Nanded News: नांदेड वाघळा महापालिका क्षेत्रात नागरी सुविधांच्या अभावामुळे शहरातील अनेक नागरी वस्त्यांना डंपिंग ग्राऊंडचे रूप आलंय.  शहरातील तेहरानगर, तरोडा नाका,  भावसार चौक परिसरात घाणीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. महापालिका (Nanded Municipal Corporation) असणाऱ्या नांदेड शहरात स्वच्छता नसल्याने रोगराईचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे. दरम्यान महापालिकेने वसवलेल्या तेहरानगरात चहू बाजूनी कचऱ्याचे ढिगारे, जागोजाग गटारी उघडया पाहायला मिळतायत. त्यामुळे स्वच्छता, पाणी, वीज नसल्याकारणाने याठिकाणी वास्तव्यास असणारे दृष्टिहीन, दिव्यांग नागरिकांच्या कुटुंबांचे मात्र हाल होत आहेत.


दृष्टी नसल्याने नाईलाजास्तव या नागरिकांना मुलबाळ कुटुंबासह राहावे लागत आहे. दरम्यान घाणीच्या विळख्यात राहणाऱ्या तेहरानगर वाशीयांनी अनेक वेळा महापालिका प्रशासनाकडे प्राथमिक सुविधांसाठी मागणी केली आहे. मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून याकडे कानाडोळा केला जात आहे. नांदेड शहरातील तेहरानगर परिसरात महापालिकेकडून 10 ते 12 वर्षापूर्वी जवळपास 100 ते 125 कुटुंबासाठी वसाहत उभारण्यात आली होती. मात्र ही वसाहत हस्तांरीत करताना, अपुरे काम असतानाही संकुल हस्तांतरीत करण्यात आली. ज्यात दिव्यांगासाठी 24 निवासस्थान आरक्षीत होते, जी त्यांना देण्यात आली. 


अस्वच्छतेमुळे नागरिक अजारी पडतायत... 


मात्र दिव्यागं कुटुंबाना निवास्थाने हस्तांतरित करताना पाणी, वीज, गटार, रस्ते, स्वच्छता या मूलभूत सुविधा मात्र महापालिका प्रशासनाने दिल्या नाही. त्यामुळे या वस्तीतील नागरिकांची फार दयनीय अवस्था झालीय. घाणीचे साम्राज्य पसरलेल्या या वस्तीत दुर्गंधीने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेय.  अशा परिसरातील अंगणवाडीला लागूनच केर कचऱ्याचा ढीग लावण्यात आलाय. त्यामुळे अंगणवाडीत शिक्षण घेणारे चिमुकले शाळेत येताना या दुर्गंधीमुळे व अस्वच्छतेमुळे अजारी पडत आहेत.


अडीच कोटी रुपये खर्चूनही अस्वच्छ परिसर 


दरम्यान या घाणीमुळे गेल्या वर्षी याच अगणवाडीतील एक बालक डेंग्यूने मृत्यूमुखी पडला. शहरातील स्वच्छतेसाठी महिन्याला जवळपास अडीच कोटी रुपये खर्च करणारी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका 10 ते 12 वर्षे लोटल्यानंतरही या भागातील नागरिकांना मुलभूत सुविधा देण्यासाठी अपयशी ठरलीय. डोळस महापालिका प्रशासन आणि अधिकाऱ्यांकडे हे दृष्टीहीन, अंध दिव्यागं कुटुंबांनी वारंवार तक्रारी करून सुद्धा त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असेल, तर त्यांनी जावे कोणाकडे असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय.


महत्वाच्या बातम्या...


Nanded Crime : अंध आई - वडिलांचा डोळस आधार असणाऱ्या अल्पवयीन चिमुरडीचा काकानेच केला घात, अपहरण करून केला खून


Nanded: नांदेडची सेजल बनली भारतातील पहिली तृतियपंथीय सेतू केंद्र चालक