एक्स्प्लोर

MSRTC Nagpur : एसटीत तिकीट देताना मशीन होते 'हँग', ऐनवेळी बस वाहकांची सर्कस; अधिकारी कानाडोळा करत असल्याचा आरोप

MSRTC : एसटीतून प्रवास करत असलेल्या प्रवाशांना जेव्हा ते तिकीट देण्याची वेळ असते, त्याच वेळी मशीन हँग होते. त्यामुळे प्रवाशांना तिकीट देण्यास वेळ लागतो. काही वेळा मशीन बंद करुन पुन्हा सुरु करण्याशिवाय अन्य पर्याय नसतो. अशावेळी बसमध्ये वाहकाला चांगलीच 'सर्कस' करावी लागते.

Nagpur News : नवीन वर्षातच एसटी महामंडळाच्या (MSRTC) वाहकांना दिलासा मिळालेला नाही. एसटीतून प्रवास करत असलेल्या प्रवाशांना जेव्हा ते तिकीट देण्याची वेळ असते, त्याच वेळी मशीन हँग होत असते. त्यामुळे प्रवाशांना तिकीट देण्यास वेळ लागतो. काही वेळा मशीन बंद करुन पुन्हा सुरु करण्याशिवाय अन्य पर्याय नसतो. अशावेळी बसमध्ये वाहकाला चांगलीच 'सर्कस' करावी लागते. गेल्या एक वर्षापासून ही समस्या कायम आहे. मात्र या समस्यांकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याचे चित्र आहे. एसटीतील मशीन 'हँग' होत असल्याने नव्या मशीन मागवण्याची मागणी केल्या जात आहे. मात्र कोणतीही सुनावणी होत नसल्याने वाहक संतप्त झाले आहेत. 

मशीन बंद पडण्याची समस्या

एसटी महामंडळाकडून गेल्या अनेक दिवसांपासून ईटीआय (ETI) मशीन खरेदीची चर्चा सुरु असून, त्यात नागपूरसाठी 200 मशीन खरेदी करण्याचे बोलले जात आहे, मात्र अद्यापही या एकही मशीन उपलब्ध झालेले नाही. एसटीचे संबंधित अधिकारी याप्रकरणी गंभीर नसल्याचे लक्षात येते. मशीन बंद पडण्याची समस्या तितकीशी गंभीर नसल्याचे उत्तर महामंडळाकडून दिले जाते. नियमितपणे देखभालीच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्यात येईल, असे सांगितले जात आहे. मात्र त्यानंतरही समस्या कायम आहे. 

क्वॉलिटीच्या मशीन हव्यात

कोणत्याही समस्येबाबत अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्यावर ते गांभीर्याने न घेता कानाडोळा करत असल्याचे बस वाहकांचे मत आहे. या प्रकरणी एसटीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. महामंडळाच्या मुख्यालयातून चांगल्या मशीनचा पुरवठा झाल्यास हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो. सर्वच डेपोमध्ये दर्जेदार उत्तम क्वॉलिटीच्या मशीन उपलब्ध करुन देणे आवश्यक झाले आहे. नागपूरसह काही डेपोत मशीन पोहोचलेल्या नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी तिकीट फाडून द्यावी लागत आहे.

चार्जिंगनंतर कमी वेळात बंद 

गतवर्षी ईटीआय (ETI) मशीनच्या बॅटरीमध्ये समस्या निर्माण झाली होती. एसटी कंडक्टरने दिलेल्या माहितीनुसार मशीन पूर्णपणे चार्ज केल्यानंतरही ते एक-दोन तास चालत नाही. ही समस्या सोडवण्यासाठी त्यांनी बॅटरी बदलून मशीन चालवण्याचा प्रयत्न केला. यानंतर एसटी महामंडळानेही काही मशीनच्या बॅटऱ्या बदलल्या. मात्र त्याचा फारसा फायदा झाला नाही. आता मशीन हँग झाल्यामुळे तिकीट अडकून पडल्याने प्रवाशांना वेळेवर तिकीट वितरित होत नाही. त्यामुळे ही समस्या कायमची सोडवावी अशी मागणी वाहकांनी केली आहे.

ही बातमी देखील वाचा...

आमदारकीसाठी 27 शिक्षकांची तयारी; महाविकास आघाडीमधील ट्विस्टची चर्चा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ujjwal Nikam Loksabha Elections :  ठाकरेंच्या अंगणात महायुतीकडून  करेक्ट कार्यक्रम! निकमांना उमेदवारी?
Ujjwal Nikam Loksabha Elections : ठाकरेंच्या अंगणात महायुतीकडून करेक्ट कार्यक्रम! निकमांना उमेदवारी?
Salman Khan House Firing :   सलमान खान घरावरील गोळीबार प्रकरणात आता एनआयएची एन्ट्री; दोन्ही आरोपींची केली चौकशी
सलमान खान घरावरील गोळीबार प्रकरणात आता एनआयएची एन्ट्री; दोन्ही आरोपींची केली चौकशी
मूलबाळ होत नाही, तुझ्या अंगात तृतीयापंथीयाचा आत्मा; महिलेच्या अंगावर मारले खिळे; संभाजीनगरमधील संतापजनक प्रकार
मूलबाळ होत नाही, तुझ्या अंगात तृतीयापंथीयाचा आत्मा; महिलेच्या अंगावर मारले खिळे; संभाजीनगरमधील संतापजनक प्रकार
IPL 2024: Kavya Maran: हैदराबादची वाईट अवस्था पाहून काहीतरी बडबडली; काव्या मारनची रिॲक्शन व्हायरल, पाहा Video
हैदराबादची वाईट अवस्था पाहून काहीतरी बडबडली; काव्या मारनची रिॲक्शन व्हायरल, पाहा Video
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Mahadev Jankar Lok Sabha 2024 Phase 2 : ज्यांनी मला बाहेरचं ठरवलं त्यांना जनता आज उत्तर देईलRamdas Tadas Wardha Lok Sabha 2024 Phase 2 : मतदानानंतर रामदास तडस यांंचं कुटुंब 'माझा'वरBuldana Lok Sabha Election Voting : बुलढाण्यात रविकांत तुपकरांनी बजावला मतदानाचा हक्कYavatmal Lok Sabha 2024 Voting : यवतमाळमध्ये महायुतीचाच विजय होईल : Indranil Naik

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ujjwal Nikam Loksabha Elections :  ठाकरेंच्या अंगणात महायुतीकडून  करेक्ट कार्यक्रम! निकमांना उमेदवारी?
Ujjwal Nikam Loksabha Elections : ठाकरेंच्या अंगणात महायुतीकडून करेक्ट कार्यक्रम! निकमांना उमेदवारी?
Salman Khan House Firing :   सलमान खान घरावरील गोळीबार प्रकरणात आता एनआयएची एन्ट्री; दोन्ही आरोपींची केली चौकशी
सलमान खान घरावरील गोळीबार प्रकरणात आता एनआयएची एन्ट्री; दोन्ही आरोपींची केली चौकशी
मूलबाळ होत नाही, तुझ्या अंगात तृतीयापंथीयाचा आत्मा; महिलेच्या अंगावर मारले खिळे; संभाजीनगरमधील संतापजनक प्रकार
मूलबाळ होत नाही, तुझ्या अंगात तृतीयापंथीयाचा आत्मा; महिलेच्या अंगावर मारले खिळे; संभाजीनगरमधील संतापजनक प्रकार
IPL 2024: Kavya Maran: हैदराबादची वाईट अवस्था पाहून काहीतरी बडबडली; काव्या मारनची रिॲक्शन व्हायरल, पाहा Video
हैदराबादची वाईट अवस्था पाहून काहीतरी बडबडली; काव्या मारनची रिॲक्शन व्हायरल, पाहा Video
Maharashtra Rain: महाराष्ट्रातील मतदानावर अवकाळीचं सावट, बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी पावसाची हजेरी
महाराष्ट्रातील मतदानावर अवकाळीचं सावट, बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी पावसाची हजेरी
लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात आज देशातील 88 मतदारसंघात मतदान,  महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघाकडे विशेष लक्ष
लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात आज देशातील 88 मतदारसंघात मतदान, महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघाकडे विशेष लक्ष
ICC T20 World Cup 2024: हरभजन सिंगने टी-20 विश्वचषकासाठी निवडला संघ; दोन बड्या खेळाडूंना डच्चू, पाहा 15 जणांची टीम
हरभजन सिंगने टी-20 विश्वचषकासाठी निवडला संघ; दोन बड्या खेळाडूंना डच्चू, पाहा 15 जणांची टीम
Maharashtra Weather : मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट, पुढील दोन दिवस यलो अलर्ट; या भागात अवकाळी पावसाचं संकट कायम
मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट, पुढील दोन दिवस यलो अलर्ट; या भागात अवकाळी पावसाचं संकट कायम
Embed widget