Saptashrungi : सप्तशृंगी गडावर इर्शाळवाडीसारखी परिस्थिती उद्धवण्याची भीती, थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून नागरिकांचं आवाहन
Irshalvadi Disaster : सप्तशृंगी गडावर माळीण आणि इर्शाळवाडीसारखी परिस्थती उद्बवूं शकते अशी भीती स्थानिकांना वाटत आहे.
Saptashrungi Gad Alert : सप्तशृंगी गडावर माळीण आणि इर्शाळवाडी (Irshalvadi Landslide) सारखी परिस्थती उद्भवू शकते, अशी भीती स्थानिकांना वाटत आहे. यामुळे ग्रामपंचायतीने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून लक्ष घालण्याच्या आवाहन केलं आहे. ग्रामपंच्यातीने थेट मुख्यमंत्री कार्यालय गाठल्याने प्रशासनाने तात्काळ बैठक बोलवून संभाव्य धोका आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी उपाय योजना सुचवल्या आहेत. पावसाळ्याच्या दिवसात डोंगररांगात राहणाऱ्या नागरिकांना सर्वधिक धोका असतो. दरड कोसळणे, भूस्खलन होण्याच्या घटना घडत असल्यानं नागरिकाचा जीव टांगणीला लागलेला आहे.
सप्तशृंगी गडावर माळीणसारखी परिस्थिती उद्धवण्याची भीती
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान साडेतीन शक्तीपीठ पैकी एक असणाऱ्या सप्तशृंगी देवीचा गडही दरड कोसळण्याच्या भीतीला अपवाद नाही. इर्शाळवाडीची घटना ज्या दिवशी घडली त्याच दिवशी सप्तशृंगी गड ग्रामपंचायतीने मुख्यमंत्र्याना पत्र लिहून माळीणसारखी घटना घडण्याची भीती व्यक्त केली आहे. गडावर देवाच्या दर्शनासाठी रोज हजारो भाविक येत असतात. पायऱ्यांच्या बाजूला मातीचे जमा झाल्यानं खाली माती खाली येण्याची आणि दरड कोसळण्याची शक्यता आहे. खालच्या बाजूला गाव असल्यानं मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे संरक्षण भिंत बांधण्याची मागणी ग्रामपंच्यातीने केली आहे.
मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून नागरिकांचं आवाहन
ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री कार्यकार्यालयाशी सम्पर्क साधल्याने स्थानिक यंत्रणा खडबडून जागी झाली असून घाईघाईत कळवण तहसील कार्यालयात बैठक बोलवण्यात आली. या बैठकीत उपाय योजना सुचविण्यात आल्या आहेत. मागील आठवडण्यातच घाटात बस कोसळून एका प्रवासी ठार तर, उर्वरित प्रवासी जखमी झाले होते. घाटातही दरड कोसळण्याच्या घटना दर पावसाळ्यात घडत असतात. त्यामुळे भाविकांच्या सुरक्षेसाठी काय उपाय योजना करायच्या त्यावर चर्चा करण्यात आली असून अहवाल वरिष्ठ पातळीवर सादर केला जाणार आहे.
गडावरून आधीही दरड कोसळण्याच्या घटना
या आधीही गडावरून दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत, त्यामुळे काही ठिकाणी जाळी बसवण्यात आली आहे. मागील वर्षी जोरदार पाऊस झाल्याने गडाच्या पायऱ्यांवर मोठ्या प्रमाणात दगड, माती वाहून आली होती. आठ दिवस तिथला मार्ग बंद ठेवण्यात आला होता. भविष्यात पुन्हा जोराचा पाऊस आला तर, दरड थेट खाली कोसळण्याची भीती असल्याने आताच उपाय योजना करण्याची गरज आहे. त्यामुळे प्रशासन काय पावलं उचलतात याकडे लक्ष लागलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :