एक्स्प्लोर

Sharad Pawar: सरकार बदलायचं असेल तर शेतकऱ्यांसह सर्वांनी सोबत या, शरद पवार यांचे आवाहन

राज्यभरात अतिवृष्टीमुळे नुकसान झालं. हे सगळं सोडून सगळ्यांना घेऊन अयोध्येला जायचं, यात प्राधान्य कशाला द्यायचं, हे ठरवल पाहिजे, असा सल्लाही अयोध्या दौऱ्यावर गेलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला.

नाशिक :  सरकारचा शेतकऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्यामुळे आपल्या सर्वांनी सोबत यायला हवं. सरकारचं धोरण बदलायचं असेल तर आपल्याला ही गोष्ट करावीच लागेल, असे सूतोवाच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केले.

नाशिक जवळील देवरगाव येथील शासकीय आश्रम शाळेच्या वस्तीगृहाच्या भूमिपूजन प्रसंगी शरद पवार बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, सद्यस्थितीत ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. त्यामुळे शेती माल निर्यातीवर परिणाम झाला आहे. आमच्याकडे शेती मंत्रीपद होत तेव्हा राज्यासह देशभरात अनेक उपक्रम राबविले. शेतीला आणि शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य दिले, मात्र आज चित्र वेगळे असल्याचे सांगत सरकारवर निशाणा साधला.

शरद पवार पुढे म्हणाले की, अनेक वर्षांनी नाशिक जिल्ह्यातील या भागात आलो. दोन अडीच वर्षांपूवी विधानसभा निवडणुका प्रचार दरम्यान आलो होतो. सरोज अहिरे यांना तुम्ही निवडून दिलं. त्याचा बदल आज दिसतो आहे. तुम्ही भरभरून मतदान केल्याने अहिरे निवडून आल्या. काम होत आहेत, आगामी निवडणुकांना तुम्ही अशीच मदत कराल अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली. 

नाशिक जिल्ह्यात हजारो शेतकरी शेती करतात. ऊसाची शेती ही अनेकजण करतात. ऊस शेती संदर्भात संशोधन होणं गरजेचे आहे. त्यासाठी नाशिक साखर कारखाना चालू होणं महत्वाचं आहे. त्याकडे राज्यकर्त्यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे. ऊसाच्या पिकाला चांगला भाव मिळून साखर उत्पादन चांगले होईल, असेही शरद पवार म्हणाले. आदिवासी विद्यार्थ्यांना शाळा हवी, वसतिगृह हवं, पिण्याची पाणी हवे.  आदिवासी मुलामुलींना चांगली सुविधा मिळेल. 

तुम्ही आम्ही हे सरकार बदलू शकतो...

नाशिम जिल्हा उत्तम शेती करणार जिल्हा आहे. या जिल्ह्यात द्राक्ष डाळिंब, कांदा शेतीचे उत्पादन घेतले जाते. तसेच गिरणारे हे टोमॅटो पिकाचे प्रसिद्ध मार्केट म्हणून ओळखले जाते. मात्र सद्यस्थितीत सरकार धोरण शेतकरी विरोधी असल्याचे दिसते आहे. सरकारने जर मनावर घेतले तर आपला शेतकरी महाराष्ट्र काय देशाची गरज भागवू, असे शरद पवार म्हणाले. कांद्याच्या किमती कोसळल्या आहेत. त्याला कारणीभूत सरकार आहे, हे धोरण बदलायला हवे, तुम्ही आम्ही सोबत असल्यावर हे शक्य आहे, सरकार बदलायले हवे, हे काम तुम्हाला आम्हाला करावेच लागणार आहे, असे आवाहन यावेळी शरद पवार यांनी केले. 

हे सगळं बदलायचं असेल तर... 

