Chhagan Bhujbal on Manoj Jarange Patil : 'जरांगेंचा अभ्यास कमी, मुस्लिम समाजाला 25 वर्षांपूर्वीच ओबीसीतून आरक्षण'; छगन भुजबळांनी डिवचलं
Chhagan Bhujbal on Manoj Jarange Patil : जरांगेंचा अभ्यास कमी आहे. त्यांनी आधी अभ्यास करावा. मुस्लिम समाजाला 25 वर्षांपूर्वीच ओबीसीतून आरक्षण दिले आहे, अशी टीका छगन भुजबळ यांनी केली आहे.
Chhagan Bhujbal on Manoj Jarange Patil : जरांगेंचा अभ्यास कमी आहे. त्यांनी आधी अभ्यास करावा. मुस्लिम समाजाला (Muslim Community) 25 वर्षांपूर्वीच ओबीसीतून आरक्षण (OBC Reservation) दिले आहे, अशी टीका राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर केली आहे. नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
राज्यात काही ठिकाणी मुस्लीम समाजाच्याही कुणबी म्हणून नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे आता मुस्लिमांनाही ओबीसी (OBC) प्रवर्गातून आरक्षण द्यावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केली होती. यावरून मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेंवर निशाणा साधला आहे.
कधी मुस्लिमांना तर कधी धनगरांना खुश करण्यासाठी ते मागण्या करताय
छगन भुजबळ म्हणाले की, मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे, अशी मागणी कोण करताय, जरांगे करताय, त्यांचा अभ्यास कमी आहे. त्यांना म्हणावं आधी अभ्यास करा. मुस्लिम समाजाला 25 वर्षापूर्वीच ओबीसीतून आरक्षण दिले आहे. कधी मुस्लिमांना तर कधी धनगर समाजाला खुश करण्यासाठी ते मागण्या करत असल्याची टीका त्यांनी यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केली आहे.
अजून दमडीही मिळाली नाही
महायुतीच्या (Mahayuti) आमदारांना भरघोस निधी मिळणार असल्याची चर्चा आहे. यावर छगन भुजबळ म्हणाले की, निधी वाटपचे दान काय अजून दमडी मिळाली नाही. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) आचारसंहितामुळे सर्व कामे राज्यभरात बंद आहेत. शिक्षक निवडणुकीमुळे पुन्हा आचारसंहिता सुरू आहे. म्हणून कामे रखडली आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
शिक्षकांकडून हे अपेक्षित नाही
नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी (Nashik Teachers Constituency Election 2024) महिला मतदारांना नथ आणि पुरुष मतदारांना कपडे वाटत असल्याचा दावा शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी केला. यावर छगन भुजबळ म्हणाले की, शिक्षकांना नथ, पैठणी वाटप होते हे वर्तमानपत्रातून कळले असे होत असेल तर शिक्षकांकडून हे अपेक्षित नाही. मागील निवडणुकीतही वाटप झाले होते. पण, ते कोणी घातलं नव्हते. ही फसवेगिरी आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करा, अन्यथा विधानसभेला गुलाल रुसेल, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा