एक्स्प्लोर
Advertisement
खुल्या प्रवर्गातल्या गरीब विद्यार्थ्यांना नोकऱ्या द्या, भारत सरकारला धमकी, नागपुरात सिटी बस स्टॉपवरच्या मजकुराने खळबळ
या मजकुरात खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नोकऱ्या दिल्या नाहीत तप परिणामांना सामोरं जावं लागेल अशी धमकी यातून देण्यात आली आहे.
नागपूर : नागपुरातल्या शहर बस सेवेच्या स्टॉपवर आक्षेपार्ह मजकूर असणारे कागद चिकटवण्यात आले आहेत. या मजकूरात भारत सरकार आणि कंपन्यांना उद्देशून धमकी देण्यात आली आहे. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यावरुन मजकूर लिहिण्यात आलं आहे.
या मजकुरात खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नोकऱ्या दिल्या नाहीत तप परिणामांना सामोरं जावं लागेल अशी धमकी यातून देण्यात आली आहे. यमराजाचं बोट बॉम्बच्या रिमोटवर आहे, "धमकी जर गांभीर्यानं घेतली नाही तर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना देवाघरी पोहचवू" असंही या धमकीच्या कागदावर म्हटलं आहे.
बस स्टॉप वर तीन पानी धमकी आज सकाळी काही लोकांना दिसून आली तेव्हा हे प्रकरण समोर आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अमरावती महामार्गावरील कॅम्पसच्या अगदी समोर असलेल्या बस स्टॉपवर देखील हे धमकी पत्र चिटकवण्यात आले आहेत.
State News Bulletin | राज्यभरातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा | बातम्या सुपरफास्ट | ABP Majha
तसेच आमच्याकडे शूटर्स आणि हल्लेखोर आहेत अशा स्वरुपाची धमकी दिली गेली आहे. आज सकाळच्या सुमारास शहरातल्या बस स्टॉपवर हे कागद चिकटवलेले पाहायला मिळालं आहे. हा धमकीचा मजजकूर तीन पानी होता. विद्यापीठ कॅम्पसच्या अगदी प्रवेशद्वार नजीकच्या बस स्टॉपवर हे पत्रक चिटकवण्यात आल्याने कुठली विद्यार्थी संघटना यामागे आहे का याचा तपास करणे आवश्यक आहे. दरम्यान, सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास पोलिसांनी धमकीचा मजकूर असलेले हे कागद काढून नेले असून विविध बस स्टॉप वर कागद हे कोणी चिटकवले याचा तपास सुरू केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
भारत
निवडणूक
Advertisement