शरद पवार यांनी यावेळी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, ज्यांच्या हातात सत्ता त्यांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. आज कोणत्याच शेतमालाला भाव नाही.  आमच्याकडे शेती मंत्रीपद होत तेव्हा अनेक उपक्रम राबविले. शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे, पाणी मिळालं पाहीजे , बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळाला पाहिजे. हे सगळं जेव्हा होईल तेव्हा काळ्या आईशी इमान राखणारा शेतकरी परदेशातील अन्नधान्यावर जगणार नाही. तेच काम आम्ही केलं,त्यावेळी तांदूळ निर्यात करणारा पहिला देश झाला. द्राक्ष, गहू यांसह अनेक पिके निर्यात होऊ लागली. आणि हे होऊ शकतं. हे जर करायचा असलं तर शेतकऱ्याला घामाची किंमत केली पाहिजे, बी बियाणे दिले पाहिजे हे सगळं सरकारने केले पाहिजे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India Vs Australia : राहुल द्रविडकडून ओपनिंग करा! सुनील गावस्करांनी फिरकी घेताच 20 वर्षांपूर्वीचा इतिहास आठवला
राहुल द्रविडकडून ओपनिंग करा! सुनील गावस्करांनी फिरकी घेताच 20 वर्षांपूर्वीचा इतिहास आठवला
निष्काळजीपणाची हद्द! अहवाल येण्यापूर्वीच 8.5 हजार रुग्णांच्या पोटात बनावट गोळ्या, औषध यंत्रणाच उठली जीवावर?
निष्काळजीपणाची हद्द! अहवाल येण्यापूर्वीच 8.5 हजार रुग्णांच्या पोटात बनावट गोळ्या, औषध यंत्रणाच उठली जीवावर?
Parbhani Band : 'परभणी बंद'ला हिंसक वळण; संतप्त जमावाकडून पीव्हीसी पाईपांची जाळपोळ, प्रशासनाचे शांततेचे आवाहन
'परभणी बंद'ला हिंसक वळण; संतप्त जमावाकडून पीव्हीसी पाईपांची जाळपोळ, प्रशासनाचे शांततेचे आवाहन
24 तासांत हल्लेखोरांना अटक करा अन्यथा..'  परभणी बंदच्या हिंसक वळणावर प्रकाश आंबेडकरांचा इशारा म्हणाले..
24 तासांत हल्लेखोरांना अटक करा अन्यथा..' परभणी बंदच्या हिंसक वळणावर प्रकाश आंबेडकरांचा इशारा म्हणाले..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Parbhani Protest : परभणीत आंदोलन पेटलं, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्जParbhani Protest : परभणी जिल्हा बंदला हिंसक वळण; आंदोलकांनी पेटवले पाईपRahul Patil on Parbhani Protest :  परभणीतील आंदोलनाला हिंसक वळणYogesh Tilekar Mama : वैयक्तिक कारणातून सतिश वाघ यांचा जीव घेतला

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Vs Australia : राहुल द्रविडकडून ओपनिंग करा! सुनील गावस्करांनी फिरकी घेताच 20 वर्षांपूर्वीचा इतिहास आठवला
राहुल द्रविडकडून ओपनिंग करा! सुनील गावस्करांनी फिरकी घेताच 20 वर्षांपूर्वीचा इतिहास आठवला
निष्काळजीपणाची हद्द! अहवाल येण्यापूर्वीच 8.5 हजार रुग्णांच्या पोटात बनावट गोळ्या, औषध यंत्रणाच उठली जीवावर?
निष्काळजीपणाची हद्द! अहवाल येण्यापूर्वीच 8.5 हजार रुग्णांच्या पोटात बनावट गोळ्या, औषध यंत्रणाच उठली जीवावर?
Parbhani Band : 'परभणी बंद'ला हिंसक वळण; संतप्त जमावाकडून पीव्हीसी पाईपांची जाळपोळ, प्रशासनाचे शांततेचे आवाहन
'परभणी बंद'ला हिंसक वळण; संतप्त जमावाकडून पीव्हीसी पाईपांची जाळपोळ, प्रशासनाचे शांततेचे आवाहन
24 तासांत हल्लेखोरांना अटक करा अन्यथा..'  परभणी बंदच्या हिंसक वळणावर प्रकाश आंबेडकरांचा इशारा म्हणाले..
24 तासांत हल्लेखोरांना अटक करा अन्यथा..' परभणी बंदच्या हिंसक वळणावर प्रकाश आंबेडकरांचा इशारा म्हणाले..
परभणीत आंदोलन पेटलं, हिंसक वळण; पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज, प्रकाश आंबेडकरांचा इशारा
परभणीत आंदोलन पेटलं, हिंसक वळण; पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज, प्रकाश आंबेडकरांचा इशारा
Shekhar Kumar Yadav : देश 'बहुसंख्याकांच्या' इच्छेनं चालणार म्हणणाऱ्या न्यायाधीशांवर महाभियोग चालवण्याची मागणी; सुप्रीम कोर्टानेही लक्ष घातलं
देश 'बहुसंख्याकांच्या' इच्छेनं चालणार म्हणणाऱ्या न्यायाधीशांवर महाभियोग चालवण्याची मागणी; सुप्रीम कोर्टानेही लक्ष घातलं
आठवड्यातून 3 दिवस सुट्टी, 4 दिवस काम; सरकार रोमान्स करण्यासाठी देतंय सुट्टी
आठवड्यातून 3 दिवस सुट्टी, 4 दिवस काम; सरकार रोमान्स करण्यासाठी देतंय सुट्टी
Mukhyamantri Sahayata Nidhi: एकनाथ शिंदेंना मोठा झटका, मंगेश चिवटेंना हटवलं, मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाची जबाबदारी काढून घेतली!
एकनाथ शिंदेंना मोठा झटका, मंगेश चिवटेंना हटवलं, मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाची जबाबदारी काढून घेतली!
Embed widget