एक्स्प्लोर

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, नांदेडमधील हिमायतनगर शहरात बंदची हाक

Maratha Reservation : काही लोकांचा जमाव सध्या पोलीस ठाण्याच्या समोर जमा झाला असून, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक घटनास्थळी दाखल होणार असल्याची माहिती मिळत आहे.

नांदेड : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळत नसल्याने चिंतेत असलेल्या एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील कामारी गावात समोर आली आहे. शासनाच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याची त्याने चिठ्ठी देखील लिहून ठेवली आहे. दरम्यान, या घटनेनंतर आता मराठा समाज आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. या घटनेच्या निषेधार्थ हिमायतनगर शहर बंदची हाक देण्यात आली आहे. तर, या बंदला स्थानिक व्यापाऱ्यांनी पाठिंबा देत बाजारपेठ बंद ठेवले आहे. तसेच काही लोकांचा जमाव सध्या पोलीस ठाण्याच्या समोर जमा झाला असून, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल होणार असल्याची माहिती मिळत आहे. सुदर्शन देवराये असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सुदर्शन देवराये या तरुणाने अनेक आंदोलनात सहभाग घेतला होता. दरम्यान काही दिवसांपूर्वी त्याने गावात साखळी उपोषण देखील सुरु केले होते. मात्र, आरक्षणाचा मुद्दा मार्गे लागत नसल्याने सुदर्शने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी सुदर्शने एक चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यामध्ये, "शासनाच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही,” असा उल्लेख करण्यात आला आहे. तर ही घटना समोर आल्यावर परिसरात खळबळ उडाली आहे. 

मराठा समाज आक्रमक...

मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने सुदर्शन देवराये या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान या घटनेनंतर मराठा समाज आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. आज सकाळी हिमायतनगर शहर बंदची हाक देण्यात आली आहे. तर, मोर्चा देखील काढण्यात आला. दरम्यान याचवेळी काही तरुणांनी टायर देखील पेटवून दिला होता. तर काही लोकांचा जमाव सध्या पोलीस ठाण्यात असल्याचे समोर येत आहे. मात्र, सध्या शहरात पूर्णपणे शांतता असून, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर, कोणीही अफवा पसरवू नयेत असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

आत्महत्या करण्यापूर्वी लिहिली चिठ्ठी

आत्महत्या करण्यापूर्वी सुदर्शन याने एक चिठ्ठी देखील लिहून ठेवली आहे. ज्यात, "मी सुदर्शन ज्ञानेश्वर देवराये कामारी, शासनाच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजास आरक्षण मिळत नसल्यामुळे आत्महत्या करत आहे" असे लिहिलेलं आढळून आले आहे.

उग्र आंदोलन करु नका

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे यांनी आपले उपोषण मागे घेतलं आहे. सरकारने एक महिन्याचा वेळ मागून घेतल्याने त्यांनी उपोषण मागे घेतलं. मात्र, याचवेळी जरांगे यांनी राज्यात कुठेच उग्र आणि हिंसक आंदोलन करु नये असे आवाहन केले आहे. सोबतच शासकीय मालमत्तेचं नुकसान होईल असे पाऊल उचलू नका, असेही म्हटले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Nanded News : मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सहभागी युवकाची आत्महत्या; नांदेडच्या कामारी गावातील घटना

महत्त्वाच्या बातम्या

दिल्ली पोलिसांनी जंतर मंतरवर आंदोलक तरुण, विद्यार्थ्यांवर दणादण लाठ्या उगारताच आंदोलनस्थळी खासदार चंदशेखर, महुआ मोईत्रा, प्रकाश राज दाखल
दिल्ली पोलिसांनी जंतर मंतरवर आंदोलक तरुण, विद्यार्थ्यांवर दणादण लाठ्या उगारताच आंदोलनस्थळी खासदार चंदशेखर, महुआ मोईत्रा, प्रकाश राज दाखल
Ketan Agrawal Case: केतनमध्ये नेमकं काय आवडलं?. सिया हसत म्हणाली 'He Is Caring and Kind'; साखरपुड्यात 'तो' भावनिक व्हिडिओ आला समोर
केतनमध्ये नेमकं काय आवडलं?. सिया हसत म्हणाली 'He Is Caring and Kind'; साखरपुड्यात 'तो' भावनिक व्हिडिओ आला समोर
Samruddhi Mahamarg Accident : इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी संपूर्ण परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, घरी परतताना अपघात, आई वडिलांसह दुसऱ्या मुलीचा होरपळून मृत्यू, पाच जणांचा दुर्दैवी अंत
इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी संपूर्ण परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, घरी परतताना अपघात, आई वडिलांसह दुसऱ्या मुलीचा होरपळून मृत्यू, पाच जणांचा दुर्दैवी अंत
Delhi Jantar Mantar protest: जंतर मंतरवर जमलेल्या आंदोलक तरुणांवर दिल्ली पोलिसांकडून लाठ्या चालवण्यास सुरुवात
Video: जंतर मंतरवर जमलेल्या आंदोलक तरुणांवर दिल्ली पोलिसांकडून लाठ्या चालवण्यास सुरुवात

व्हिडीओ

Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report
Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्ली पोलिसांनी जंतर मंतरवर आंदोलक तरुण, विद्यार्थ्यांवर दणादण लाठ्या उगारताच आंदोलनस्थळी खासदार चंदशेखर, महुआ मोईत्रा, प्रकाश राज दाखल
दिल्ली पोलिसांनी जंतर मंतरवर आंदोलक तरुण, विद्यार्थ्यांवर दणादण लाठ्या उगारताच आंदोलनस्थळी खासदार चंदशेखर, महुआ मोईत्रा, प्रकाश राज दाखल
Ketan Agrawal Case: केतनमध्ये नेमकं काय आवडलं?. सिया हसत म्हणाली 'He Is Caring and Kind'; साखरपुड्यात 'तो' भावनिक व्हिडिओ आला समोर
केतनमध्ये नेमकं काय आवडलं?. सिया हसत म्हणाली 'He Is Caring and Kind'; साखरपुड्यात 'तो' भावनिक व्हिडिओ आला समोर
Samruddhi Mahamarg Accident : इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी संपूर्ण परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, घरी परतताना अपघात, आई वडिलांसह दुसऱ्या मुलीचा होरपळून मृत्यू, पाच जणांचा दुर्दैवी अंत
इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी संपूर्ण परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, घरी परतताना अपघात, आई वडिलांसह दुसऱ्या मुलीचा होरपळून मृत्यू, पाच जणांचा दुर्दैवी अंत
Delhi Jantar Mantar protest: जंतर मंतरवर जमलेल्या आंदोलक तरुणांवर दिल्ली पोलिसांकडून लाठ्या चालवण्यास सुरुवात
Video: जंतर मंतरवर जमलेल्या आंदोलक तरुणांवर दिल्ली पोलिसांकडून लाठ्या चालवण्यास सुरुवात
Jantar Mantar Protest: दिल्ली पोलिसांनीच आणला दगडांनी भरलेला डम्पर अन् काचा फुटलेली कार, वेगळाच प्लॅन? कॉकरोच जनता पार्टीचा गंभीर आरोप, अभिजित दिपकेंनी शेअर केला व्हिडिओ
Video: दिल्ली पोलिसांनीच आणला दगडांनी भरलेला डम्पर अन् काचा फुटलेली कार, वेगळाच प्लॅन? कॉकरोच जनता पार्टीचा गंभीर आरोप, अभिजित दिपकेंनी शेअर केला व्हिडिओ
Delhi Jantar Mantar Protest: दिल्लीच्या जंतरमंतरवर पोलिसांनी सटासट काठ्या फिरवल्या, इंटरनेट सेवा खंडित, मोबाईल जॅमर्स वाढवले, नक्की काय काय घडलं?
दिल्लीच्या जंतरमंतरवर पोलिसांनी सटासट काठ्या फिरवल्या, इंटरनेट सेवा खंडित, मोबाईल जॅमर्स वाढवले, नक्की काय काय घडलं?
Kalyan Crime News: कल्याणमध्ये महिलेने प्रियकराला 'दृश्यम' स्टाईल संपवलं; मृतदेह गोणीत भरला, वास येऊ नये म्हणून..., 'त्या' एका व्हाईस मेलने पोलिसही चक्रावले
कल्याणमध्ये महिलेने प्रियकराला 'दृश्यम' स्टाईल संपवलं; मृतदेह गोणीत भरला, वास येऊ नये म्हणून..., 'त्या' एका व्हाईस मेलने पोलिसही चक्रावले
Jantar Mantar Protest Delhi: दिल्लीतील पाच मेट्रो स्थानकं बंद केली, जंतरमंतरवर वॉटर कॅनन अन् वज्र वाहन, रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सच्या जवानांचा फौजफाटाही आणला
दिल्लीतील पाच मेट्रो स्थानकं बंद केली, जंतरमंतरवर वॉटर कॅनन अन् वज्र वाहन, रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सच्या जवानांचा फौजफाटाही आणला
Embed widget