Mugdha Deshmukh Death Case Pune: लंडनहून गुपचूप पुण्यात आली; पुढे बंद फ्लॅटमध्ये मुग्धा देशमुखचा मृतदेह, चक्रावून सोडणारा धक्कादायक घटनाक्रम
Mugdha Deshmukh Death Case Pune: कुटुंबीयांनी लंडन येथील मैत्रिणीमार्फत चौकशी केली असता मुग्धाने ऑगस्टच्या शेवटीच लंडन सोडल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

Mugdha Deshmukh Death Case Pune: लंडन येथे एमबीएच्या शिक्षणासाठी गेलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील 34 वर्षीय मुग्धा अविनाश देशमुख (Mugdha Deshmukh Death Case) या तरुणीचा मृतदेह पिंपरी-चिंचवडजवळील गहुंजे येथील लोढा बेलमोंडो या आलिशान सोसायटीतील एका बंद फ्लॅटमध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली होती. जुलै 2025 मध्ये लंडनला गेलेली मुग्धा दररोज घरच्यांशी संपर्कात होती, मात्र 23 ऑक्टोबर 2026 रोजी आईशी शेवटचे बोलणे झाल्यानंतर तिचा संपर्क तुटला. कुटुंबीयांनी लंडन येथील मैत्रिणीमार्फत चौकशी केली असता मुग्धाने ऑगस्टच्या शेवटीच लंडन सोडल्याची धक्कादायक माहिती समोर आली. (Pune Crime News)
भारतीय उच्चायुक्तांकडून प्रतिसाद न मिळाल्याने पालकांनी मुग्धाच्या बँक खात्यांचे व्यवहार तपासले, ज्यामध्ये भारतातील झोमॅटो, ब्लिंकिट आणि स्विगीसारख्या ॲप्सवर तिचे क्रेडिट कार्ड वापरले गेल्याचे स्पष्ट झाले. ती भारतातच असल्याचे निश्चित झाल्यावर पालकांनी छत्रपती संभाजीनगरमधील उस्मानपुरा पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार नोंदवली. पोलिसांच्या तांत्रिक तपासात तिचे लोकेशन गहुंजे येथील सोसायटीमध्ये दाखवले, जिथे बनावट चावीने फ्लॅट उघडला असता तिचा मृतदेह सापडला. शिरगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, शवविच्छेदन अहवाल आणि मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणानंतरच तिच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल असं त्यांनी म्हटलं असून शिरगाव पोलीस सर्व शक्यता गृहीत धरून पुढील तपास करत आहेत. (Mugdha Deshmukh Death Case Marathi News)
मुग्धाचं आईशी शेवटचं बोलणं काय अन कधी झालं? (Mugdha Deshmukh Death Case Pune)
नेहमीप्रमाणे 23 ऑक्टोबरच्या रात्री मुग्धा आणि आईचं बोलणं झालं. मी थोडी घाईत आहे, मला जॉब इंटरव्ह्यू द्यायचा आहे. त्यामुळं आत्ता फोन ठेवते, असं सांगून तिने फोन कट केला. पण लेकीशी हे आयुष्यातील शेवटचं बोलणं असेल असा आईने स्वप्नात ही विचार केला नसावा. कारण दुसऱ्या दिवशी मुग्धाने आई, वडिल, भाऊ, बहीण, नातेवाईक अन मित्रांचा कोणाचाचं फोन उचलला नाही. काही वेळाने तर फोन स्विच ऑफ झाला. आई-वडिलांसाठी हा पहिला धक्का होता. मुग्धा लंडनमध्ये कुठं असेल? ती फोन का उचलत नाही? तिचा फोन स्विच ऑफ झाला, मग नेमकं काय झालं असेल? असे प्रश्न आई-वडील अन कुटुंबियांना पडले.
भारतात परतलेली मुग्धा पुण्यात असल्याचं कसं निष्पन्न झालं? (Mugdha Deshmukh Case Pune)
पुढील प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आई-वडिलांनी 27 ऑक्टोबरला छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस स्टेशन गाठलं. मुग्धाचं अपहरण झाल्याचा गुन्हा त्यांनी दाखल केला. आई-वडिलांनी वरील सर्व घटनाक्रम आणि बँकेच्या खात्याची माहिती पोलिसांना दिली. त्याआधारे तांत्रिक तपास करुन मुग्धाचं लोकेशन ट्रेस करण्यात आलं. ती पुण्याच्या लगत असलेल्या गहूंजे येथील उच्चभ्रू लोढा सोसायटीत असल्याची खात्री पटली. आई-वडिलांनी घेऊन छत्रपती संभाजीनगरचे पोलिस पुण्यात दाखल झाले.
बंद फ्लॅट उघडला अन आई-वडिलांच्या पायाखालची वाळू सरकली- (Mugdha Deshmukh Death Case Pune)
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील शिरगाव पोलिसांना याबाबत कळवलं. मग त्याचं रात्री अकराच्या सुमारास पोलीस आई-वाडीलांसह लोढा सोसायटीत पोहचले. फ्लॅट आतून लॉक होता, डुप्लिकेट चावी बनवण्यासाठी की-मेकरला बोलवण्यात आलं. त्याने चावी बनवली, फ्लॅटचं दार उघडलं अन आता प्रवेश करताच दुर्गंधीचा वास आला, पुढं येऊन पाहिलं तर बेडवर एका अंगावर कुजलेल्या अवस्थेत लेकीचा मृतदेह पडला होता. हे पाहून आई-वडिलांच्या पायाखालची वाळूचं सरकली. आई-वडिलांसाठी चौथा धक्का सर्वात मोठा होता. जुलै 2025मध्ये लंडनला गेलेल्या लेकीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह पाहण्याची वेळ आपल्यावर येईल, असा स्वप्नात ही या आई-वडिलांनी मुळीच विचार केला नसेल. नेमकं काय घडतंय? मुग्धा सोबत नेमकं काय घडलंय? तिचा मृतदेह या फ्लॅटमध्ये कसा पोहचला? ती भारतात असून तिने आपल्याला का कळू दिलं नसेल? तसं तर आधीच्या अन अलीकडच्या तिच्या वागण्यात विसंगती दिसत होतीचं, पण असं काही घडतंय याची पुसटशी कल्पना ही आई-वडिलांना नव्हती. सगळं काही संपलं होतं. अनेक प्रश्नांचं काहूर मनात घर करुन होतं, त्याची उत्तरं लेकिकडे होती पण आता हे सर्व प्रश्न कायमचे अनुत्तरित राहिलेत. ऑगस्टमध्ये लंडन सोडलेली मुग्धाने हा फ्लॅट एप्रिल 2026मध्ये भाड्याने घेतला, तसं ऍग्रिमेंट ही फ्लॅटच्या मालकाकडून प्राप्त झालं. पण ती इथं एकटीच राहायची, सोसायटीत बाहेरच्या व्यक्तीला सहसा प्रवेश मिळणं कठीणचं आहे. सुरक्षा रक्षक आणि शेजारच्यांकडे चौकशी केली असता तिच्याकडे कोणी येत होतं? किंवा तिच्या फोन हिस्ट्रीमधून ती फार कोणाच्या संपर्कात होती? असं ही काही आढळलं नाहीये. घराची झडती घेतली तर संशयास्पद ही काही आढळलं नाही. शवविच्छेदन अहवालात ही शरीरावर कोणत्या इजा दिसून आल्या नाहीत. पण खबरदारी म्हणून व्हिसेरा राखून ठेवला आहे. त्यामुळं मुग्धाचा मृत्यू अटॅकमुळं झाला असावा? असा प्राथमिक अंदाज वर्तविला जातोय. या प्रकरणाने देशमुख कुटुंबीय तर हादरून गेलं आहे.
शिक्षणासाठी लंडनला गेलेल्या तरुणीचा पिंपरी-चिंचवडमध्ये संशयास्पद मृत्यू, VIDEO:
संबंधित बातमी:





















