मुंबई : राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) 80-90 जागा देण्याचा भाजपचा (BJP) शब्द आहे. अजित दादा लोकसभेसारखी विधानसभेला खटपट होता कामा नये. आपल्या हक्काचा वाटा आपल्याला मिळाला पाहिजे, असे म्हणत मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी मेळाव्यात भाषण करताना परखड भूमिका मांडली होती. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महायुतीत (Mahayuti) भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे.  त्यामुळे, निश्चितच सर्वात जास्त जागा भाजपला मिळतील. तसेच, इतर सहकारी पक्षांना किती जागा द्यायच्या ते आम्ही एकत्र बसून ठरवू, असे उत्तर दिल्याने लोकसभेच्या निवडणुकांचा निकाल लागण्यापूर्वीच विधानसभेच्या जागावाटपावरुन महायुतीत खलबत सुरु असल्याचे दिसून आले. आता यावर छगन भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 


छगन भुजबळ म्हणाले की, राजकीय वाद करणे योग्य नाही. माझ्या पक्षाची बैठक सुरू होती. त्यामध्ये आम्ही काय बोलावं हा आमचा प्रश्न आहे. आम्ही महायुतीमध्ये येणार होतो. त्यावेळी आम्हाला खासदारकी आणि आमदारकीच्या जागा सांगितल्या होत्या. त्यावेळी जी चर्चा झाली त्याची आठवण मी करून दिली आणि त्याची काळजी घ्या असं मी सांगितलं. बाकी काही नाही. 


भाजप आमचा मोठा भाऊ : छगन भुजबळ 


महायुतीला वाईट वाटायचं काही कारण नाही. आता चर्चा करून संपवून टाकलं तर बरं होईल. आता देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. भाजप आमचा मोठा भाऊ आहे. त्यामुळं त्यांना जास्त जागा मिळणार आहेत. बाकी दोन पक्षांना चांगल्या जागा मिळतील, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. 


सगळ्यांनी मनुस्मृतीला विरोध केला : छगन भुजबळ


दरम्यान, शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा सहभाग करण्यावर सध्या चर्चा सुरु आहे. मात्र छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी यावर विरोध दर्शवला. यावर भुजबळ म्हणाले की, मनुस्मृती बाबत मी बोललो आहे. यामुळे काही जनसमुदाय दुखावले जातात. 400 पार नारा दिला त्यामुळं एका समजाजला वाटलं हे संविधान बदलणार आहे. सगळ्यांनी मनुस्मृतीला विरोध केला आहे. त्या बाबत मी बोललो. शिव,शाहू, फुले, आंबेडकर ही आमची विचारधारा आहे, असे ते यावेळी म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Vidhan Parishad Election 2024: काल विधानसभेच्या 80-90 जागा मागितल्या, आज विधानपरिषदेसाठी दंड थोपटले; भुजबळ म्हणतात, शिक्षक मतदारसंघात आपण लढलंच पाहिजे


Nilesh Rane: छगन भुजबळांना आवरा, वयाचा आदर करतो, पण उठसूट काहीही बोललेलं सहन करणार नाही, भाजप नेत्यांचा इशारा