मोठी बातमी! संभाजी भिडेंच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न, काळे झेंडेही दाखवले; नाशिकच्या मनमाडदे राडा
Sambhaji Bhide : आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी भिडे यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. काचावर आणि गाडीच्या पुढील भागावर जोरजोरात हाताने मारण्यात आले.
नाशिक (मनमाड) : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांची गाडी अडवत हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर येत आहेत. नाशिकच्या मनमाड येथे रात्री साडेअकराच्या सुमारास हा प्रकार समोर आला असल्याची माहिती मिळत आहे. भिडे गुरुजी हे येवला येथून मालेगावच्या दिशेने जात असतांना आंबेडकर अनुयायी त्यांची गाडी अडवली. यावेळी काळे झेंडे दाखवून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याचवेळी आक्रमक झालेल्या काहींनी थेट भिडे यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांकडून त्यांना रोखण्याचा देखील प्रयत्न झाला.
भिडे गुरुजी मालेगावला जात असतानाच नाशिकच्या मनमाड येथे त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला. संभाजी भिडे मुर्दाबादच्या अशा घोषणा देण्यात आल्या, तसेच अश्लील शब्दातही घोषणाबाजी केली गेली. सुरवातीला काळे झेंडे दाखवण्यात आले आणि नंतर थेट भिडे यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. यावेळी काही तरुण आणि तरुणी थेट भीड यांच्या गाडीच्या समोर आले. त्यांची गाडी अडवून गाडीवर जोरजोराने हाताने मारत शिवीगाळ करण्यात आली. यावेळी पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या आणि गाडी अडवणाऱ्यांना बाजूला केले. त्यानंतर संभाजी भिडे धुळ्याकडे रवाना झाले. काळे झेंडे दाखवणाऱ्या आणि भिडे यांच्यावर गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना मनमाड पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळत आहे.
नेमकं काय घडलं?
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे येवला येथून मालेगावच्या दिशेने निघाले होते. दरम्यान, मनमाड येथून भिडे हे मालेगावच्या दिशेने जाणार होते. याची माहिती आंबेडकर अनुयायी यांना मिळाली. दरम्यान, पोलीस बंदोबस्तात भिडे यांचा ताफा मनमाडमध्ये दाखल होताच आंबेडकर अनुयायी यांनी जोरदार घोषणाबाजी करत भिडे यांचा ताफा अडवला. हातात भिडे यांचे निषेध करणारे बॅनर घेऊन आलेल्या तरुणांनी भिडे यांची गाडी अडवली. या गाडीत पुढील सीटवर स्वतः भिडे बसलेले होते. यावेळी काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी करण्यात आली. आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी भिडे यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. काचावर आणि गाडीच्या पुढील भागावर जोरजोरात हाताने मारण्यात आले. याचवेळी एकाने पायातील बूट काढून गाडीवर मारला. यावेळी पोलिसांकडून आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी रस्ता मोकळा करून दिल्यावर भिडे गुरुजी पुढे मालेगावच्या दिशेने निघाले.
इतर महत्वाच्या बातम्या :
Sudhakar Badgujar : संजय राऊतांची आगपाखड, नितेश राणेही कडाडले, बडगुजर प्रकरणाचे राजकीय पडसाद उमटणार