Nashik News : 'अमर रहे अमर रहे, सागर पानमळे अमर रहे', अशा घोषणा देत येवला तालुक्यातील (Yeola) सावरगावचे सुपुत्र तथा भारतीय लष्करातील जवान सागर नागनाथ पानमळे (sagar Panmale) यांना अखेरचा निरोप देण्यात आला. जवान पानमळे यांच्यावर सावरगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. निफाड तालुक्यातील वेळापूर येथे बुधवारी रात्री जवान पानमळे यांच्या दुचाकीस अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू (Accident Death) झाला होता.


जवान सागर पानमळे एक महिन्याची रजा टाकून सहा दिवसांपूर्वीच आपल्या गावी आले होते. बुधवारी ते लासलगाव (Lasalgaon) येथे कामानिमित्त गेले होते. तेथून रात्री साडेनऊच्या सुमारास बुलेटवरून मित्रासह सावरगावकडे येत असताना लासलगाव-पाटोदा मार्गावर वेळापूर येथे अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीस धडक दिली. त्यात जवान पानमळे यांना गंभीर दुखापत झाल्याने उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. तर त्यांच्यासोबत मित्र गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. जवान पानमळे यांच्या निधनाने गावावर शोककळा पसरली असून कुटुंबावर दुःखाचे सावट आहे. 


बुधवारी रात्रीच्या सुमारास लासलगाव-पाटोदा मार्गावर (Lasalgoan Road) अज्ञात वाहनाच्या धडकेत झालेल्या अपघातात निधन झाले. गुरुवारी दुपारी साडेचार वाजता सागर पानमळे यांच्या पार्थिवावर त्यांच्या वस्तीवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारावेळी कुटुंबीयांसह ग्रामस्थांना शोक अनावर झाला होता. 'वीर जवान सागर पानमळे लष्करात उत्तम सेवा बजावत असतानाच त्यांना आपल्यातून निघून गेल्याने भारतमातेने वीर सुपुत्र गमावला आहे. आम्ही सर्व पानमळे कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहेत,' अशा शब्दांत माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, वेळापूर येथे ज्या ठिकाणी अपघात झाला ते ठिकाण धोकादायक वळणाचे असून, तेथील अपघातांत अनेकांनी प्राण गमावलेले आहेत.


'अमर रहे अमर रहे, सागर पानमळे अमर रहे', 


'अमर रहे अमर रहे, सागर पानमळे अमर रहे', अशा घोषणा देत त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. सागर यांचे पार्थिव दुपारी तीन वाजता गावात आणल्यानंतर महामार्गापासून ते त्यांच्या वस्ती दरम्यान सैन्य दलाच्या वाहनातून अंत्ययात्रा काढण्यात आली. संपूर्ण मार्गावर पानमळे यांच्या अंत्यदर्शनासाठी हजारो नागरिक उपस्थित होते. नाशिकच्या आर्टिलरी सेंटरच्या जवानांच्या वतीने मानवंदना देण्यात आली. यावेळी तिरंगा ध्वज आई ज्योती, वडील नागनाथ आप्पा पानमळे आणि पत्नी सुचित्रा पानमळे यांच्या स्वाधीन करण्यात आला. जवान सागर यांच्या पश्चात आईवडील, पत्नी, मुलगा, मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे. 



गावी सुट्टीवर आले होते... 


सागर पानमळे हे 2011 साली सैन्यात दाखल झाले. त्यांची नुकतीच नगर येथून जम्मू-काश्मीर येथे बदली झाली. बदलीच्या ठिकाणी जाण्यापूर्वी काही दिवसांची सुटी घेऊन ते गावी आले होते. बुधवारी ते मित्रासमवेत काही कामानिमित्त लासलगावला गेले होते. तिथून घरी परतत असताना लासलगाव-पाटोदा मागांवर वेळापूर गावाज- वळील वळणावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने सागर यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा मित्र गंभीर जखमी असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. लासलगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून, धडक देणाऱ्या अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत.