एक्स्प्लोर

लग्नाच्या काही दिवस आधी तरुणीवर बलात्कार, बदनामीच्या भीतीमुळे पीडितेची आत्महत्या

एका बलात्कार पीडितेने नैराश्यात आणि बदनामीच्या भीतीपायी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना नागपुरात घडली आहे. विशेष म्हणजे आत्महत्येपूर्वी पीडितेने लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये तिने मुख्य आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी ही केली आहे.

नागपूर : एका बलात्कार पीडितेने नैराश्यात आणि बदनामीच्या भीतीपायी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना नागपुरात घडली आहे. विशेष म्हणजे आत्महत्येपूर्वी पीडितेने लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये तिने मुख्य आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी ही केली आहे. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याविरोधात अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे. नागपूर जिल्ह्यातील मौदा पोलीस ठाण्याअंतर्गत एका बलात्कार पीडितेने काल संध्याकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दोनच दिवसांपूर्वी या 22 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला होता. बलात्कार झाला तेव्हापासून ती नैराश्यात होती. 15 फेब्रुवारी रोजी तिच्या ओळखीच्या मयूर कुलरकर नावाच्या तरुणाने तिला भेटण्यासाठी मारोडी बस स्टॉपजवळ बोलावले होते. पीडित तरुणी मयूरवर विश्वास ठेऊन त्या ठिकाणी भेटायला गेली. मयूरने त्याच्या आणखी दोन मित्रांच्या मदतीने तरुणीला एका फेब्रिकेशनच्या दुकानाच्या आवारात नेले. तिथे तिला बळजबरीने दारू पाजली. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारानंतर ते नराधम तिला एका नंबरप्लेट नसलेल्या गाडीमधून अज्ञात स्थळी घेऊन जात होते. परंतु नशेत असलेले हे नराधम पुन्हा आपल्यावर बलात्कार करतील या भीतीने गाडीमध्ये त्या तरुणीने आरडाओरडा सुरु केला. त्यामुळे बिथरलेल्या आरोपींनी तिला मध्यरात्री महामार्गावर गाडीतून ढकलले. पहाटे 3 च्या सुमारास महामार्गावर गस्त घालणाऱ्या पोलिसांना तरुणी घाबरलेल्या अवस्थेत रस्त्याने जाताना आढळली. पोलिसांनी तिला पोलीस ठाण्यात नेत विचारपूस केल्यावर हे प्रकरण उघडकीस आले. या घटनेनंतर पोलिसांनी मयूर कुलरकर, राहुल कांबळी आणि श्याम कातोरे अशा तीन आरोपींना अपहरण आणि बलात्काराच्या प्रकरणात अटक केली आहे.. दरम्यान, बलात्काराचे प्रकरण पोलिसांत गेल्यानंतर आणि स्थानिक वर्तमानपत्रात त्यासंदर्भातली बातमी प्रकाशित झाल्यानंतर पीडित तरुणी खूप तणावात होती. येत्या 10 मार्च रोजी त्या तरुणीचे लग्न होणार होते. लग्नाच्या काही दिवस आधी अशी दुर्दैवी घटना घडल्यामुळे आणि प्रकरण पोलिसांपर्यंत गेल्यामुळे पीडितेच्या कुटुंबातील काहींनी तसेच जवळच्या नातेवाईकांनी तिला मित्राला रात्रीच्या वेळी भेटायला का गेली. तसेच असा प्रसंग घडल्यानंतर पोलिसांकडे तक्रारच का दिली यावरुन सुनावले केले. त्यामुळे आधीच तणावात असलेली पीडित तरुणी आणखी नैराश्यात गेली. त्यामुळे तिने रविवारी संध्याकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, पीडितेने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या आईला उद्देशून लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये मुख्य आरोपी मयूरला फाशीसारखी कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. तसेच रात्रीच्या वेळी मित्राला भेटायला गेल्यामुळे आईची माफीसुद्धा मागितली आहे. पोलिसांनी पीडित तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात आत्महत्येचा गुन्हा दाखल करत त्याचाही तपास सुरु केला आहे. परंतु बलात्कारासारख्या दुर्दैवी प्रसंगात पीडितेला समाज आणि नातेवाईकांकडून हिम्मत मिळण्याऐवजी टोमणेच मिळतात आणि त्यामुळे लढण्यासाठी पुढे आलेल्या बलात्कार पीडिता आणखी नैराश्यात जातात ही बाब या प्रकरणामुळे पुन्हा एकदा समोर आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
Maharashtra Drought: दुष्काळाची दाहकता, पाण्याच्या टंचाईमुळे बांधकाम क्षेत्राला मोठी झळ; लाखो कोटींची काम थांबण्याची शक्यता, बळीराजासह मजूरही दुबार संकटात!
दुष्काळाची दाहकता, पाण्याच्या टंचाईमुळे बांधकाम क्षेत्राला मोठी झळ; लाखो कोटींची काम थांबण्याची शक्यता, बळीराजासह मजूरही दुबार संकटात!
Nagpur Crime News : यू-ट्यूबरवर व्हिडीओ पाहिला, औषधी वनस्पतींचे मिश्रण केले; शाळकरी मुलगा तरुणीचा गर्भपात करत बसला; पुढे थरकाप उडवणारं घडलं!
यू-ट्यूबरवर व्हिडीओ पाहिला, औषधी वनस्पतींचे मिश्रण केले; शाळकरी मुलगा तरुणीचा गर्भपात करत बसला; पुढे थरकाप उडवणारं घडलं!
RSS Vijayadashami: संघाच्या विजयादशमी उत्सवात इस्रायलचे महावाणिज्यदूत विशेष निमंत्रित अतिथी, तर अचानक राजीनाम्यानंतर माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखडांचीही संघाच्या मंचावर उपस्थिती
संघाच्या विजयादशमी उत्सवात इस्रायलचे महावाणिज्यदूत विशेष निमंत्रित अतिथी, तर अचानक राजीनाम्यानंतर माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखडांचीही संघाच्या मंचावर उपस्थिती

व्हिडीओ

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolkata Stampede Marathi News: कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Embed widget