(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bacchu Kadu : तुम्ही आम्हाला योजना काय देता, त्यापेक्षा कांद्याला भाव द्या, बच्चू कडू लाडकी बहीण योजनेवर कडाडले
तुम्ही काय आम्हाला योजना देतात, कांद्याला भाव द्या, आम्ही प्रत्येक आमदाराला वर्षाला ४ क्विंटल कांदा, मुख्यमंत्र्यांना 15 क्विंटल तर पंतप्रधानांना ट्रकभर कांदा मोफत देऊ, अशी टीका बच्चू कडू यांनी केली.
नाशिक : प्रहार संघटनेचे प्रमुख आ. बच्चू कडू (Bacchu Kadu) हे काल नाशिक दौऱ्यावर होते. देवळ्याच्या (Deola) उमराणा येथील जाहीर सभेत बच्चू कडू यांनी राज्य सरकारच्या (Maharashtra Government) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) सडकून टीका केली.
तुम्ही काय आम्हाला योजना देतात, आमच्या कांद्याला भाव द्या, आम्ही प्रत्येक आमदाराला वर्षाला 4 क्विंटल कांदा, मुख्यमंत्र्यांना 15 क्विंटल तर पंतप्रधानांना ट्रकभर कांदा मोफत देऊ, अशी टीका त्यांनी यावेळी केली. तर केंद्राच्या निर्यात शुल्क रद्द करण्याचा निर्णयाचाही कडू यांनी चांगलाच समाचार घेतला.
तुम्हाला तुमची जागा दाखविणार
आमच्याकडे कांदा असल्यावर हस्तक्षेप करत नाही. शेतमालाचे भाव पडतात तेव्हा एकही खासदार, आमदार बोलत नाही. तेव्हा तुम्हाला तुमचा पक्ष प्रिय असतो. आता आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखविणार, तुम्ही आम्हाला रडवलं आता आम्ही तुम्हाला रडवणार आहोत. काँग्रेस व भाजपने निर्माण केलेली लुटणारी व्यवस्था उखडून फेकणार आहोत, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
नाशिकमध्ये विधानसभेसाठी दोन उमेदवारांची घोषणा
राज्यातील राजकारणाची स्थिती अस्थिर आहे. दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी काँग्रेस, वन काँग्रेस अशा परिस्थितीत आपण जीवाचे रान करून आपल्या विचाराचे आमदार निवडून आणावे, असे आवाहन आ. बच्चू कडू यांनी केले. यावेळी आ. बच्चू कडू यांनी नाशिकच्या माध्यमातून प्रथमच जिल्ह्यातून आगामी विधानसभेचे रणशिंग फुंकले आहे. चांदवड -देवळा मतदार संघातून गणेश निंबाळकर तर निफाडमधून गुरुदेव कांदे यांची प्रहारकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
बच्चू कडूंचा वाणिज्य मंत्र्यांना इशारा
दरम्यान, नाफेड, एनसीसीएफच्या कांदा खरेदीत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्याकडे निफाड येथील शेतकरी मेळावा व पक्षप्रवेश सोहळ्यादरम्यान शेतकऱ्यांनी केली असता लासलगाव येथे दिव्यांगांना रेशन कार्ड व प्रमाणपत्र वाटपानंतर बच्चू कडू यांनी नाफेडच्या गोडावूनवर जात पाहणी करत संताप व्यक्त केला. वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी कांदा खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करत लक्ष घालण्याची मागणी करत लक्ष द्या, अन्यथा तुमच्या गाडीवर कांदा फेकत थोबाड लाल करण्याचे आंदोलन करू, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
आणखी वाचा