Nanded News : शेतकऱ्यांना पूर्व सूचना देऊनच पंचनामे करा, अशा सूचना कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे विदर्भ दौरा आटोपून नांदेड जिल्ह्यात प्रवेश करत असताना, त्यांनी हदगाव तालुक्यातील गोजेगाव येथे रात्रीच्या वेळेत शेतीच्या पिकाचे नुकसान झालेल्या पिकाची पाहणी केली आहे. दरम्यान गावामध्ये पीक पंचनामे करण्यास कृषी सहाय्यक, तलाठी यांनी शेतकऱ्यांना पूर्व सूचना देऊन गावातील हनुमान मंदिर, बुद्ध विहार, मस्जिद या ठिकाणी दवंडी देऊन अथवा लाऊडस्पीकर मध्ये सांगून नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करायची आहे असा निरोप गावकऱ्यांना करावा. अशा पद्धतीच्या सूचना देऊन शेतकऱ्यांचे नुकसान झालेल्या पिकाची पंचनामे करण्यात यावेत. असे तोंडी आदेश उपविभागीय अधिकारी, महसूल विभागीय कृषी महासंचालक लातूर आणि जिल्हा कृषी अधीक्षक नांदेड यांना अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत.
कृषीमंत्र्यांनी बांध्यावर बसून खाल्ली भाजी-भाकरी
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार तीन दिवसीय विदर्भ आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान शेतकऱ्यांच्या खऱ्या व्यथा जाणून घेण्यासाठी थेट शेतकऱ्यांच्या शेतातील झोपडीत जाऊन चर्चा केली. यावेळी त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील मोहगाव- सुकळी येथे शेताच्या बंधावर जाऊन शेतकऱ्यांच्या घरातील भाजी- भाकरीचा पाहुणचार घेतला. तसेच त्यांना त्यांची व्यथा जाणून घेऊन त्यांचे सांत्वन करून त्यांना तत्काळ मदत देण्याचे आश्वासनही दिले.
अनेक ठिकाणी दिल्या सरप्राइज व्हिजिट
या दौऱ्या दरम्यान विदर्भ आणि मराठवाडा दौऱ्यावर असलेले कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी काही भागांना अचानक भेटी दिल्या. रस्त्यावर अनेक ठिकाणी सामान्य शेतकऱ्यांनी त्यांना थांबण्याची विनंती केली. शेतकऱ्यांची खरी व्यथा जाणून घेण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली. त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी, महागाव, सुकळी आणि मोहगाव येथे थेट शेतात जाऊन कपाशी, तूर आणि सोयाबीन पिकाच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना तत्काळ योग्य पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. तसेच नुकसान भरपाई तात्काळ देण्याचेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
महत्वाच्या बातम्या :