एक्स्प्लोर

Farmer Suicide : बँकेचे कर्ज कसे फेडायचे? मराठवाड्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

Farmer Suicide : कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ यामुळे मराठवाड्यातील शेतकरी टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवत आहे.

नांदेड : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या (Farmer Suicide) काही थांबायला तयार नाहीत. आता पुन्हा एकाच दिवशी दोघांनी बँकेचे कर्ज कसे फेडायचे? या विवंचनेतून जीवन संपवलं आहे. नांदेड (Nanded) जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील आदमपूर येथील हज्यपा मष्णाजी झेलते आणि परभणीच्या (Parbhani) जिंतूर शहरातील पाटील विहीर परिसरातील विलास रामराव रोकडे (वय 45) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची नावं आहेत. 

नांदेडच्या आदमपूर येथील हज्यपा मष्णाजी झेलते या शेतकऱ्याने नापिकी व कर्जामुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी (5 नोव्हेंबर) रोजी पहाटेच्या वेळी सर्वजण गाढ झोपेत असतानाच त्याने घरातच गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली आहे. हज्यपा मष्णाजी झेलते हा अल्पभूधारक शेतकरी आहे. तसेच शेतमजूरी करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. मात्र, यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी अती तर कधी कमी पावसामुळे शेतातील पिके वाया गेली. त्यामुळे शेतातील पिकांवर काढलेले कर्ज कसे फेडायचे या तणावात हज्यपा असायचे. दरम्यान, शनिवारी घरातील सर्वजण रात्री राहत्या घरी झोपी गेला. यानंतर रविवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास घरातील सर्वजण गाढ झोपेत असतानाच त्याने घरातच गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. सकाळी उठल्यावर घरच्यांना हज्यपाने आत्महत्या केल्याचे समजले. 

परभणीत देखील शेतकरी आत्महत्या...

दुसरी आत्महत्या परभणीच्या जिंतूर शहरातील पाटील विहीर परिसरातील समोर आली आहे. विलास रामराव रोकडे असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने सोयाबीनच्या उतारात मोठी घट आली आहे. त्यामळे येणारी दिवाळी कशी साजरी करायची?, बँकेचे कर्ज कसे फेडायचे?, संसाराचा गाडा कसा चालवावा?, मुलांचे शिक्षण, मुलीचे लग्न, पिकाचा खर्च, तसेच औषधाची उधारी कशी फेडायची? अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उभे राहिले. या विवंचनेतन त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. 

परिस्थिती भयंकर...

मागील तीन-चार वर्षांपासून मराठवाड्यात सतत अतिवृष्टी होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यातच यंदा काही तरी हातात येईल अशी अपेक्षा असतांना पावसाने पाठ फिरवली आणि अनेक भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावात पिण्यासाठी पाणी नसल्याने शासनाकडून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तर अनेक प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. हिवाळ्यात अशी अवस्था असून, उन्हाळ्यात परिस्थिती भयंकर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने आत्तापासून पाण्याचे नियोजन करण्याची मागणी होत आहे. विशेष म्हणजे याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत असून, त्यामुळे शेतकरी टोकाचे पाऊल उचलत आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Farmer Suicide : औरंगाबाद हादरलं! एकाच दिवशी तीन शेतकऱ्यांची आत्महत्या, दोघांनी विष तर एकाने घेतला गळफास

महत्त्वाच्या बातम्या

बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
Embed widget