एक्स्प्लोर
नागपुरात चाकूचा धाक दाखवून दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार
दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या बलात्काराच्या घटनेने नागपुरात खळबळ उडाली आहे. नागपूरमधील ओल्ड भंडारा रोडवर हल्दीराम फॅक्टरीजवळ ही घटना घडली आहे.
नागपूर : दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या बलात्काराच्या घटनेने नागपुरात खळबळ उडाली आहे. नागपूरमधील ओल्ड भंडारा रोडवर हल्दीराम फॅक्टरीजवळ ही घटना घडली आहे. दोन्ही पीडित मुलींना अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.
नागपूरच्या मिनिमाता नगरात राहणाऱ्या 7 आणि 4 वर्षांच्या दोन मुलींसोबत बुधवारी संध्याकाळी बलात्कराची घटना घडली. दोन्ही मुली घराजवळच्या मैदानात खेळताना घरापासून काही अंतरावर पोहोचल्या होत्या. संध्याकाळी साडे सातच्या सुमारास एका अज्ञात इसमाने दोन्ही मुलींना घरी सोडतो असे सांगून सोबत नेले. परंतु दोन्ही मुलींना घरी न सोडता तो ओल्ड भंडारा रोडवरील हल्दीराम फॅक्टरीच्या मागे असलेल्या झुडुपांमध्ये घेऊन गेला. तिथे त्या नराधमाने दोन्ही मुलींना चाकूचा धाक दाखवून त्यांच्यावर बलात्कार केले.
बलात्कारानंतर आरोपीने दोन्ही मुलींना तिथेच अंधारात सोडून दिले. काही वेळाने परिसरातील नागरिकांच्या मदतीने दोन्ही मुली त्यांच्या घरी पोहोचल्या. मुलींच्या पालकांनी दोघींना लगेच सरकारी रुग्णालयात दाखल केले. दोघींवर नागपूरच्या मेयो या सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला असून घटनेला 24 तास उलटल्यानंतरही त्या नराधमाला पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
पुणे
राजकारण
राजकारण
Advertisement