एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal : अमृतचे मुख्यालय नाशिकहून पुण्याला नेण्याचे कारणच काय? छगन भुजबळ शिंदे सरकारवर संतापले!

Chhagan Bhujbal : अमृतचे मुख्यालय नाशिकहून (Nashik) पुण्याला नेण्याचे कारणच काय असा सवाल माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी उपस्थित करत हा प्रश्न अधिवेशनात मांडणार असल्याचे सांगितले.

Chhagan Bhujbal : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील युवक युवतींना व इतर उमेदवारासाठी विविध उपक्रम राबविण्यासाठी महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधनी म्हणजेच अमृत या संस्थेची निर्मिती केलेली आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारने या संस्थेचे मुख्यालय नाशिकला (Nashik) मंजूर केले होते. मात्र शिंदे सरकारने (Cm Eknath Shinde) लगेच नाशिकचे मुख्यालय पुणे येथे स्थलांतरित केले. हे अमृतचे मुख्यालय नाशिकहून पुण्याला नेण्याचे कारणच काय असा सवाल माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी उपस्थित करत हा प्रश्न अधिवेशनात मांडणार असल्याचे सांगितले.

आज येवला (Yeola) तालुक्यातील अतिवृष्टीमुळे बाधित परिसराची छगन भुजबळ यांनी पाहणी केली. या पाहणी दौऱ्यादरम्यान छगन भुजबळ यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी नाशिक येथे मंजूर करण्यात आलेले अमृत संस्थेचे मुख्यालय नवीन सरकार स्थापन होताच पुण्याला हलविण्यात आले. याबाबत विचारलेल्या प्रश्नाबाबत ते बोलत होते.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, नाशिकसाठी आम्ही जे काय करतो ते पळवण्याचा जणू चंगच बांधलेला दिसतो आहे. या अगोदर देखील नाशिकचे वनविभागाचे मुख्य कार्यालय, महावितरणचे कार्यालय, नाशिकच्या बोटी तसेच अनेक कार्यालये पळविण्याचा प्रयत्न गेल्या भाजपच्या सरकारमध्ये झाला. आता पुन्हा अमृतचे कार्यालय पळविण्यात आले. नाशिक करांची मते लागतात महापालिकेत सत्ता लागते, उमेदवार लागतात त्यासाठी मीटिंग नाशिकमध्ये घेतल्या जातात आणि त्याच नशिकरांसाठी आणलेले प्रकल्प पळविण्यात येतात अशी टीका छगन भुजबळ यांनी केली.

ते म्हणाले की, नव्याने सरकार स्थापन होताच नाशिकचे प्रकल्प पळविण्याचा हा सिलसिला पुन्हा एकदा सुरू झाला असून आता खऱ्या अर्थाने नाशिकची प्रगती सुरू झाली आहे असा उपहासात्मक टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला. तसेच नाशिकमध्ये अमृतचे मुख्यालय मंजूर करण्यात आले असतांना ते पुण्याला हलविण्याचे कारणच काय असा सवाल उपस्थित करत येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करत सरकारची यामागे भूमिका काय याबाबत विचारणा केली जाईल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

नुकसानग्रस्त भागाची पाहणी
येवला तालुक्यातील मुखेड, शिरसगाव, पाटोदा परिसरात 12 गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या भागाची माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी पाहणी करत प्रशासनाने तातडीने सर्व पंचनामे करून अहवाल शासनास सादर करावा अशा सूचना त्यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या. पावसामुळे अनेक भागात विजेचे प्रश्न निर्माण झाल्याने तातडीने हा प्रश्न सोडवून विजेचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा. सिंगल फेज यंत्रणा व्यवस्थित रित्या राबविण्यात यावी अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. 

महत्त्वाच्या बातम्या

Chandrashekhar Bawankule: नाशिकच्या खड्ड्यांच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, याची त्याची जबाबदारी करण्यापेक्षा....
नाशिकच्या खड्ड्यांच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, याची-त्याची जबाबदारी करण्यापेक्षा....
Nashik Potholes: 'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं
'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं
Chhagan Bhujbal and Girish Mahajan: नाशिकच्या खड्ड्यांवरून महायुतीतील दोन मंत्र्यांमध्ये जुंपली; गिरीश महाजनांशी अबोला? छगन भुजबळांनी सगळंच सांगितलं, म्हणाले...
नाशिकच्या खड्ड्यांवरून महायुतीतील दोन मंत्र्यांमध्ये जुंपली; गिरीश महाजनांशी अबोला? छगन भुजबळांनी सगळंच सांगितलं, म्हणाले...
Real estate house possession RERA: नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
EPFO Big Update : 25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार EPFO चा 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
Embed widget