एक्स्प्लोर

Nanded: जिथं अद्याप नाही इंटरनेट, तिथं स्कॉलरशिपचा निकाल 100 पर्सेंट; नांदेडच्या पांगरपहाड झेडपी शाळेचं थक्क करणारं यश

जिल्हा परिषद पांगरपहाड शाळेचा शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला आहे. नांदेडच्या पांगरपहाड झेडपी शाळेचं कौतुक होत आहे. 

Nanded ZP School News:  जिथं टीव्ही नाही, फोनला नीट रेंज नाही, इंटरनेटचा पत्ता नाही अशा एका गावातील झेडपी शाळेच्या यशाचं सध्या कौतुक होत आहे. भौतिक सुविधांपासून वंचित असलेल्या नांदेडमधील पांगरपहाड गावच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती व शाळेचा निकाल 100 टक्के लागला आहे. किनवट तालुका मुख्यालयापासून 60 किमी अंतरावर असणाऱ्या पांगरपहाड गावच्या जिल्हा परिषद शाळेचा शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल 100 लागला आहे. 

डोंगर माथ्यावर शहरापासून दूर असणाऱ्या आणि तंत्रज्ञान युगातही मोबाईल, इंटरनेट तर सोडा पण टीव्हीही नसणाऱ्या गावाने शैक्षणिक प्रगती करून वेगळा आदर्श घालून दिला आहे.किनवट तालुका मुख्यालयापासून 60 किलोमीटर अंतरावर आदिवासी बहुल, तेलंगणा सीमेवरील अतिदुर्गम  क्षेत्रातील शाळांमधील विद्यार्थ्यांचा हा प्रगतीचा आलेख आहे. 

डोंगर माथ्यावर, दरीखोऱ्यात वसलेल्या पांगरपहाड येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा 2022 मध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. पांगरपहाड येथील शाळेसह शिष्यवृत्ती परीक्षेचाही निकाल 100 टक्के लागला आहे. ज्यात सहापैकी सहा विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.  

या शाळेतील कार्तिक विनोद जाधव, अक्षय जितेश जाधव, गायत्रीदेवी सुनील जाधव, अस्मिता रवींद्र राठोड हे चार विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले असून तनवी संतराम जाधव व कृष्णा विक्रम जाधव शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे  विद्यार्थी त्यांना मार्गदर्शन करणारे शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

कोविड काळात शाळा ऑनलाइन झाल्या पण ज्याठिकाणी इंटरनेटच नाही, अशा पांगरपहाड सारख्या गावात, कोविड सारख्या परिस्थितीवर मात करत सुविधांचा अभाव असतानाही गुणवत्ता न ढसाळता विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळवलं आहे. 

या गावात रस्ते,रोड,नाल्या,आरोग्य केंद्र या भौतिक सुविधाही नाहीत. ज्या गावातून भ्रमण ध्वनीवरून संदेश द्यायचा असेल तर पाण्याच्या टाकीवर चढावं लागतं, तेव्हा कसाबसा संपर्क होतो. अशा ठिकाणी ना टीव्ही, ना नेट, ना मोबाईल नेटवर्क, परंतु तरीही येथील शैक्षणिक गुणवत्ता उच्च कोटीची ठरलीय. या गावासह तिथले विद्यार्थी आणि शिक्षकाचं आज सर्वस्तरातून कौतुक करण्यात येत आहे. 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

NHAI Toll Pass: 'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NHAI Toll Pass: 'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
Jaggery Price Hike : साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
Embed widget