नांदेड: नांदेडच्या (Nanded Hospital Death Case)  डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय आणि रुग्णालयांमध्ये 24 तासांमध्ये 24 रुग्णांचा आणि त्यानंतरच्या 24 तासात सात रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर राजकारण तापले आहे.  एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी आज या रुग्णालयात येऊन पाहणी केली.  यावेळी  नांदेड- रुग्णालयात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले होते. हे पाहिल्यानंतर खासदार हेमंत पाटील यांची धक्कादायक कृती समोर आली आहे. रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना (डीन) स्वच्छतागृह साफ करायला लावलं आहे. एवढच नाही तर  हेमंत पाटील यांनी रुग्णालय प्रशासनाला खडेबोल  देखील  सुनावले आहे. 


नांदेडच्या डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय आणि रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर रुग्णालयाचा अनागोंदी कारभार समोर आला आहे.  यावेळी रुग्णालयातील स्वच्छतागृह हे अतिशय घाणेरड्या स्थितीत होते.अनेक  शौचालय हे ब्लॉक होते. काही ठिकाणी तर स्वच्छतागृहात देखील नव्हते, असे खासदार हेमंत पाटील म्हणाले. रुग्णालयात सर्व अनागोंदी कारभार सुरू असून दोषींवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. 


पाहा व्हिडीओ : 



सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी


 नांदेडच्या शासकीय रुग्णालयात गेल्या 36 तासात 31 रुग्णांचा मृत्यू झाल्याने अनेक राजकीय नेते आता नांदेडच्या शासकीय रुग्णालयाकडे धाव घेत आहेत.शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी देखील रुग्णालयाला भेट  दिली. रुग्णालयात फिरून त्यांनी आढावा घेतला आहे.रुग्णालयातील असुविधा पाहून हेमंत पाटील यांनी रुग्णालय प्रशासनाला खडे बोल सुनावले.रुग्णालयात सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे. पिण्याच्या पाण्याची सोय नाहीय.अशातच औषधाचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णालयात मृत्यूचे सत्र सुरू झाले आहे. रुग्णालय प्रशासनातील दोषी अधिकाऱ्यांवर डॉकटरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी खासदार हेमंत पाटील यांनी केलीय. 


शासकीय रुग्णालय प्रशासन अलर्टवर


 नांदेड शासकीय रुग्णालयात 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  या मृत्यूप्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.  ही चौकशी समिती आता रुग्णालयात चौकशी करणार आहे.  चौकशी समिती येणार आहे म्हणून आता शासकीय रुग्णालय प्रशासन अलर्टवर आहे. रुग्णालय परिसरात सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.  सकाळपासून स्वच्छता सुरु आहे आहे. 


हे ही वाचा :                                     


छत्रपती संभाजीनगरात 10 नव्हे 18 रुग्णांचा मृत्यू, 2 बालकांचाही समावेश; शरद पवारांकडून ट्वीट