एक्स्प्लोर

Ashok Chavan : अवकाळीमुळे नांदेड जिल्ह्यातील पिकं जमीनदोस्त, शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा; काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची मागणी

Ashok Chavan : नांदेड (Nanded) जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा अशी मागणी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केली.

Ashok Chavan : राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसाचा शेती पिकांना (Agriculture Crop) मोठा फटका बसला आहे. या पावसामुळे राज्यातील बळीराजा संकटात सापडला आहे. नांदेड (Nanded) जिल्ह्यातही अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. यामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. याबाबत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस आमदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत (Abhijit Raut) यांच्याशी संपर्क करुन, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची मागणी केली आहे. अशोक चव्हाण हे आज (17 मार्च) नांदेडमध्ये येणार असून ते नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. तसेच शेतकऱ्यांशी संवादही साधणार आहेत.

अवकाळी पावसामुळे केळीच्या बागा आडव्या

नांदेड जिल्ह्यातील मुदखेड, अर्धापूर, नांदेड या तालुक्यातील बहुतांश गावांना अवकाळी पावसाचा मोठा फटका  बसला आहे. केळीच्या बागा आडव्या झाल्या आहेत. टरबूज, खरबूज पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. रानात गारांचा खच पडला होता. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी अशोक चव्हाण आज करणार आहेत. दरम्यान, याबाबत नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून, नुकसानग्रस्तांना तातडीने मदत करावी, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली. तसेच सर्व यंत्रणा कामाला लावून पंचनामे करण्याच्या सूचनाही अशोक चव्हाण यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना दिल्या.

रब्बी पिकं जमीनदोस्त 

पाऊस आणि गारपिटीमुळे नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी केळीच्या बागांचे मोठं नुकसान झालं आहे. त्याचबरोबर अन्य पिके पाण्याखाली बुडाली आहेत. शेतकऱ्यांचे शेतातील टिनशेड या वादळी वाऱ्यात उडून गेल्याने बारड परिसरात हाहाकार उडाला आहे. तसेच गहू, ज्वारी, हरभरा या रब्बींच्या पिकांनाही अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. वादळी वारा आणि जोरदार झालेल्या पावसामुळे गहू आणि ज्वारीची पिके जमीनदोस्त झाली आहेत. 

राज्यात 20 मार्चपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता 

सध्या रब्बी पिकांच्या काढणीचे दिवस सुरु आहेत. अशातच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, या पावसामुळे वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. यामुळे मानवी आरोग्यासही परिणाम होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात 20 मार्चपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामानातील बदलामुळे (Climate Change) शेती पिकांना फटका बसत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Maharashtra Rain : राज्यात बहुतांश ठिकाणी अवकाळी पाऊस; रब्बी पिकांना मोठा फटका, बळीराजा चिंतेत

मी गेल्या 2 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

रामटेकमध्ये दुर्मिळ नानेटी अल्बिनो सापाचे दर्शन, पाहायला गर्दी; सर्पमित्रांकडून नैसर्गिक अधिवासात रेस्क्यू
रामटेकमध्ये दुर्मिळ नानेटी अल्बिनो सापाचे दर्शन, पाहायला गर्दी; सर्पमित्रांकडून नैसर्गिक अधिवासात रेस्क्यू
Bhuleshwarcha Raja Marathi News: नागरिक म्हणाले, खड्ड्यांमुळे भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; आता अग्निशमन दलाने सांगितलं नेमकं कारण!
नागरिक म्हणाले, खड्ड्यांमुळे भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; आता अग्निशमन दलाने सांगितलं नेमकं कारण!
Baramati News: इमारतीच्या टेरेसवर कडी लावलेली; एक चप्पल वरती पडलेली; रोहित पवारांच्या पीएच्या मुलीच्या पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतिक्षा, रात्री नेमकं काय घडलं?
इमारतीच्या टेरेसवर कडी लावलेली; एक चप्पल वरती पडलेली; रोहित पवारांच्या पीएच्या मुलीच्या पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतिक्षा, रात्री नेमकं काय घडलं?
बीडमधील मोर्चात मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, वादग्रस्त टीका; गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा, काळकुटेंची फिर्याद
बीडमधील मोर्चात मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, वादग्रस्त टीका; गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा, काळकुटेंची फिर्याद

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रामटेकमध्ये दुर्मिळ नानेटी अल्बिनो सापाचे दर्शन, पाहायला गर्दी; सर्पमित्रांकडून नैसर्गिक अधिवासात रेस्क्यू
रामटेकमध्ये दुर्मिळ नानेटी अल्बिनो सापाचे दर्शन, पाहायला गर्दी; सर्पमित्रांकडून नैसर्गिक अधिवासात रेस्क्यू
Bhuleshwarcha Raja Marathi News: नागरिक म्हणाले, खड्ड्यांमुळे भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; आता अग्निशमन दलाने सांगितलं नेमकं कारण!
नागरिक म्हणाले, खड्ड्यांमुळे भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; आता अग्निशमन दलाने सांगितलं नेमकं कारण!
Baramati News: इमारतीच्या टेरेसवर कडी लावलेली; एक चप्पल वरती पडलेली; रोहित पवारांच्या पीएच्या मुलीच्या पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतिक्षा, रात्री नेमकं काय घडलं?
इमारतीच्या टेरेसवर कडी लावलेली; एक चप्पल वरती पडलेली; रोहित पवारांच्या पीएच्या मुलीच्या पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतिक्षा, रात्री नेमकं काय घडलं?
बीडमधील मोर्चात मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, वादग्रस्त टीका; गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा, काळकुटेंची फिर्याद
बीडमधील मोर्चात मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, वादग्रस्त टीका; गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा, काळकुटेंची फिर्याद
पाच महिन्यांपूर्वी लग्न अन् तीन महिन्यांची गर्भवती, संरक्षण मंत्रालयातील महिला अधिकाऱ्यानं आयुष्य संपवल्याने खळबळ
पाच महिन्यांपूर्वी लग्न अन् तीन महिन्यांची गर्भवती, संरक्षण मंत्रालयातील महिला अधिकाऱ्यानं आयुष्य संपवल्याने खळबळ
Video: 'पेपरफुटीत ज्यांचं नावं आलं ते गुजरातला फरार झालेत, तुम्हाला स्क्रीनशॉटसह पुरावा देतो..' शरयूनं बेधडक राहुल गांधींना MPSCच्या विद्यार्थ्यांच्या व्यथा सांगितल्या
Video: 'पेपरफुटीत ज्यांचं नावं आलं ते गुजरातला फरार झालेत, तुम्हाला स्क्रीनशॉटसह पुरावा देतो..' शरयूनं बेधडक राहुल गांधींना MPSCच्या विद्यार्थ्यांच्या व्यथा सांगितल्या
Rohit Pawar on PAs Girl Death: पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; रोहित पवारांनी घेतली पोलिसांची अन् डॉक्टरांची भेट; घटनेबाबत माहिती देताना म्हणाले....
पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; रोहित पवारांनी घेतली पोलिसांची अन् डॉक्टरांची भेट; घटनेबाबत माहिती देताना म्हणाले....
Kolhapur Crime: चार वर्षाच्या लेकीला अन् दीड वर्षाच्या चिमुरड्या लेकाला संपवून आईनं स्वत:च्या गळ्याला दोरी लावली; कोल्हापुरातील घटनेनं हळहळ
चार वर्षाच्या लेकीला अन् दीड वर्षाच्या चिमुरड्या लेकाला संपवून आईनं स्वत:च्या गळ्याला दोरी लावली; कोल्हापुरातील घटनेनं हळहळ
Embed widget