Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Rain Update : नाशिक जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाचा तडाखा, कळवणला पोल्ट्री शेडचे पत्रे उडाले, लासलगाव परिसरात दमदार हजेरी
आज सकाळपासून नाशिक शहरासह जिल्ह्यातील वातावरण निरभ्र होते, मात्र मागील काही दिवसांच्या तुलनेत आजचे तापमान मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून आले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअशातच सायंकाळी जिल्ह्यातील काही भागातील वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. लासलगाव परिसरात मान्सून पूर्व पावसाची दमदार हजेरी लावली असून असह्य उकाड्यापासून नागरिकांची सुटका झाल्याचे दिसून आले.
त्याचबरोबर कळवणला वादळी वाऱ्याने पोल्ट्री शेडचे पत्रे उडाल्याने शेडमधील अनेक पक्षी मृत्युमुखी पडल्याची घटना घडली.
नाशिक शहराचा जिल्ह्यात कालपासून उन्हाची तीव्रता वाढलेली असून आज सकाळपासूनच नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात ढगाळ हवामान दिसून आले. कालही जिल्ह्यातील अनेक भागात अनेक घरांचे नुकसान झाले.
आजही जिल्ह्यातील लासलगावसह कळवण परिसरात वादळीवारासह मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली मात्र वादळी वाऱ्याने घरांसह शाळेचे पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले आहे.
नाशिक जिल्ह्यातील लासलगाव परिसरात मान्सूनपूर्व मोसमी पावसाने दमदार हजेरी लावली..गेल्या काही दिवसांपासून परिसरात उन्हाचा तडाखा वाढला होता..
असह्य अशा उकाड्यापासून नागरिकांची या पावसामुळे सुटका होणार आहे..लासलगाव परिसरात आज अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावल्याने परिसरात नागरिकांची काही काळ तारांबळ उडाली.
मान्सूनपूर्व मोसमी पावसाने परिसरातील शेतीच्या कामाला वेग येणार आहे..या पावसामुळे परिसरात सुखद गारवा निर्माण झाला आहे...
नाशिकच्या कळवण तालुक्यातील पिळकोस येथे झालेल्या वादळी वारा व अवकाळी पावसामुळे कुक्कुटपालन व्यवसायिक तुषार रामचंद्र सूर्यवंशी या शेतकऱ्याच्या पोल्ट्रीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे..
वादळी वाऱ्याने पोल्ट्री शेड कोसळून जमीनदोस्त झाला आहे..कोसळलेल्या पोल्ट्री शेडमुळे पोल्ट्रीतील काही पक्षी मृत्युमुखी पडले आहेत.. पोल्ट्रीचा पंचनामा करून शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे...