एक्स्प्लोर
Advertisement
...म्हणून त्यांना शेतकरी नवरा असल्याचा अभिमान वाटतो!
सांगली : गेल्या पंधरा वर्षांपासून पाच एकर शेतीतून सेंद्रीय शेतीद्वारे बेडगच्या नलवडे कुटुंबियांनी लाखो रुपयांचे उत्पन्न घेतलं आहे. सेंद्रीय शेतीत उत्पादन खर्च कमी असल्याने, आणि अधिकचं निव्वळ उत्पन्न शिल्लक राहत आहे. त्यामुळेच शेतकरी नवरा असल्याचा नीता नलवडे यांना अभिमान आहे.
सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर बेडगमध्ये नलवडे कुटुंबियांची पाच एकर शेती आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी या शेतजमीनी जवळच 50 गुंठे जमीन खरेदी करून त्यामध्ये त्यांनी सेंद्रीय भाजीपाला करण्यास सुरवात केली. यामध्ये त्यांनी दीड एकरात चिक्कूची 60 झाडे, रामफळाची 70 झाडे आणि गवती चहाची लागवड केली. तर अर्ध्या एकरात पेरु आणि दोन एकरात 100 सीताफळाची झाडांची, तर अर्ध्या एकरात शाळुची लागवड केली जाते.
गेल्या चार वर्षांपासून शेतीसोबतच स्वतः विक्री सुरु केल्याने त्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. दिवसभर घरचं कुटुंब भाजीपाला काढणी, फळांची काढणी, त्याची प्रतवारी करण्यात मग्न असत. तर त्याची विक्री करण्याचं काम तानाजी नलवडे करतात.
इतर भाजीपाल्याच्या आणि फळांच्या तुलनेत तानाजी यांच्या सेंद्रीय उत्पादनांना दर अधिक मिळत असल्याने, दिवसेंदिवस उत्पन्नही वाढत आहे. खाजगी नोकरीत इतके पैसे आणि समाधान मिळाले नसते, ते या सेंद्रिय शेतीतून मिळत असल्याने नलावडे कुटुंबियही समाधानी आहेत. त्यामुळंच तानाजीच्या पत्नीला आपला नवरा शेतकरी असल्याचा अभिमान आहे.
तानाजी नलावडेंचा गेल्या चार वर्षाचा या सेंद्रिय शेतीचा ताळेबंद पाहिला तर ती आकडेवारी पाहून थक्क व्हायला होतं.
यावर्षी तानाजी यांना सहा ते साडे सहा लाख रुपये नफा अपेक्षित असून, त्यासाठी नलवडे यांचे प्रयत्न सुरु आहेत. पर्यावरणाला हानी न पोहचवता केलेली सेंद्रीय शेती माणसाला वरदान ठरणारीच आहे.
वर्ष |
एकूण उत्पन्न |
खर्च |
निव्वळ नफा |
2013 |
1 लाख 70 हजार रुपये |
70 हजार रुपये |
1 लाख रुपये |
2014 |
3 लाख 5 हजार रुपये |
85 हजार रुपये |
2 लाख 20 हजार रुपये |
2015 |
5 लाख 50 हजार रुपये |
40 हजार रुपये |
4 लाख 30 हजार रुपये |
2016 |
5 लाख 50 हजार रुपये |
50 हजार रुपये |
5 लाख रुपये |
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement