Nashik Crime : नाशिकरोड कारागृह पुन्हा चर्चेत, कारागृहातील बंदींवर अनैसर्गिक अत्याचार, संशयितावर गुन्हा दाखल
Nashik Crime : नाशिकरोड येथील कारागृहातील पीडित बंदीवान लघुशंकेसाठी गेला असता संशयित बंदीवानाने अनैसर्गिक अत्याचार केला
Nashik Crime : मुंबईतील ऑर्थर रोड (Orther Road Jail) तुरुंगातील कैद्यांवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच नाशिकमध्ये (Nashik) देखील अशीच घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. नाशिकरोड येथील कारागृहातील (Nashikroad Central Jail) हा प्रकार असून पीडित बंदीवान लघुशंकेसाठी गेला असता संशयित बंदीवानाने अनैसर्गिक अत्याचार केला. विजय रामचंद्र सोनवणे असे या संशयिताचे नाव आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबई (Mumbai) येथील ऑर्थर रोड जेलमध्ये आरोपींनी स्नानगृहात एका 23 वर्षीय कैद्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर आरोपींनी बराकमध्ये या कैद्याला शिवीगाळ केली, तसेच त्यातील आरोपीने पीडित कैद्याला मारहाणही केल्याचा प्रकार घडला होता. आता ऑर्थर रोड तुरुंगापाठोपाठ नाशिकच्या तुरुंगातही बंदीवानावर अनैसर्गिक अत्याचार घडल्याची घटना समोर आली आहे. नाशिकरोड (Nashik) मध्यवर्ती कारागृहातील सर्कल नंबर 5 मधील बॅरेक नंबर 1 मध्ये न्यायालयीन कोठडीत आहे. पीडित बंदीवान लघुशंकेसाठी गेला असता संशयित बंदीवानाने अनैसर्गिक अत्याचार केल्याची माहिती आहे.
दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित न्याय बंदीच्या फिर्यादीनुसार सदरील घटना मागील आठवड्यात बुधवारी रात्री घडलेली आहे. कारागृहातील सर्कल नंबर 5 मधील डायरेक्ट क्रमांक एकमध्ये घडली आहे. फिर्यादी न्यायबंदी शौचालयात लघुशंकेसाठी गेला असता संशयित सोनवणे यांनी त्याच्याशी अनैसर्गिक कृत्य केले. पीडिताने तुरुंग रक्षकाला हा प्रकार सांगितल्यानंतर त्यांने याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. याप्रकरणी नाशिक रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक काकडे हे करीत आहेत.
नाशिकरोड कारागृह नेहमीच चर्चेत
नाशिकरोड कारागृह हे नेहमीच चर्चेत असते. काही वर्षांपूर्वी एका अहवालानुसार नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात अनेक कैद्यांना एचआयव्हीचा संसर्ग झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली होती. त्यावेळी चांगलीच खळबळ उडाली आहे. कारागृहात येणाऱ्या बहुतांश गुन्हेगारांना अमली पदार्थ, मद्य सेवन करण्याचे व्यसन असते. यातील अनेक गुन्हेगारांना संसर्ग असतो. मात्र, निदान होत नाही. त्यामुळे अशावेळी असुरक्षित लैंगिक संबंधांचे प्रकार घडत असल्याने या बाधित कैद्यांपासून इतरांना एचआयव्हीची लागण होत असते. त्यातच असे प्रकार उघडकीस येत असल्याने चर्चेचा विषय ठरला आहे.
मानसोपचार तज्ञ म्हणतात की,...
कोणतेही कारागृह म्हटले कि अनेकदा कैदी अनेक वर्ष, महिने, दिवसांपासून कारागृहात बंदिस्त असतात. अशावेळी आजूबाजूला सर्वच पुरुष वर्ग असल्याने लैगिंक संबंध ठेवण्याची इच्छा होत असते. यातूनच अनेकदा असे प्रकार घडत असतात. त्याचबरोबर अशावेळी कैदयांचे वय देखील महत्वाचा घटक असते. लैंगिक इच्छा असताना मात्र लैंगिक सुखापासून ते वंचित राहतात. अशावेळी असुरक्षित लैंगिक संबंध ठेवले जातात. यातूनच अनेक आजार हे बळावले जातात, अशी माहिती मानसोपचार तज्ञ कल्पेश सोनवणे यांनी दिली.