India Weather : सध्या देशाच्या राजधानीसह उत्तर भारतातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. तापमानात वाढ होत असल्याने नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळाला आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीसह उत्तर भारतातील काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातही उन्हाचा चटका वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. तर काही भागात ढगाळ वातावरण असल्याचे दिसत आहे.
महाराष्ट्रात चंद्रपूर, अहनदनगर, नाशिक या जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा वाढला आहे. याठिकाणी ताापमानाचा पारा 37 अंशाच्या पुढे गेल्याने उन्हाची तीव्रता वाढत आहे. तापमान वढल्याने उकाडा वाढला आहे. काही ठिकाणी ढगाळ वतावरण झाल्याने सोमवारी काही भागात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे.
दिल्ली
आज दिल्लीत हवामान स्वच्छ राहमार हे. सुर्यप्रकाश पडणार असल्याने उष्णता वाढू शकते. दरम्यान, काही भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. आज कमाल तापमान 27 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 15 डिग्री पर्यंत राहू शकते.
राजस्थान
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढचे 3 दिवस हवामान कोरडे राहणार आहे. तसेच कडक सूर्यप्रकाश असमार आहे. या काळात उष्णता वाढणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम देखील राज्यातील काही भागात 7 आणि 8 मार्च रोजी दिसून येईल. त्यामुळे आकाश ढगाळ राहील आणि हलक्या रिमझिम पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. तापमानाबाबत बोलायचे झाले तर बहुतांश जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 29 अंश, तर किमान तापमान 14 अंशांपर्यंत राहण्याची शक्यता आहे.
बिहार
बिहारमध्ये हळूहळू हवामान बदलत आहे. गेल्या 24 तासांत राज्यातील हवामान कोरडे होते. त्याचबरोबर पुढील पाच दिवस राज्यात हवामान कोरडे राहिल्याने रात्रीच्या तापमानात विशेष बदल होणार नाही. कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस नोंदवले जाऊ शकते.
पंजाब
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पंजाबमध्ये पुन्हा एकदा हवामानात बदल होणार आहे. उद्यापासून 9 मार्चपर्यंत आकाश ढगाळ राहणार आहे. आज वाऱ्याचा वेग ताशी 25 ते 35 किलोमीटर असू शकतो. त्याचवेळी 7 मार्च रोजी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. आज राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 26 अंश तर किमान तापमान 12 अंश राहील.
जम्मू आणि काश्मीर
भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, आज जम्मू-काश्मीरमध्ये हवामान स्वच्छ असणार आहे. परंतू, दुपारनंतर ढगाळ वातावरण असणार आहे. पावसाची शक्यता नसली तरी, उद्याही ढगाळ वातावरण राहणार आहे. 6 मार्च रोजी हवामानात पुन्हा बदल होईल आणि 7 मार्चपर्यंत अनेक भागात मुसळधार पावसासह बर्फवृष्टी होण्याचा अंदाज सांगण्यात आला आहे. याशिवाय 9 आणि 10 मार्च रोजी वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस पडू शकतो. पाऊस आणि बर्फवृष्टीनंतर राज्यात तापमानात घट झाल्याने थंडी वाढणार आहे. श्रीनगर, काश्मीरमध्ये आज कमाल तापमान 9 आणि किमान तापमान -1 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. आज जम्मूमध्ये कमाल तापमान 24 आणि किमान तापमान 13 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.
उत्तराखंड
आज उत्तराखंडमधील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हवामान स्वच्छ राहणार असून, सूर्यप्रकाशही पडणार आहे. राज्याच्या बहुतांश भागात आज किमान तापमान 4 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 16 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
हिमाचल प्रदेश
हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी आणि पावसामुळे यापूर्वी अनेक भागात किमान तापमानात घट झाली आहे. आज हवामान स्वच्छ असले तरी उद्या पुन्हा ढगाळ वातावरण राहणार आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 14 अंश तर किमान तापमान 0 अंश राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.