एक्स्प्लोर

बाळासाहेब हयात असते, तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेच नसते : नारायण राणे

भाजपचे राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

नागपूर : मुख्यमंत्री होण्यासाठीच उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला. सोबतच बाळासाहेब हयात असते तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेच नसते, अशा शब्दात राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडलं. नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषद राणे बोलत होते. ठाकरे सरकारच्या पहिल्याच हिवाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. अधिवेशन सुरु झाल्यापासून रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. सभागृहात सत्ताधारी आणि विरोधीपक्ष यांच्यात रोज कलगीतुरा रंगत असल्याचे पाहायला मिळत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. राज्यपालांच्या अभिभाषणावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरेंनी केलेल्या भाषणावरही नारायण राणेंनी टीका केलीय. तोडपाणीसाठी नव्या सरकारकडून प्रकल्पांना स्थगिती देण्यात येत असल्याचं ते म्हणाले. तर, उद्धव ठाकरे मुख्यंमंत्री झालेच नसते मुख्यमंत्री होण्यासाठीच उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी आघाडी केल्याचा घणाघाती आरोप नारायण राणे यांनी केला. सोबतच बाळासाहेब हयात असते तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेच नसते, असेही ते म्हणाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाताना स्वतःच्या पक्षाची विचारधाराही त्यांना सांभाळता आली नसल्याची आठवणही राणेंनी ठाकरे यांनी करुन दिली. राज्याला अनुभवी मुख्यमंत्री हवा - राज्याला अनुभवी मुख्यमंत्र्याची गरज असल्याचे सांगत ज्याला राज्याचे खरे प्रश्न माहित आहे, ज्याच्यात ते प्रश्न सोडवण्याची धमक आहे, असा मुख्यमंत्री हवा. तरच राज्याची प्रगती होईल. अन्यथा महाराष्ट्राची अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही, असंही राणे म्हणाले. दरम्यान, नागपूरमधील विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन पहिल्या दिवासापासून शेतकरी कर्जमाफी, सावरकर तसंच सामनाच्या मुद्द्यावरुन गाजत आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. मात्र, आजच्या कामकाजाची सुरुवात होण्यापूर्वी सर्वपक्षीय आमदार फोटोसेशनसाठी एकत्र आले. पहिल्यांदाच विधानसभेत पोहोचलेले, ज्येष्ठ आमदार फोटोसेशनसाठी एकत्र जमले. परंतु या फोटोसाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मात्र कुठेही दिसले नाहीत. त्यामुळे काही काळ देवेंद्र फडणवीसांच्या गैरहजेरीबाबत चर्चा झाल्याचंही पाहायला मिळालं. हेही वाचा - अजित पवार आमचे होणारे उपमुख्यमंत्री : संजय राऊत Narayan Rane Pc | बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते : नारायण राणे | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Crime: खिशातून बळजबरीने 8 हजार अन् मोबाईल हिसकावले, नियमबाह्य पद्धतीने पाच तरुणांना बेदम मारहाण; नागपुरात गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप
खिशातून बळजबरीने 8 हजार अन् मोबाईल हिसकावले, नियमबाह्य पद्धतीने पाच तरुणांना बेदम मारहाण; नागपुरात गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप
Rain Update: बळीराजाची चिंता वाढवणारी बातमी; पुढील 15 दिवस पाऊस मारणार दडी, नागपूर वेधशाळेनं शेतकऱ्यांना दिला पावसाची वाट न पाहण्याचा सल्ला
बळीराजाची चिंता वाढवणारी बातमी; पुढील 15 दिवस पाऊस मारणार दडी, नागपूर वेधशाळेनं शेतकऱ्यांना दिला पावसाची वाट न पाहण्याचा सल्ला
Ashish Jaiswal: मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन नॉन इश्यूला इश्यू करून अन् कोणाच्यातरी इशारावरून; राज्यमंत्री आशिष जयस्वालांचा गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन नॉन इश्यूला इश्यू करून अन् कोणाच्यातरी इशारावरून; राज्यमंत्री आशिष जयस्वालांचा गंभीर आरोप
Vijay Wadettiwar: सरकारचे इतके मंत्री मान वाकवत मनोज जरांगेंकडे जातात, त्यांची मान कशी दुखत नाही? काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची बोचरी टीका
सरकारचे इतके मंत्री मान वाकवत मनोज जरांगेंकडे जातात, त्यांची मान कशी दुखत नाही? काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची बोचरी टीका

व्हिडीओ

Nashik Tree Cutting : नाशिकमध्ये झाडं तोडणारे हात नेमके कुणाचे? | Special Report ABP Majha
Jarange Chalo Mumbai : जरांगे मुंबई गाठणार की तोडगा निघणार? Special Report
Uniform Civil Code 2029 : 2029 आधी यूसीसी लागू करण्याचा प्रयत्न | Special Report ABP Majha
Disha Salian FIR : सतीश सालियन यांच्या जबाबानंतर जोरदार राजकारण Special Report
Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मनोज जरांगेंची मुंबईकडे कूच; गाडीत बसताच रडले आणि म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: मोबाईल हप्त्यावरून तरुणाचं अपहरण, 5 दिवस डांबून जबरदस्तीने काम करायला लावलं; ब्लड बँकेत नेऊन रक्तही काढलं अन्..., आरोपींकडून क्रूरतेचा कळस
मोबाईल हप्त्यावरून तरुणाचं अपहरण, 5 दिवस डांबून जबरदस्तीने काम करायला लावलं; ब्लड बँकेत नेऊन रक्तही काढलं अन्..., आरोपींकडून क्रूरतेचा कळस
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात एमी फाऊंडेशनची हायकोर्टात याचिका, परवानगी न देण्याची मागणी, उद्या सुनावणी होणार
मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात हायकोर्टात याचिका, परवानगी न देण्याची मागणी, उद्या सुनावणी होणार
Sanjeev Sonawane Latur Crime: संजीव सोनवणेंच्या पत्रातील वाक्याने गूढ वाढवलं, पण पोलिसांना वेगळाच संशय, खात्री पटवण्यासाठी तज्ज्ञांची मदत
संजीव सोनवणेंच्या पत्रातील वाक्याने गूढ वाढवलं, पण पोलिसांना वेगळाच संशय, खात्री पटवण्यासाठी तज्ज्ञांची मदत
Disha Salian : दिशा सालियन प्रकरणात CBI  ने हुकमी एक्का काढला; तपास आता 'गोल्ड मेडलिस्ट' सीमा पाहुजा करणार
दिशा सालियन प्रकरणात CBI  ने हुकमी एक्का काढला; तपास आता 'गोल्ड मेडलिस्ट' सीमा पाहुजा करणार
India Pakistan Navy Ship Collision: भारत आणि पाकिस्तानच्या युद्धनौका अरबी समुद्रात एकमेकांना धडकल्या, दिल्लीत तातडीने मोठ्या हालचाली
भारत आणि पाकिस्तानच्या युद्धनौका अरबी समुद्रात एकमेकांना धडकल्या, दिल्लीत तातडीने मोठ्या हालचाली
Video: यंदाच्या गणेशोत्सवात मुख्यमंत्री फडणवीस अन् एकनाथ शिंदे घरी आले नाहीत; अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
Video: यंदाच्या गणेशोत्सवात मुख्यमंत्री फडणवीस अन् एकनाथ शिंदे घरी आले नाहीत; अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
मनोज जरांगे मोठ्या त्वेषाने मुंबईकडे चाल करून जातात अन् गुलाल उधळत येतात; विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका
मनोज जरांगे मोठ्या त्वेषाने मुंबईकडे चाल करून जातात अन् गुलाल उधळत येतात; विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका
Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या हायकोर्टात जायच्या हालचाली, मुंबई पोलिसांचं महत्त्वाचं पाऊल, 50 जणांची लिस्ट मागवली, नेमकं काय घडलं?
मनोज जरांगेंच्या हायकोर्टात जायच्या हालचाली, मुंबई पोलिसांचं महत्त्वाचं पाऊल, 50 जणांची लिस्ट मागवली, नेमकं काय घडलं?
Embed widget