एक्स्प्लोर

धक्कादायक! मुलीच्या मागे का लागतोस म्हणत 10-12 जणांनी तरुणाला भोसकून संपवले, नांदेडमध्ये खळबळ

शेख अराफत असे मृत तरुणाचे नाव आहे. मारहाण करणारे तरुणीचे नातेवाईक असल्याची प्राथमिक माहिती आहे.

Nanded Crime: राज्यात गुन्हेगारीनं डोकं वर काढलं आहे. दिवसाढवळ्या होणाऱ्या हत्या, लैंगिक अत्याचार, किरकोळ कारणाने मारहाण, गुंडगिरी, किरकोळ कारणाने होणारे खून वाढले असून राज्यात कायदा सुव्यवस्था शाबूत आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होतोय. नांदेडमध्ये मुलीच्या मागे का लागतोस म्हणत 10-12 जणांनी 21 वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नांदेड जिल्ह्यातील हदगाव शहरात या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी हदगाव पोलिसांनी 10 जणांवर  गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक केली आहे. शेख अराफत असे मृत तरुणाचे नाव आहे. मारहाण करणारे तरुणीचे नातेवाईक असल्याची प्राथमिक माहिती आहे. (Crime News)

21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7.30 च्या सुमारास घराजवळील मोकळ्या जागेत बसला असताना दहा बार जणांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्याजवळ असणाऱ्या लाकडानेही मारहाण करत मुलास वाचवण्यासाठीमध्ये पडलेल्या तरुणाच्या आईसही मारहाण केल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.

नक्की झाले काय?

आमच्या मुलीच्या मागे लागून त्रास दितोस, तिच्यावर नजर ठेवतोस म्हणत तरुणीच्या 10-12 नातेवाईकांनी 21 वर्षीय तरुणाला लाथा बुक्क्यांनी, लाकडाने मारहाण केली. मुलाला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या आईसही मारहाण केली. नंतर तरुणास चाकूने भोसकून ठार केल्याची घटना हादगाव शहरात घडली आहे.  या घटनेनंतर शहरात मोठी खळबळ उडाली असून हदगाव पोलिसांनी या प्रकरणी 10 जणांना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हाही दाखल केला आहे. शेख अराफत असे मृत तरुणाचे नाव आहे. तरुणीच्या नातेवाईकांनीच हा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

नाशिकमध्ये अतिक्रमण प्रकरणी तणावपूर्ण शांतता

शहरातील काठे गल्ली (Kathe Galli) परिसरातील वादग्रस्त धार्मिक स्थळाचे अतिक्रमण काल नाशिक महानगरपालिकेने हटवले. हिंदू संघटनांनी आंदोलनाचा इशारा देखील दिला होता. यावेळी दोन गट आमने-सामने आल्याने नाशिक शहरात तणावाचे वातावरण पाहायला मिळत होते. वादग्रस्त धार्मिक स्थळाच्या परिसरातील अतिक्रमण हटवल्याची माहिती नाशिक महानगरपालिकेने (Nashik NMC) दिली आणि प्रशासनासोबत झालेल्या बैठकीनंतर हिंदू संघटनांनी सात दिवस आंदोलन स्थगित केल्याचा निर्णय घेतला. मात्र रात्रभरापासून नाशिक शहरातील काठे गल्ली परिसरात पोलिसांचा खडा पहारा पाहायला मिळत आहे. सध्याचे वातावरण नियंत्रणात असले तरी देखील काहीसे तणावाचे वातावरण दिसून येत आहे. 

हेही वाचा:

ST Bus Karnataka: कर्नाटकमध्ये महाराष्ट्राच्या बसचालकाला मारहाण, पुण्यामध्ये उमटले पडसाद, कर्नाटकची बस अडवली अन्...

मी गेल्या 2 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

NHAI Toll Pass: 'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NHAI Toll Pass: 'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
Jaggery Price Hike : साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
Embed widget