एक्स्प्लोर

डॉक्टरच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमुळे महिलेची प्रसूती लांबवण्यात आली, नांदेड रुग्णालयाचा आणखी एक कारनामा?; दानवेंचा गंभीर आरोप

Ambadas Danve : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नांदेडच्या शासकीय रुग्णालयाच्या डॉक्टरांवर गंभीर आरोप केला आहे.

नांदेड : शहरातील शासकीय रुग्णालयात 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान, यावरून प्रशासन आणि सरकारवर जोरदार टीका होत आहे. मात्र, यासाठी प्रशासन जबाबदार नसल्याचा दावा सतत सरकारकडून केला जात आहे. असे असतानाच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी नांदेडच्या शासकीय रुग्णालयाच्या (Nanded Government Hospital) डॉक्टरांवर गंभीर आरोप केला आहे. या रुग्णालयात डॉक्टरच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमुळे (Birthday Celebration) एका गरोदर महिलेची प्रसूती लांबवण्यात आली होती, असा आरोप दानवे यांनी केला आहे. 

दानवे हे आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शासकीय रुग्णालयात जाऊन पाहणी केली. सोबतच याच रुग्णालयात मृत्यू पडलेल्या एका रुग्णांच्या नातेवाईकाच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस देखील केली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दानवे यांनी सरकार आणि रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले."नांदेडच्या शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यू हे सरकारच्या हलगर्जीपणाचा कळस आहे असं माझं स्पष्ट मत आहे. औषधांची कमतरता, निष्काळजीपणा, वर्षानुवर्षे मंजुरीसाठी पडून राहिलेल्या फाईली हेच या घटनेच्या मागचे कारण आहे. कोणत्या डॉक्टरच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमुळे एका गरोदर महिलेची प्रसूती लांबवण्यात आली, ज्याची किंमत तिला आणि तिच्या बाळाला जीव देऊन चुकवावी लागली? सरकार सांगेल का?, असे दानवे म्हणाले. 

पुढे बोलतांना दानवे म्हणाले की, "चौकशी वगैरे हे सगळे फार्स आहे. मनुष्यबळ अपुरे असेल तर ते का दिले गेले नाहीत? इथे लोक मारतात आणि सरकारचे सर्वेसर्वा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि सुपर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  हे दिल्लीला मुजरा मारायला जातात, हे वाईट आहे. तातडीने आनंदाचा शिधा मंजूर होतो (वाटला जातो की नाही, देव जाणे) पण औषधी आणि रुग्णालयात सुविधा देण्यासंबंधीच्या फाईली लाल फितीत अडकतात, हे मुख्यमंत्र्यांना दिसत नाही का?, पालकमंत्री नियमितपणे रुग्णालयात येऊन बसले, आढावा घेतला तर डॉक्टरांची निष्काळजीपणा करण्याची हिंमतच होणार नाही, असे दानवे म्हणाले. 

दानवेंकडून रुग्णालयाची पाहणी

नांदेड येथील शासकीय रुग्णालयातील मृत्यू तांडवनंतर यावरून राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान आज अंबादास दानवे यांनी रुग्णालयात जाऊन पाहणी केली. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच, संबधित अधिकाऱ्यांसोबत देखील चर्चा केली. 24 तासांत 24 रुग्ण कसे दगावले याबाबत महिती देखील घेतली. तर, रुग्णालयात अस्वच्छता असून, औषधांचा देखील तुटवडा असल्याचे दानवे या पाहणीनंतर माध्यमांशी बोलतांना म्हणाले.  

इतर महत्वाच्या बातम्या: 

Nanded : नांदेडच्या घटनेसंबंधी राज्य सरकारची कानउघाडणी करत उच्च न्यायालयाची सुमोटो याचिका, उद्या तातडीने होणार सुनावणी

महत्त्वाच्या बातम्या

Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Embed widget