Ramayana Star Yash: नितेश तिवारी (Nitesh Tiwari) यांच्या 'रामायण' (Ramayana Movie) सिनेमाची पहिली झलक पाहून चाहत्यांच्या मनात या सिनेमाबाबत खूपच उत्सुकता निर्माण झाली आहे. पौराणिक कथांवर आधारित मेगा बजेट प्रोजेक्टमध्ये रणबीर कपूर (Ranbir Kapoor) प्रभू श्रीरामांच्या (Shree Raam) भूमिकेत दिसणार आहे. तर साई पल्लवी (Sai Pallavi) सीता मातेची भूमिका साकारणार आहे. टीव्ही अभिनेता रवी दुबे लक्ष्मणाची भूमिका साकारणार आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की, रावणाची भूमिका कोण साकारणार? काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या'रामायण'ची पहिली झलक जगभरात चर्चेचा विषय ठरली. यामध्ये रावणही दिसला होता, 'रामायण'मध्ये रावणाची भूमिका साकारणारा अभिनेता कोण? असा प्रश्न सर्वांना पडलेला, काही वेळातच प्रेक्षकांच्या मनातलं हे कोडं सुटलं... 'रामायण'मध्ये रावणाची भूमिका दाक्षिणात्य सुपरस्टार यशनं (Southern Superstar Yash) साकारली आहे. त्यानंतर चर्चा रंगली यशनं रावणाच्या भूमिकेसाठी घेतलेल्या मानधनाची.
रॉकी भाई म्हणजेच, यश चित्रपटात लंकेचा राजा रावणाची भूमिका साकारत आहे. 'रामायण' दोन भागांत प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग 2026 च्या दिवाळीला आणि दुसरा 2027 च्या दिवाळीला येणार आहे. मिडिया रिपोर्टनुसार, पहिल्या भागात यशचा स्क्रीन टाईम फक्त 15 मिनिटं असेल, पण यासाठी तो 50 कोटी रुपये फी घेतो. या प्रकल्पातील सर्वात महागडा अभिनेता रणबीर कपूर आहे, जो भगवान रामाची भूमिका साकारण्यासाठी 150 कोटी रुपये घेत आहे. यश हा 100 कोटींच्या एकूण फीसह दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात महागडा स्टार आहे आणि त्याच्या फीमुळे चाहते थक्क झाले आहेत.
कधी 300 रुपये घेऊन घरातून पळून आलेला यश
आज दाक्षिणात्य सुपरस्टार्सच्या यादीत अभिनेता यशचा मोठ्या दिमाखात समावेश केला जातो. कधीकाळी हाच यश 300 रुपये घेऊन घरातून पळून आलेला. एका जुन्या मुलाखतीत बोलताना यश म्हणालेला की, "जेव्हा मी बंगळुरूला आलो तेव्हा मला खूप भीती वाटली. एवढं मोठं शहर पाहून मी घाबरलो होतो. पण मी नेहमीच आत्मविश्वासू होतो. मला माहीत होतं की, जर मी घरी परतलो तर मला पुन्हा बाहेर येण्याची संधी मिळणार नाही." यशनं पुढे बोलताना सांगितलं की, "त्यानं थिएटरमध्ये बॅकस्टेजला काम करुन आपल्या प्रवासाची सुरुवात केली. त्यानं म्हटलं की, "सुरुवातीला मी सर्वांना चहा द्यायचो, छोट्या-छोट्या दुकानांमध्ये काम करायचो. कोणीतरी मला रंगभूमीवर आणलं आणि तिथून माझ्या आयुष्याला एक वळण मिळालं. मी एका दिग्दर्शकाला कन्नड चित्रपट उद्योगात प्रवेश करण्यास मदत केली.
एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमांमध्ये केलंय काम
कधीकाळी फक्त 300 रुपये घेऊन घरातून पळून आलेल्या यशनं आपल्या अभिनयाच्या जोरावर मोठं नाव कमावलं आहे. आज यशचं आयुष्य संघर्षातून यशाचं उदाहरण बनलं आहे. एकेकाळी चहा विकून पैसे कमवणारा हा अभिनेता आता 'रामायण'सारख्या मेगा प्रोजेक्टमध्ये फक्त 15 मिनिटांच्या भूमिकेसाठी 50 कोटी रुपये घेतोय. रावणाच्या भूमिकेतील त्याचा लूक आणि अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
दरम्यान, रुपेरी पडद्यावर धुमाकूळ घालणाऱ्या केजीएफ स्टारनं कन्नड चित्रपटांमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट दिला आहे. हा चित्रपट म्हणजे, 'केजीएफ 2', ज्यानं 1200 कोटी रुपयांची कमाई केली. आता त्याच्या आगामी चित्रपटाचं बजेटही समोर आलं आहे. 'रामायण' 1200 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आलाय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :