Nashik Bus Fire : नाशिक बस दुर्घटना : मृतांची ओळख पटविण्यासाठी डीएनए टेस्ट करणार, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
Nashik Bus Fire : नाशिक बस दुर्घटना : मृतांची ओळख पटविण्यासाठी डीएनए टेस्ट करणार, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
Nashik Bus Fire : नाशिकमध्ये (Nashik) बस दुर्घटनेत (Bus Fiire) मृत झालेल्या प्रवाशांची ओळख पटत नसल्याने संबंधित मृतांच्या ओळखीसाठी डीएनए टेस्ट करण्यात येणार असून त्याचबरोबर इतर फॉरेंसिन्क टेस्ट काण्यात येणार असल्याची महिती नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाथरण डी (Nashik collector) यांनी दिली आहे. त्याचबरोबर मृतांची ओळख पटविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मदत कक्ष तयार करण्यात आलं असून दोन तोल फ्री नंबरही देण्यात आले आहेत.
नाशिकच्या औरंगाबादरोड वरील मिरची हॉटेल जवळ आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला असून या अपघातात दहा लोकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यानंतर जखमींवर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र मृतांची ओळख पटवण्यासाठी प्रशासनाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत यासाठी डीएनए टेस्ट आणि इतर फॉरेनची टेस्ट करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांनी दिली आहे. सद्यस्थितीत जिल्हा रुग्णालयामध्ये स्थानिक आमदार, पदाधिकारी, शासकीय अधिकारी देखील मोठ्या संख्येने असून जिल्हाधिकारी गंगाधरन डी हे स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
यवतमाळहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी बस व नाशिकहून औरंगाबादकडे जाणाऱ्या ट्रेलर ची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. अपघातानंतर खासगी बसला आग लागली. ही बस स्लीपर कोच होती. दरम्यान या आगीत 11 जणांचा मृत्यू झाले आहेत. औरंगाबाद हायवेमध्ये सिटीमध्ये साधारण साडेपाच वाजता भीषण अपघात झाला. यावेळी ट्रेलरच्या फ्युएल टॅंकमध्ये स्फोट होऊन बसला आग लागली. सद्यस्थितीत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 27 लोकांना उपचार सुरु असून एका प्रवाशाला मेडिकल कॉलेजमध्ये त्यांना शिफ्ट करण्यात आला आहे. दरम्यान दाखल केलेल्या रुग्णांना किरकोळ दुखापतवं फ्रॅक्चर असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
डीएनए टेस्ट करणार
दरम्यान मृतामधील फक्त दोन प्रवाशांची ओळख पटलेली असून इतर प्रवाशांची ओळख पटविणे मुश्किल असल्याने त्यासाठी डीएनए टेस्ट करण्यात येणार आहे. त्याचबरोबर इतर फॉरेस्निक टेस्ट हि करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. आताच्या घडीला पोस्टमार्टम करून त्यांच्या ओळख करण्यासाठी प्रयत्न चालू आहे. या व्यतिरिक्त आपण प्रशासन मार्फत प्रवाशांची ओळख पटविण्यासाठी टोल फ्री नंबरदेण्यात आला आहे.दरम्यान बस आग लागल्याच्या घटनांसंदर्भांत कठोर पाऊले उचलण्यात येऊन यासाठी पोलीस प्रशासन आणि आरटीओ आणि इतर स्थानिक प्रशासन सोबत चर्चा करणार असल्याचे जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांनी सांगितले.