नागपूरः आपल्या जोडीदारासोबत 'लिव्ह इन'मध्ये राहत असलेल्या (girl in live in relationship) तरुणीने दोन वर्षांपूर्वी एका मुलीला जन्म दिला. मात्र काही कारणांमध्ये तिच्यासाठी मुलीला सोबत ठेवणे शक्य झाले नाही. म्हणून तिने आपली मुलगी चंद्रपूरच्या एका कुटुंबाला दत्तक दिली. मात्र दत्तक दिल्यापासून तिची आठवण येत असून ती मुलगी परत मिळविण्यासाठी आईने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आणि कोर्टाने आई आणि मुलीचा डीएनए करण्याचे आदेश दिले.


अविवाहित आईने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात 'हेबियस कॉर्पस' (Herbis Corpus Petition) याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी दरम्यान हा आदेश जारी करण्यात आला. या प्रकरणी न्यायमूर्ती देव आणि न्यायमूर्ती अनिल पानसरे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकेनुसार, मुंबईत राहणारी ही महिला तिच्या जोडीदारासोबत लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होती. यादरम्यान तिने डिसेंबर 2019मध्ये एका मुलीला जन्म दिला. मार्च 2020मध्ये मुलगी तीन महिन्यांची असताना आईने तिला चंद्रपूर येथील एका कुटुंबाला दत्तक (a family from chandrapur adopted that girl) दिले. मुलगी परत मिळावी यासाठी या महिलेने चंद्रपूरच्या जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनादेखील निवेदन दिले. या प्रकरणी सुनावणी घेतली. निर्णयानंतर, दोन कुटुंबीयांच्या वादात सापडलेल्या मुलीला एका सामाजिक संस्थेजवळ सांभाळण्यासाठी ठेवण्यात आले. यामुळे, महिलेने उच्च न्यायालयात (Bombay High Court - Nagpur Bench) याचिका दाखल केली.


मुलीला जन्म देणारी आई (बायोलॉजिकल) आहे. त्यामुळे मुलीचा ताबा मलाच मिळावा, असा दावा तिने तिचे वकील अनिल ढवस यांच्यामार्फत केला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महिलेने डीएनए (DNA) चाचणी करण्याची तयारीही दर्शवली. त्यानंतर, उच्च न्यायालयाने संबंधित पोलिस ठाणे, बालकल्याण समिती, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी आणि संबंधित संस्थेला नोटीस बजावून उत्तरे मागितली आहे.


दोन वर्षांपूर्वी केला त्याग


'लिव्ह इन' मध्ये जन्म झाल्यानंतर काही कारणांममुळे मातेने जरी मुलीचा एकाप्रकारे त्याग केला असला तरी तिला चिमुकलीची आठवण येत होती. तिला आता चिमुकलीशिवाय राहणे कठीण होऊ लागले. अशा परिस्थितीत मुलगी परत मिळवण्यासाठी तिने धडपड सुरु केली. मात्र, चंद्रपूरच्या कुटुंबीयांनी मुलगी परत करण्यास नकार दिल्याने महिलेने पोलिसांमध्ये धाव घेतली होती.


इतर महत्त्वाच्या बातम्या


Mission 30 Vidarbha : वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी 'मिशन थर्टी' चळवळ; प्रशांत किशोर यांचे विदर्भवाद्यांशी संवाद


Cockfights in Maharashtra : कोंबड्याच्या झुंजीला खेळाचा दर्जा द्या; शेतकऱ्याची उच्च न्यायालयात जनहित याचिका