एक्स्प्लोर

Nanded : अभ्यास केलेलं परीक्षेत आलंच नाही, मग बहाद्दराने उत्तर पत्रिकांवर चिपकवल्या 500 च्या नोटा

Swami Ramanand Teerth Marathwada University : नांदेड विद्यापीठातील 2008 विद्यार्थ्यांपैकी 1720 विद्यार्थी कॉपी करताना सापडले. त्यांच्यावर एक वर्षाच्या बंदीची कारवाई करण्यात आली. 

नांदेड : नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने घेतलेल्या उन्हाळी परीक्षेमध्ये कॉपी करताना सापडलेल्या 1720 विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांवर एका वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. तर एका विद्यार्थ्याने त्याच्या सात उत्तर पत्रिकांवर प्रत्येकी पाचशेच्या नोटा चिपकवल्या होत्या, त्याच्यावर चार परीक्षा न देण्याची बंदी घालण्यात आली आहे. 

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षेत चार विद्याशाखांमधील चक्क 85.66 टक्के विद्यार्थ्यांनी कॉपी केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या आदेशानुसार, चार विद्याशाखांमध्ये एकूण 1720 विद्यार्थ्यांवर सर्व संपादणूक रद्द (डब्ल्यूपीसी-होल परफॉर्मन्स कॅन्सल) अशी कडक शिक्षा करण्यात आली.

अभ्यास केलेलं परीक्षेत आलं नाही, म्हणून 500 च्या नोटा चिपकवल्या

एका विद्यार्थ्याने त्याच्या सातही उत्तरपत्रिकांवर पाचशेच्या नोटा चिपकवल्या होत्या. या गैरवर्तणुकीचे प्रकरण महाराष्ट्र सार्वजनिक अधिनियम 2016 अन्वये विद्यापीठाच्या गठित 48 (5) (अ) समितीपुढे चौकशीसाठी ठेवण्यात आले होते. त्या विद्यार्थ्यावर चार परीक्षा बंदीची कारवाई करण्यात आली. अभ्यास केलेला पण त्यामधील काहीच आलं नाही असं त्या विद्यार्थ्याने समितीपुढे सांगितलं.  समितीने या गैरवर्तणुकप्रकरणी सखोल चौकशी करून संबंधित विद्यार्थ्यांची सर्व विषयांची संपादणूक रद्द करून त्यास पुढील एकूण चार परीक्षांसाठी बंदी घालण्यात आलेली आहे. 

विद्यापीठाच्या उन्हाळी-2023 परीक्षांमध्ये एकूण 2008 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यात कॉपी करणाऱ्या मानव्य विद्याशाखेतील 488 विद्यार्थी, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेतील 278, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील 339 आणि आंतरविद्याशाखेतील 615 असे एकूण 1720 विद्यार्थ्यांची सर्व संपादणूक रद्द करण्यात आली. म्हणजेच या वर्षी अथवा या सेमिस्टरमध्ये देण्यात आलेल्या सर्व परीक्षांचा निकाल हा शून्य करण्यात येतो. यामधील दोन विद्यार्थ्यांचा निकाल हा राखीव (आरटीडी-रिझल्ट टू बी डिक्लेअर्ड) ठेवण्यात आला. गैरवर्तणूक केलेल्यांपैकी तीन विद्यार्थ्यांना सर्व संपादणूक रद्द आणि अधिक चार परीक्षांसाठी बंदी, अशीही कडक शिक्षा केलेली आहे. 

दरम्यान, नांदेड येथील मूल्यांकन केंद्रावर ही बाब परीक्षकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्या सातही उत्तरपत्रिका जशाच्या तशा सीलबंद करून विद्यापीठाकडे पाठवल्या. लातूर जिल्ह्यातील एका परीक्षा केंद्रावर बनावट प्रवेश परीक्षा प्रमाणपत्र तयार करून महाविद्यालयातील दुसऱ्याच तोतया विद्यार्थ्याने परीक्षा दिली. परीक्षेच्या शेवटच्या दिवशी ही बाब परीक्षा केंद्राच्या लक्षात आली. चौकशीअंती दोघांनीही गुन्हा कबूल केला. याबाबत दोघांचीही उन्हाळी-2023 परीक्षेतील संपादणूक रद्द करून त्यांच्यावर पुढील चार परीक्षांसाठी बंदी घालण्यात आलेली आहे.

आकडेवारी

  • एकूण विद्यार्थी- 2008 
  • कॉपीबहाद्दर- 1720 
  • मानव्य शाखा- 488 
  • वाणिज्य- 278 
  • विज्ञान शाखा- 339 
  • आंतरविद्याशाखा- 615 

ही बातमी वाचा: 

मी गेल्या 2 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं

Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
Embed widget