Sangli Crime: अल्पवयीन शाळकरी मुलीवर लैगिक अत्याचार करून व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देवून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा संतापजनक प्रकार आटपाडी तालुक्यात घडलाय. या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून चार आरोपींना अटक करण्यात आलीय. 

Continues below advertisement

 शारीरिक, मानसिक त्रास देऊन दहावीच्या शाळकरी मुलीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी राजू विठ्ठल गेंड, रामदास गायकवाड, रोहित सर्जेराव खरात , अनिल नाना काळे या चौघांवर आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नेमकं प्रकरण काय?

 शाळेत अतिशय हुशार असणारी, खेळाडू असणारी आणि आर्मीत जाण्याचे स्वप्न पहाणारी एक कोवळी कळी नराधमांनी कायमची खुडून पायदळी तुडवली गेल्याची घटना आटपाडी तालुक्यातील करगणी गावात घडलीय. गावातीलच कन्या शाळेत दहावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या या मुलीवर गावातील एका तरुणाने बलात्कार केला. व त्याचे व्हीडिओ शुटींग केले. आणि हा प्रकार जर कोणाला सांगितला तर तिच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच माझ्या इतर मित्रांशीही संबंध ठेव असे वारंवार सांगून तिच्या दबाब आणला. या प्रकाराला कंटाळून त्या अल्पवयीन मुलीने घरातील लोखंडी बारला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. राजू गेंड, रामदास गायकवाड, रोहित खरात, अनिल काळे हे या घटनेतील आरोपी.. राजू गेंड, रामदास गायकवाड, रोहित खरात, अनिल काळे हे शाळेला जाताना शारीरिक सुखासाठी त्रास देत होते. ही मागणी तिने सातत्याने धुडकावून लावली. एकेदिवशी एका बँक शाखेच्या इमारतीवरील दुसऱ्या मजल्यावरील खोलीत नेवून जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यातील एकाने त्या कृत्याचे व्हिडीओ काढले. व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देवून चौघांकडून सातत्याने मानसिक त्रास देत असल्याचे पीडित मुलीने वडिलांना सांगितले. हा त्रास सहन न झाल्याने पिडीत शाळकरी मुलीने राहत्या घरात सोमवारी सकाळी साडेसहापूर्वी गळफास घेवून आपले जीवन संपविल्याचे पालकांनी तक्रार केलीय. दोषी आरोपींवर पोक्सोतंर्गत लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल व्हावा अशी पीडित मुलीच्या कुटूंबाची मागणी आहे. पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी आटपाडी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या मुलीने रविवारी रात्री घरी जेवण करत असताना घडलेला प्रकार सांगितला.

Continues below advertisement

आरोपींवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

 सामाजिक कार्यकर्त्या नीता केळकर यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन या प्रकरणाबद्दल पोलिसांना धारेवर धरल्यानंतर आरोपीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राजू विठ्ठल गेंड, रामदास गायकवाड, अनिल नाना काळे,रोहित सर्जेराव खरात यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गरीब घरातील अल्पवयीन मुलींना काहीतरी आमिष दाखवून, त्यांचा अशा प्रकारे गैरफायदा घेऊन व्हीडिओ रेकॉर्डिंग करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे प्रकार ग्रामीण भागात सर्रास घडत आहेत. आटपाडी तालुक्यातील करगणी गावच्या या आरोपीनी याआधीही असे गुन्हे केले आहेत.