Black Holes :  अंतराळ विज्ञानाच्या इतिहासात आगामी काळात मोठी खगोलीय घटना घडू शकतात. अंतराळामध्ये दोन मोठे ब्लॅक होल्स (Black Holes) हे एकमेकांना धडकणार आहेत. नासानं  (NASA) दिलेल्या माहितीनुसार, हे दोन ब्लॅक होल्स एकमेकांजवळ आले आहेत. असा अंदाज लावला जात आहे की गेली दहा कोटी वर्ष हे ब्लॅक होल्स एकमेकांच्या जवळ येत आहेत. यामधील एका ब्लॅक होलला  पीकेएस 2131-021 (PKS 2131-021) असं नाव देण्यात आलं आहे.  हे ब्लॅक होल पृथ्वीपासून सुमारे 900 कोटी  प्रकाशवर्षांच्या अंतरावर फिरत आहेत. शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन ब्लॅकहोल बायनरी कक्षेत पोहोचले आहेत. खगोलशास्त्रज्ञांच्या मते, दोघेही दर दोन वर्षांनी एकदा एकमेकांभोवती फिरतात.अॅस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्समध्ये प्रकाशित झालेल्या रिपर्टनुसार, 10,000 वर्षांनंतर हे दोन ब्लॅक होल एकामेकांमध्ये विलीन होतील. 


दोन ब्लॅक होल एकमेकांना धडकल्यामुळे निघणारे ग्रॅविटेशनल वेव्समुळे (Gravitational Waves) अंतराळाचे कालचक्र बदलू शकते. महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाईन यांनी अंतराळ काळाबद्दल एक भविष्यवाणी केली होती. सुपरमासिव्ह ब्लॅक होल आपल्या सूर्याच्या वस्तुमानापेक्षा लाखो पटीने मोठे आणि अधिक शक्तिशाली आहे. सुपरमासिव्ह ब्लॅक होल बहुतेक आकाशगंगांच्या केंद्रस्थानी स्थित आहेत. खगोलशास्त्र  हे जाणून घेण्यासाठी की हे ब्लॅक होल एवढे मोठे कसे झाले. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की दोन लहान मोठ्या सुपरमासिव्ह ब्लॅक होल विलीन झाल्यामुळे ते इतके मोठे झाले असावेत. 


ब्लॅक होल प्रकाश उत्सर्जन करत नाही. पण ब्लॅक होलमध्ये असणारे गुरुत्वाकर्षण त्यांच्या सभोवतालच्या गरम वायूच्या डिस्क गोळा करू शकते.  पीकेएस 2131-021 हा स्पेशल ब्लॅक होल आहे. या 'ब्लॅक होल'ला ब्लाजार देखील म्हणले जाते. हा एक असा ब्लॅक होल आहे जो जास्त आवेषित झालेल्या कणांच्या लाटेला म्हणजेच जेटला पृथ्वीच्या दिशेने फेकते. या जेटमधील पदार्थ गरम वायूमुळे तयार होतात. जेव्हा हा वायू प्रबळ गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे अवकाशात येतो तेव्हा तो जेट स्वरूपात  येतो. पृथ्वीपासून जवळपास 9 अब्ज प्रकाश-वर्ष दूर असलेले पीकेएस 2131-021 हा  पासाडेना येथील कॅलटेक येथील संशोधकांचा एक गट 13 वर्षांपासून निरीक्षण करत असलेल्या 1,800 ब्लेझर्सपैकी एक आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha