SpaceX Satellites Launch : इलॉन मस्कच्या (Elon Musk) स्पेस व्हेंचर स्पेसएक्सने 47 स्टारलिंक उपग्रह (Starlink Satellites) यशस्वीपणे प्रक्षेपित केले आहेत. टेकक्रंचच्या अहवालानुसार, स्टारलिंक 4-9 मिशन अंतर्गत फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरमधील पॅड 39A वरून 3 मार्च रोजी सकाळी 9.25 वाजता EST (6.25 a.m. PST) उड्डाण केले आणि या वर्षी SpaceX च्या 52 प्रक्षेपणांपैकी हे नववे प्रक्षेपण होते.


फाल्कन 9 बूस्टर 'B1060' ने जून 2020 मध्ये लॉन्च झाल्यापासून 11 उड्डाणे पूर्ण केली आहेत. 47 स्टारलिंक उपग्रह आता अशा इतर 2,000हून अधिक उपग्रहांमध्ये सामील झाले आहेत, जे सध्या पृथ्वीभोवती फिरत असून, जगभरात अगदी दुर्गम भागातही हायस्पीड आणि विना अडथळा इंटरनेट सुविधा प्रदान करतात.


47 उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण!


स्टारलिंकला सध्या 12,000 उपग्रहांपर्यंत आपली कक्षा विस्तार करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मात्र, SpaceXने आणखी 30,000 उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी अर्ज केला होता, असे अहवालात म्हटले गेले आहे. गुरुवारचे प्रक्षेपण आधीच SpaceX साठी वर्षातील सहावे स्टारलिंक मिशन होते. हे संपूर्ण प्रक्षेपण यशस्वी झाले.


परंतु, तिसर्‍या मोहिमेदरम्यान, 3 फेब्रुवारी रोजी, भूचुंबकीय वादळामुळे 49 पैकी 38 स्टारलिंक उपग्रह त्यांच्या अभिप्रेत कक्षेत पोहोचू शकले नाहीत. जेव्हा त्यांनी पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश केला, तेव्हा ते जळून खाक झाले. अहवालात असेही म्हटले आहे की, SpaceX चे पुढील स्टारलिंक प्रक्षेपण 8 मार्च रोजी केप कॅनवेरल स्पेस फोर्स स्टेशन (CCSFS) लॉन्च कॉम्प्लेक्स 40 वरून होणार आहे.


काय आहे स्टारलिंक इंटरनेट सेवा?


स्टारलिंक 2000 हून अधिक सॅटेलाइटचा एक समूह चालवते. ज्याचा उद्देश संपूर्ण पृथ्वीवर इंटरनेट सेवा पोहचवणे आहे. कंपनीने शुक्रवारी आणखी 50 स्टारलिंक सॅटेलाइट लॉन्च केले असून, अनेक सॅटेलाइट पृथ्वीच्या कक्षेत ठेवले जाणार आहेत.


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha