एक्स्प्लोर

विरोधकांकडून देशात दंगली घडवण्याचा डाव : नितीन गडकरी

निवडणूक आली की त्यांना बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज यांची बरोबर आठवण येते. विरोधकांचे राजकारण भयाभोवतीच फिरते आहे. खोट्या गोष्टी समोर करुन अपप्रचार करण्यात येत आहे. दलित, मुस्लिम, वंचितांच्या मनामध्ये भीती निर्माण करण्यात येत आहे, असा आरोप गडकरी यांनी केला.

नागपूर : विरोधकांकडून देशात दंगली घडवण्याचा डाव असल्याचा घणाघाती आरोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. नागपुरात आज भाजपचा विजय संकल्प मेळावा पार पडला. यावेळी बोलताना गडकरी यांनी काँग्रेसवर चांगलंच तोंडसुख घेतलं. इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी आणि आता राहुल गांधी गरीबी हटावचा नारा देत आहेत. मात्र, गरीबी हटवण्याचं काम मोदीच करतील असा दावाही त्यांनी केला. यावेळी  केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. गरिबी हटाओच्या नावाखाली कॉंग्रेसच्या नेत्यांनी स्वत:चीच गरिबी हटविली. मात्र निवडणूक आली की त्यांना बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज यांची बरोबर आठवण येते. विरोधकांचे राजकारण भयाभोवतीच फिरते आहे. खोट्या गोष्टी समोर करुन अपप्रचार करण्यात येत आहे. दलित, मुस्लिम, वंचितांच्या मनामध्ये भीती निर्माण करण्यात येत आहे, असा आरोप गडकरी यांनी केला. काँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती : मुख्यमंत्री फडणवीस भाजपने अनुसूचित जातीसाठी मोठे काम केले आहे. काँग्रेसने फक्त त्यांचा ‘व्होटबँक’ म्हणून वापर केला आहे. काँग्रेसचा इंदू मिलच्या जागेवर डोळा होता. त्यामुळेच केंद्रात व राज्यात काँग्रेसचे सरकार असतानाही स्मारकासाठी इंदू मिलची जागा मिळू शकली नाही, असा घणाघाती आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला. भाजपा सरकारमुळे इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक होत असून 2020 ला हे स्मारक पूर्ण होईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.  भाजपाचे सरकार सत्तेवर येताच स्मारकाला जागा तर मिळालीच शिवाय मोठ्या प्रमाणात निधीही मिळाला. काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्या आई-बापांचे स्मारक उभा केले. पण त्यांनी बाबासाहेबांच्या स्मारकासाठी जागा दिली नाही. काँग्रेसने अनूसूचित जातीचा फक्त वापरच केला, असा आरोप त्यांनी केला. मोदींमुळे बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक पूर्ण होत असल्याचे ते म्हणाले. इंदू मिल प्रश्नी पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर त्यांनी वस्त्रोद्योग मंत्र्यांनी तीन दिवसांत जागा देण्याचे आदेश दिले. मोठ्या प्रमाणात निधीही दिला. 2020 पर्यंत इंदू मिल येथे बाबासाहेबांचे भव्य स्मारक उभे राहील.  ज्यावेळी बाबासाहेबांच्या स्मारकासाठी इंदू मिलच्या जागेची मागणी करण्यात आली. त्यावेळी केंद्रात व राज्यात काँग्रेसचे सरकार होते. पण त्यांनी हा प्रश्न मार्गी लावलाच नाही. त्यांची या जागेवर नजर होती. काँग्रेसच्या नेत्यांनी स्वत:च्या आई-बापांची स्मारके उभा केली. त्यांना अनुसूचित जातीचा फक्त मतांसाठीच वापर केला, असेही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Nagpur : नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची मोर्चेबांधणी; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या बैठकांचा झंझावात
नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची मोर्चेबांधणी; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या बैठकांचा झंझावात
Maharashtra Rain: मुंबईसह पश्चिम उपनगरात पुन्हा पावसाच्या सरी; तर विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड; राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार?
मुंबईसह पश्चिम उपनगरात पुन्हा पावसाच्या सरी, पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी; तर विदर्भात गेल्या 12 दिवसांपासून पावसाचा खंड; राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार?
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Embed widget