Eng vs Ind 3rd Test 1st Day : पहिल्या दिवसाचा खेळ संपला! जो रूट 99 धावांवर नाबाद, टीम इंडियाने 'बॅझबॉल'ची काढली हवा, इंग्लंडने केल्या फक्त 251 धावा

Eng vs Ind Live 3rd Test Score Update : भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्सवर खेळला जात आहे.

किरण महानवर Last Updated: 10 Jul 2025 11:14 PM

पार्श्वभूमी

England vs India 3rd Test 1st Day Live Update : भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्सवर खेळला जात आहे. याआधी खेळल्या गेलेल्या दोन कसोटी सामन्यांच्या...More

England vs India 3rd Test Day 1 Stumps : पहिल्या दिवसाचा खेळ संपला! जो रूट 99 धावांवर नाबाद, इंग्लंडने केल्या फक्त 251 धावा


भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना गुरुवारपासून लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे. तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडने चार विकेट गमावून 251 धावा केल्या आहेत. पहिल्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस जो रूट 99 धावांसह आणि बेन स्टोक्स 39 धावांसह खेळत आहेत. भारताकडून नितीश रेड्डी यांनी दोन विकेट घेतल्या.


प्रथम फलंदाजी करताना जॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी इंग्लंडला चांगली सुरुवात करून दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी झाली. 40 चेंडूत 23 धावा काढून बेन डकेट बाद झाला. जॅक क्रॉली 43 चेंडूत फक्त 18 धावा करू शकला. नितीशने त्याच षटकात सलामीवीरांना बाद केले. 104 चेंडूत 44 धावा काढून ऑली पोप पॅव्हेलियनमध्ये परतला. रूट आणि पोप यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 211 चेंडूत 109 धावांची भागीदारी झाली. हॅरी ब्रूकला (11) बुमराहने आऊट केले. जो रूट आणि बेन स्टोक्स आता खेळत आहेत. नितीश कुमार रेड्डीने दोन, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.