एक्स्प्लोर

बंजारा समाजालाही धनगर समाजाच्या सवलती लागू करा, राज्यमंत्री मुख्यमंत्र्यांना भेटणार

बंजारा समाज देशात 15 करोड तर राज्यात 1 कोटींपेक्षा जास्त आहे. या समाजाची स्थिती अत्यंत वाईट आहे. आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक दृष्टीने समाज मागे आहे. म्हणून त्वरित बंजारा समाजाला देखील धनगर समाजाच्या सर्व सवलती लागू कराव्या यासाठी मी लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांना भेटायची वेळ मागितली आहे, असे ते म्हणाले.

नागपूर :  एकीकडे धनगर समाजाला सवलती दिल्या असतानाच दुसरीकडे बंजारा समाज अस्वस्थ झाला आहे. बंजारा समाजालाही धनगर समाजाच्या सवलती लागू करण्याची मागणी राज्यमंत्री संजय राठोड यांनी केली आहे. धनगर समाजाला दिलेल्या आरक्षणानंतर राज्यमंत्री नाराज झाले असून धनगर समाजाला दिलेल्या सवलती आणि अनुसूचित जमातीचे आरक्षण याच बंजारा समाजाच्याही मागण्या होत्या, असे त्यांनी म्हटले आहे. धनगर समाजाला सवलती दिल्या असतानाच दुसरीकडे बंजारा समाज अस्वस्थ एबीपी माझाशी बोलताना राठोड म्हणाले की, कालपासून बंजारा समाज खूप अस्वस्थ आहे. धनगर समाजाला ज्या सवलती दिल्या आहेत, त्याच सवलती आणि अनुसूचित जमातीचे आरक्षण आम्ही अनेक दिवसांपासून मागत होतो. मुख्यमंत्र्यांनी शिफारस करुन केंद्राला सांगितले. मात्र अजून काही झालेले नाही. आता त्वरित बंजारा समाजाला देखील धनगर समाजाच्या सर्व सवलती लागू कराव्या, असे ते म्हणाले. यासाठी मी लवकरात लवकर  मुख्यमंत्र्यांना भेटायची वेळ मागितली आहे, असे ते म्हणाले. पोहरादेवी येथे बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाने देखील ही मागणी केली होती. बंजारा समाज देशात 15 करोड तर राज्यात 1 कोटींपेक्षा जास्त आहे. या समाजाची स्थिती अत्यंत वाईट आहे. आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक दृष्टीने समाज मागे आहे.  म्हणून त्वरित बंजारा समाजाला देखील धनगर समाजाच्या सर्व सवलती लागू कराव्या यासाठी मी लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांना भेटायची वेळ मागितली आहे, असे ते म्हणाले. याबाबत मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशीही बोललो आहे.  माझी भूमिका सांगितली आहे. आता माझी भूमिका मुख्यमंत्र्यांकडे मांडणार आहे, असे ते म्हणाले. धनगर आरक्षणाबाबात राज्य सरकारने महत्वाचे निर्णय धनगर आरक्षणाबाबातही राज्य सरकारने महत्वाचे निर्णय घेतले आहेत. टीसचा अहवालानंतर आता पुढच्या कारवाई करण्याकरता अहवाल महाधिवक्त्यांकडे पाठवला जाणार आहे. तसंच उच्च न्यायालयातही तात्काळ अॅफिडेव्हीट दाखल करण्यात येणार आहे. या प्रक्रियेला काही दिवस लागणार असल्यानं तोपर्यंत आदिवासी समाजाला लागू असलेल्या सर्व योजना आता धनगर समाजाला लागू करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.   धनगर समाजाला त्यांच्या मागणीप्रमाणे एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळेपर्यंत आदिवासींप्रमाणे सवलती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. धनगर आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीनं हा निर्णय घेतलाय. दरम्यान धनगर आरक्षणाचा टीसचा अहवाल राज्याच्या महाअधिवक्त्यांकडे पाठवण्यात येणार आहे. निवणडुकांच्या आधी धनगरांना एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी जोर धरू लागल्यानं सराकरी पातळीवरही हालचालींना वेग आलाय असं म्हणावं लागेल.

महत्त्वाच्या बातम्या

AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
Mumbai Rain news: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
Embed widget