पण हवी आहे. कारण असली थर्ड ग्रेड भाषा राजकारणात पूर्ण पणे थांबलीच पाहिजे.
पोलिसांवर अजित पवारांचा दबाब, दमानिया यांचा आरोप
पुण्यामधील भीषण अपघाताप्रकरणी चार दिवस उलटूनही पालकमंत्री असलेले अजित पवार यांनी चुप्पी साधली होती. याबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सवाल उपस्थित करत अजित पवार यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे. या संपूर्ण प्रकरणात ससून रूग्णालय, डॅाक्टर , पोलीस यंत्रणा यांच्यावर अजित पवार यांचा दबाव आहे. त्यांच्या फोनमुळेच सर्व यंत्रणा हतबल झाली असल्याने त्यांच्या फोनची सुद्धा तांत्रीक तपासणी करावी अशी मागणी केली आहे. पुण्यामध्ये अग्रवाल यांचे असलेले व्यावसाय आणि त्याबाबत अजित पवार यांचे काय संबंध आहेत याची माहिती घेत असून पुढील दोन तीन दिवसात आपण ते समोर आणू असे अंजली दमानिया यांनी स्पष्ट केले आहे.
ही बातमी वाचा: