नांदेड : नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूनंतर (Nanded Hospital Death Case)   शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार हेमंत पाटील (Hemant Patil)  यांनी रुग्णालयाला भेट दिली. यावेळी रुग्णालयातील अस्वच्छता पाहून संतापलेल्या हेमंत पाटलांनी थेट रुग्णालयाच्या डीनलाच स्वच्छतागृह साफ करायला लावले. हे प्रकरण हेमंत पाटलांना भोवले असून त्यांच्याव अॅट्रोसिटीचा  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारानंतर विरोधकांनी टीका करत थेट राजीनाम्याची मागणी केली होती. अखेर  खासदार हेमंत  पाटलांवर  नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात  रात्री उशीरा गुन्हा दाखल  करण्यात आला आहे.  स्वतः डीन डॉ.  एस. आर. वाकोडे यांनी तक्रार दाखल केली. ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश भांडारवाड यांनी ही माहिती दिली,   


डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेडच्या अधिष्ठातांबरोबर खासदार हेमंत पाटील यांनी केलेल्या गैरवर्तवणुकीसंदर्भात सेंन्ट्रल मार्ड आक्रमक झाले आहे  खासदार हेमंत पाटील यांनी झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागावी, अन्यथा डाॅक्टर्स महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. घडलेल्या प्रकारामुळे फक्त अधिष्ठाता यांचे मानसिक खच्चीकरण झालेले नाही तर संपूर्ण डॉक्टरांसाठी अपमानास्पद गोष्ट आहे.  हेमंत पाटील यांनी माफी न मागितल्यास आंदोलनाचा इशारा मार्डकडून देण्यात आला आहे.   सोबतच राज्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडल्यास सरकार जबाबदार राहणार, अशी भूमिका सेंट्र्ल मार्डनं घेतली आहे. 


रुग्णालयाच्या अनास्थेपोटी हे कृत्य केले : हेमंत पाटील


घडलेल्या प्रकारानंतरृ सुप्रिया सुळेंनी ताशेरे ओढलेत. सरकारने त्या मंत्र्याचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केलीये. तर रुग्णालयाच्या अनास्थेपोटी असं कृत्य केल्याची प्रतिक्रिया हेमंत पाटलांनी दिली. हेमंत पाटील पुढे म्हणाले,  रुग्णालयात 260 कर्मचारी स्वच्छतेसाठी आहेत. 36 रुग्ण दगावल्यानंतरही अधिकारी स्वतः चेंबरमधून बाहेर येत नाही आणि यामुळे प्रचंड अनास्था या रुग्णालयात पाहायला मिळत आहे.  रुग्णालयातील अनास्थेच्या चिडीपोटी मी हे कृत्य  केले आहे आणि त्यांनीच नाहीतर मी स्वतः देखील सफाई केलेली आहे.


मंगळवारी घडले काय?


नांदेडच्या डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय आणि रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर रुग्णालयाचा अनागोंदी कारभार समोर आला आहे.  यावेळी रुग्णालयातील स्वच्छतागृह हे अतिशय घाणेरड्या स्थितीत होते.अनेक  शौचालय हे ब्लॉक होते. काही ठिकाणी तर स्वच्छतागृहात देखील नव्हते. त्यानंतर रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना (डीन) स्वच्छतागृह साफ करायला लावलं. 



 


हे ही वाचा :


एकाच बेडवर तीन-चार बालकांवर उपचार; नांदेड प्रकरणात धक्कादायक माहिती आली समोर; 'त्या' दोन दिवसांत नेमकं काय घडलं?