एक्स्प्लोर

Nashik News : 'मुख्यमंत्र्यांना रक्तानं लिहलं पत्र', नाशिकच्या शेतकऱ्याचा कांदा अग्निडाग समारंभ

Nashik News : नाशिकच्या शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित अग्निडाग कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे.

Nashik News : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला असून गेल्या कित्येक दिवसापासून कांद्याचं करायच काय हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. लाल कांदा सध्या बाजारामध्ये येतोय. मात्र या कांद्याला कवडीमोल रुपयांपर्यंतचा भाव मिळत आहे. अशातच नाशिकच्या एका शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना (Eknath Shinde) रक्ताने पत्र लिहत अग्निडाग कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे.

नाशिक जिल्ह्यात कांद्याचे भाव (Onion rate) पुन्हा पडले असून दोनच दिवसांपूर्वी याबाबत शेतकऱ्यांनी आंदोलन (Farmers Protest) केले होते. सततच्या घसरत्या भावामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कांदा कवडीमोल भावात विकला जात असल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही भरून निघत नाही. तीन दिवसांपूर्वी चांदवड तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचा उद्रेक बघायला मिळालेला होता. शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये लिलाव संपूर्णपणे बंद पडलेले होते. त्यानंतरही कुठल्याही स्वरूपाची सरकारने दखल घेतली नाही. येवल्याच्या नगरसुल येथील शेतकरी कृष्णा डोंगरे (Krushna Dongre) यांनी थेट आपल्या रक्ताने पत्र लिहिले असून कांदा अग्निडाग समारंभ आयोजित करून मुख्यमंत्र्यांना आमंत्रण दिले आहे. 

कांदा उत्पादनात अग्रेसर असलेल्या नाशिक जिल्ह्यात अनेक अडचणींवर मात करत शेतकऱ्यांनी कांद्याचे उत्पादन घेतले. मात्र सध्या (Onion) कांद्याच्या दरात घसरण होत असल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. दरम्यान येवला येथील शेतकरी कृष्णा डोंगरे याने कांदा अग्निडाग समारंभाचे आयोजन केले आहे. याची निमंत्रणपत्रिका मुख्यमंत्र्यांच्या नावे व्हायरल होत असून पत्रिकेद्वारे निमंत्रण दिले आहे. यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उद्देशून म्हटले आहे की, शेतकऱ्यांपुढे अनेक प्रश्न असताना त्याला कांदा रडवतो आहे. कांदा एवढ्या कमी दरात जात असल्याने उत्पादन खर्च वसूल होत नसून केंद्रातील भाजपाचे धोरण शेतकरीविरोधी आहे. आपण शेतकऱ्याचे पुत्र असून या विरोधात आवाज उठवणे आवश्यक आहे. मात्र आपणही गप्प का? असा प्रश्न त्याने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्राद्वारे विचारला आहे. आपण काही करु शकत नसाल तर आयोजित केलेल्या कांदा अग्नीडाग कार्यक्रमास आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन या पत्राद्वारे केले आहे. 

कांदा अग्निडाग समारंभ... 

दरम्यान कांद्याला भाव मिळत नसल्याने कृष्णा डोंगरे याने येत्या 6 मार्च रोजी कांदा अग्निडाग समारंभ आयोजित केला आहे.  यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनादेखील निमंत्रण दिले आहे. येवला तालुक्यातील नगरसूल जवळील मातुलठाण या गावी समारंभाचे ठिकाण आहे. सदर कार्यक्रमाच्या जाहीर निमंत्रण पत्रिका छापल्या असून सोशल मिडीयावर सध्या व्‍हायरल होत आहेत. विशेष म्हणजे काही वर्षापुर्वी याच कांदा प्रश्नावर कृष्णा डोंगरे यांनी कांद्याचे शेत जाळून टाकलं होते. त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट नगरसुल येथे धाव घेत कृष्णा डोंगरे यांची भेट घेतली होती.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tasgaon-Kavathe Mahankal Vidhan Sabha : तुमचा आशीर्वाद माझा पारड्यात टाकून तुमच्या पदरात घ्यावं..! रोहित आर. आर. पाटलांची भावनिक साद
तुमचा आशीर्वाद माझा पारड्यात टाकून तुमच्या पदरात घ्यावं..! रोहित आर. आर. पाटलांची भावनिक साद
Anil Deshmukh Attack: 10 किलोचा दगड 20 फुटांवरुन कसा पडला? अनिल देशमुखांच्या गाडीचा स्पीडही कमी; भाजपच्या नेत्याला वेगळाच संशय
अनिल देशमुखांचा 'तो' बॉडीगार्ड, 10 किलोंचा दगड; भाजप नेत्याला हल्ल्याबाबत वेगळाच संशय
Trending : मिटिंगला आले नाही म्हणून बॉसने करिअरवर वरवंटा फिरवला, एका फटक्यात 99 जणांना नोकरीवरुन काढलं
ऑफिस मिटिंग जॉईन केली नाही म्हणून बॉसचं डोकं फिरलं, एका झटक्यात 99 जणांना नोकरीवरुन काढलं
Solapur Vidhan Sabha Election 2024: शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9 AM : 19 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सVidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया कशी असेल?TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 19 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaChhatrapati Sambhajinagar Election : संभाजीनगरात व्होटर आयडी जमा करून 1500 रूपये देण्याचा प्रकार

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tasgaon-Kavathe Mahankal Vidhan Sabha : तुमचा आशीर्वाद माझा पारड्यात टाकून तुमच्या पदरात घ्यावं..! रोहित आर. आर. पाटलांची भावनिक साद
तुमचा आशीर्वाद माझा पारड्यात टाकून तुमच्या पदरात घ्यावं..! रोहित आर. आर. पाटलांची भावनिक साद
Anil Deshmukh Attack: 10 किलोचा दगड 20 फुटांवरुन कसा पडला? अनिल देशमुखांच्या गाडीचा स्पीडही कमी; भाजपच्या नेत्याला वेगळाच संशय
अनिल देशमुखांचा 'तो' बॉडीगार्ड, 10 किलोंचा दगड; भाजप नेत्याला हल्ल्याबाबत वेगळाच संशय
Trending : मिटिंगला आले नाही म्हणून बॉसने करिअरवर वरवंटा फिरवला, एका फटक्यात 99 जणांना नोकरीवरुन काढलं
ऑफिस मिटिंग जॉईन केली नाही म्हणून बॉसचं डोकं फिरलं, एका झटक्यात 99 जणांना नोकरीवरुन काढलं
Solapur Vidhan Sabha Election 2024: शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Phalodi Satta Bazar Maharashtra Vidhan Sabha: राज्यात कोणाची सत्ता येणार, महायुती की मविआ? फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत मोठी बातमी, फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Sharad Pawar: एज इज जस्ट अ नंबर! 69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
Embed widget