नांदेड : गेल्या 24 तासांत 24 रुग्णांच्या मृत्यूनंतर नांदेड शासकीय रुग्णालय (Nanded Government Hospital) चर्चेत आले आहे. या घटनेनंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे. मात्र, आता याच रुग्णालयाबाबत आणखी काही धक्कादायक माहिती समोर येत आहे. कारण या रुग्णालयात असलेल्या अपुऱ्या सुविधांमुळे रोज तीन-चार बालकांचे मृत्यू होत असल्याचे समोर येत आहेत. विशेष म्हणजे नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मागील दोन दिवसांत लहान बालकांचे झालेल्या मृतांचा आकडा या रुग्णांलयातील आजवरचा सर्वात मोठा आकडा ठरला आहे. ज्यात पहिल्या दिवशी 11 आणि दुसऱ्या दिवशी 5 असे एकूण 16 बालकांचे दोन दिवसांत मृत्यू झाले आहेत. 


नांदेडच्या शासकीय रुग्णालयात असलेल्या अतिदक्षता विभागातल्या अपुऱ्या सुविधांमुळेच बालकांचे बळी गेला आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. कारण या रुग्णालयात रोज तीन-चार बालकांचा मृत्यू होत असल्याचे समोर येत आहे. तर, मागील दोन दिवसांत 16 बालकांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे रुग्णालयात असलेल्या अपुऱ्या सुविधा याला कारणीभूत असल्याचे समोर येत आहे. या रुग्णालयात एकूण 24 वार्मर म्हणजेच अतिदक्षता बेड होते. पण या 24 बेडवर तब्बल 65 बालकांवर उपचार सूरू होते. एकाच वेळी एका बेडवर तीन ते चार बालकांवर उपचार सूरू होते. यातून एकमेकांना इन्फेक्शन होवून बालके दगावली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. धक्कादायक म्हणजे आधीच वार्डात 65 बालके असतांना आणखी वाढीव नवीन ॲडमिशन 20 झाले होते. त्यामुळे अपुऱ्या सुविधांमुळे सुरवातील 11 बालके आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी 5 बालकांचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. 


वैद्यकीय महाविद्यालयात मुलांना शिकवण्यासाठी 5 बेडची गरज असते.पण, बाजूच्या जिल्ह्यात नवजात शिशू अति दक्षता विभाग नसल्याने बेडची संख्या वाढवली गेली होती.  त्यामुळे 24 बेड केले गेले. पण यावेळी 65 बालके उपचारासाठी दाखल झाली. यातील 16 बालकांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे या 16 पैकी खाजगी आणि इतर ठिकाणाहून 6 बालकं रुग्णालयात दाखल झाले होते.  ही सहाही बालके गंभीर आजारी होते आणि त्यांना वेंटीलेटर ठेवण्यात आले होते. मात्र, अपुऱ्या सुविधा त्यांच्या मृत्येचे कारण ठरल्याचे आरोप होत आहे. 


मुश्रीफ यांच्याकडून पाहणी... 


24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेची गंभीर दखल सरकारने घेतली आहे. तर, नांदेड येथील डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ तसेच पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी केली आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी देखील उपस्थित होते. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Nanded Death : नांदेडमधील घटना गांभीर्याने घेतलीय, चौकशी करून कारवाई करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन