एक्स्प्लोर

दारूसाठी पैसे न दिल्याने राग आला, मित्रच मित्राचा 'मारेकरी' झाला; नांदेड जिल्ह्यातील धक्कादायक घटना

Nanded Crime News : दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून झालेल्या वादात दोघांनी गावातील एकाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Nanded Crime News : मागील काही दिवसांत खुनाच्या घटना वाढतांना पाहायला मिळत आहे. छोट्या-छोट्या आणि शुल्लक कारणावरून थेट हत्या सारखे टोकाचे पाऊल उचलले जात आहे. त्यामुळे माणसाच्या जीवाची किंमत संपली आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, अशीच काही घटना नांदेड (Nanded) जिल्ह्यात समोर आली आहे. दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून झालेल्या वादात दोघांनी गावातील एकाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. यातील एका आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मारोती नागोराव जाधव (वय 38 वर्षे, रा. मंडगी, ता. देगलूर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तर मलिकार्जुन लक्ष्मण लोणे व श्रीनिवास निवृत्ती लोणे (रा. मंडगी) असे आरोपींचे नावं आहेत. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,नांदेडच्या देगलूर तालुक्यातील मंडगी गावातील मारोती जाधव आणि मलिकार्जुन लोणे, श्रीनिवास लोणे यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यामुळे अनेकदा ते सोबत राहत होती. गरज पडल्यास एकेमकांना पैसे देखील देत होते. दरम्यान एक महिन्यापूर्वी मयत मारोती जाधव यास श्रीनिवास लोणे यांनी दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते. परंतु, मारोतीने पैसे देण्यास नकार दिला. याचा राग आल्याने लोणे याने वाद घातला. त्यामुळे यावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. मात्र, गावातील नागरिकांनी पुढाकार घेऊन त्यांच्यातील वाद मिटविला होता. परंतु, श्रीनिवास लोणे यांच्या मनात राग कायम होता. 

दरम्यान, 29 जुलै रोजी मृत मारोती यांच्या घरी कोणीही नव्हते. याचाच फायदा घेत सायंकाळी साडेसात ते आठ वाजेच्या दरम्यान दोन्ही आरोपींनी मारोतीच्या घरी येऊन त्यास मंडगी फाट्याकडे रोडने घेऊन गेले. त्यानंतर रात्री दहा ते साडेदहा वाजताच्या सुमारास हे दोन आरोपी परत येताना गावातील नागरिकांनी पाहिले. मात्र, त्यांच्यासोबत मृत मारोती नसल्याने त्यांच्यावर संशय बळावला होता. विशेष म्हणजे, मारोती जाधव हा रात्री घरी न आल्याने त्याच्या कुटुंबीयांनी रविवारी त्याची शोधाशोध सुरु केली. तेव्हा गावातील रोड लगत, पाण्याच्या डबक्याजवळ मारोती जाधव हा मृत अवस्थेत दिसून आला. त्याच्या डोक्यात, पाठीवर, कपाळावर मारून खून करण्यात आला होता. 

पोलिसांनी एक आरोपीला ठोकल्या बेड्या 

दरम्यान याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तत्काळ तपासाची चक्र फिरवली. यावेळी लोणे आणि मारोती यांच्यातील वादाची पोलिसांना माहिती मिळाली. तसेच, रात्री मारोतीला सोडून दोघेच परत आल्याची माहितीही गावकऱ्यांनी पोलिसांना दिली. त्यामुळे पोलिसांनी मलिकार्जुन लक्ष्मण लोणे यास पळून जाण्याच्या तयारीत असताना नरंगल येथून ताब्यात घेतले आहे.   

इतर महत्वाच्या बातम्या: 

 Nanded : चालकाच्या एका हातात स्टिअरिंग तर दुसऱ्या हातात वायपर; एसटी बसचे आठवड्याभरात चार धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

महत्त्वाच्या बातम्या

Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget