Shivsena UBT: नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का; चार दिवसांपूर्वी प्रमोशन दिलेला पदाधिकारी भाजपच्या गोटात? नगरसेवकांनीही सोडली साथ

Shivsena UBT: नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाला ऐन महानगरपालिकेच्या तोंडावर मोठा धक्का बसणार असल्याचं दिसून येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून विधानसभा निवडणूक लढलेले गणेश गीते आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

Continues below advertisement

नाशिक: राज्यात राजकीय घडामोडींना वेग आल्याचं दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून नेत्यांचं मोठ्या प्रमाणावर पक्षांतर सुरू असल्याचं दिसून येत आहे. काल (बुधवारी, ता 3) अनेक नेत्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. त्यानंतर आज देखील नाशिकमधील शिवसेना ठाकरे गटाचे अनेक नगरसेवक भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाला ऐन महानगरपालिकेच्या तोंडावर मोठा धक्का बसणार असल्याचं दिसून येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून विधानसभा निवडणूक लढलेले गणेश गीते आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. गणेश गीते यांच्यासोबत ठाकरे गटाच्या नगरसेविका सीमा ताजने, नगरसेवक प्रशांत दिवे, नगरसेवक कमलेश बोडके हे देखील भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत.

Continues below advertisement

त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागुल आणि त्यांचे चिरंजीव सुनील बागुल यांचाही आज भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार आहे. सुनील बागुल यांच्याविरोधात दोन दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये मारहाणीचा गुन्हा झाला होता. शिवसेना ठाकरे गटाचे महानगर प्रमुख मामा राजवाडे हे देखील भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. चार दिवसांपूर्वीच राजवाडे यांना शिवसेना ठाकरे गटाने महानगर प्रमुख पद दिले होते. आज सकाळी 10:30 ते 11 वाजता मुंबई प्रदेश कार्यालयात या नेत्यांचे पक्षप्रवेश होणार आहेत. सुनील बागुल यांच्या प्रवेशाने ठाकरे सेनेला मोठा धक्का बसणार आहे. तर गणेश गीते यांच्या घरवपासनीने भाजपच बळ आणखी वाढणार आहे.

कोणकोणत्या नेत्यांचे प्रवेश होणार?

राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून विधानसभा निवडणूक लढलेले गणेश गीते आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. गणेश गीते यांच्यासोबत ठाकरे गटाच्या नगरसेविका सीमा ताजने, नगरसेवक प्रशांत दिवे, नगरसेवक कमलेश बोडके हे देखील भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागुल आणि त्यांचे चिरंजीव सुनील बागुल यांचाही आज भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे महानगर प्रमुख मामा राजवाडे हे देखील भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. चार दिवसांपूर्वीच राजवाडे यांना शिवसेना ठाकरे गटाने महानगर प्रमुख पद दिले होते. नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलं आहे. आता डॅमेज कंट्रोलसाठी पक्षातील नेते कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

भाजपमध्ये जाणाऱ्यांबद्दल संजय राऊतांची पोस्ट

आजच्या नाशिकमधील नगरसेवकांच्या भाजप प्रवेशाआधी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सोशल मिडीयावरती पोस्ट करत हल्लाबोल केला आहे. " भारतीय जमवा जमव पार्टीची कमाल आहे: नाशिकमध्ये शिवसेना पदाधीकारायांवर आधी खोटे गुन्हे दाखल केले. हे सर्व पदाधिकारी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात गेले. पोलिस अटक करतील म्हणून हे सगळे जण फरार झाले…क्लायमॅक्स असा की:: हे सगळे फरार ( भाजपासाठी गुन्हेगार) आज भाजपात प्रवेश करत आहेत! जमवा जमव पार्टी ने महाराष्ट्राची वाट लावली आहे, सत्ता पैसा दहशत! दुसरे काही नाही!", अशा शब्दात राऊत यांनी पक्षप्रवेशावर टीका केली आहे.

 

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola