लातूर : लातूर जिल्ह्यातील जळकोट येथील रोहित उत्तम शिंगाडे या 29 वर्षीय जवानाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. रोहित शिंगाडे हे सन 2007 मध्ये मिल्ट्रीत लान्स नायक म्हणून (सेव्हन महार रेजिमेंट बटालीयन) मध्ये काम करत होते. सियाचीन भागात ते सध्या कर्तव्य बजावत होते.
रोहित ज्या ठिकाणी कर्तव्य बजावत होते, त्याठिकाणी उंच टेकडीवर मोठ्या प्रमाणात बर्फ होता. कडाक्याच्या थंडीत कर्तव्य बजावताना बर्फावर पडल्याने रोहित यांच्या डोक्याला जबर मार लागला होता. तेथून त्यांना विमानाने उपचारासाठी 10 नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे आणण्यात होते. डॉक्टरांनी संपूर्ण शरीराची तपासणी केल्यानंतर त्यांच्या डोक्याची नस तुटल्याचं समोर आलं. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करुन डोक्यातील नसचे ऑपरेशन केले होते. मात्र तरीही रोहित प्रतिसाद देत नव्हते. अखेर आज चार वाजता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
जळकोट तालुक्यात या एकाच आठवड्यात विविध कारणाने दोन जवानांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. रोहित यांच्या पश्चात वडील, पत्नी, सहा बहिणी, दोन भाऊ, मुलगा असा परिवार आहे. रोहित यांचे पार्थिव दिल्लीहून विमानाने हैदराबाद येथे आणण्यात येणार असून 15 नोव्हेंबर रोजी जळकोट येथे येणार आहे.
बर्फावर पडून डोक्याला जबर दुखापत, सियाचीनमध्ये लातूरच्या जवानाचा मृत्यू
निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर
Updated at:
13 Nov 2018 07:29 PM (IST)
लातूर जिल्ह्यातील जळकोट येथील रोहित उत्तम शिंगाडे या 29 वर्षीय जवानाचा आज उपचारा दरम्यान मृत्यू झाला. रोहित शिंगाडे हे सन 2007 मध्ये मिल्ट्रीत लान्स नायक म्हणून (सेव्हन महार रेजिमेंट बटालीयन) मध्ये काम करत होते. सियाचीन भागात ते सध्या कर्तव्य बजावत होते
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -