एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal : देवेंद्र फडणवीस, पृथ्वीराज चव्हाण यांच्याही विमानाला अपघात झाला होता, पण असं झालं नव्हतं : छगन भुजबळ

Chhagan Bhujbal On Ajit Pawar : अजितदादा आयुष्यभर फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराने चालले. त्यांनी दाखवलेल्या मार्गानेच पुढे जाणार असल्याचं मंत्री छगन भुजबळांनी म्हटलं. 

नाशिक : आजवर अनेक नेते विमान अपघातामध्ये गेले, पण अजितदादांच्या अपघाताच्या रुपाने महाराष्ट्रावर सर्वात मोठा आघात झाला, त्यांची उणीव भरून काढणं शक्य नाही अशी भावनिक प्रतिक्रिया राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)  यांनी दिली. देवेंद्र फडणवीस आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्याही विमानाला अपघात झाला होता, पण असं कधी झालं नव्हतं असंही भुजबळ म्हणाले. 

काहीतरी गडबड आहे

अजित पवारांच्या विमान अपघातावर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ म्हणाले की, "अजितदादांचा अपघात झाल्यावर मी स्वतः घटनास्थळी गेलो, टेबल टॉप जागा होती. ते विमान तिथे गेले कसे हा प्रश्न आहे. ते विमान घिरट्या घालत होते. काहीतरी गडबड आहे. रडार खराब झाले असावे किंवा इंजिनमध्ये बिघाड झाली असेल. याची चौकशी होईल, सत्य बाहेर येईल. पण ही सोन्यासारख्या माणसे गेली त्याचे काय?"

छगन भुजबळ म्हणाले की, "दादांनी आयुष्यभर त्रास सहन केला. लहानपणी वडील गेले. पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलं. पवार साहेबांमुळे त्यांना कामाचा अनुभव मिळाला. दादा सकाळी 6 वाजल्यापासून काम करायचे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आम्ही एकत्रित काम केले. मागे एकदा सरकारची भूमिका नरमाईची वाटली. मी शिंदे मुख्यमंत्री असताना राजीनामा दिला, तेव्हा दादा बोलले कशाला राजीनामा देतात. तुम्हाला भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. अजितदादा आयुष्यभर फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराने चालले. नाशिकवर दादांचे प्रेम होते. ते गेल्यानंतर काही गोष्टी दुःख देणाऱ्या आहेत."

आम्हाला जे योग्य वाटले ते आम्ही केलं

छगन भुजबळ म्हणाले की, "पक्षासंबंधी सुनेत्रा ताईंना विचारले, त्याची संमती घेतली आणि एक मताने निर्णय घेतला. आमच्यापुढे दुसरे नाव नव्हते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना सुनेत्रा पवार यांचे नाव दिले. शपथविधीचा निर्णय लवकर झाला की उशिरा झाला यापेक्षा, योग्य निर्णय आहे की अयोग्य हे सागा. आता जे चर्चा करत होते त्यांनी सांगावे, यावर काय करायला हवं होतं? आम्हाला जे योग्य वाटले ते आम्ही केले."

दादांच्या मार्गाने आम्ही चालणार, दादांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गाने जाणार. दादांचं काम थांबणार नाही , त्यांची अपूर्ण कामं पूर्ण करू असा विश्वास छगन भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केला. 

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: कंट्रोल रूमला डायल 112 वर आला फोन, पोलिसांची एकच धावपळ; घटनास्थळी पोहोचताच संपूर्ण यंत्रणा चक्रावली, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
कंट्रोल रूमला डायल 112 वर आला फोन, पोलिसांची एकच धावपळ; घटनास्थळी पोहोचताच संपूर्ण यंत्रणा चक्रावली, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
Nashik Land Scam : शेतकऱ्याने पूर्ण कर्ज फेडले, तरीही बँकेने जमीन परस्पर विकली; पोलिसांनीही माणुसकी सोडली, जबरदस्तीने जमिनीचा ताबा
शेतकऱ्याने पूर्ण कर्ज फेडले, तरीही बँकेने जमीन परस्पर विकली; पोलिसांनीही माणुसकी सोडली, जबरदस्तीने जमिनीचा ताबा
Chandrashekhar Bawankule: नाशिकच्या खड्ड्यांच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, याची त्याची जबाबदारी करण्यापेक्षा....
नाशिकच्या खड्ड्यांच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, याची-त्याची जबाबदारी करण्यापेक्षा....
Nashik Potholes: 'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं
'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget