नागपूरः देशाच्या राजकारणातील यशस्वी रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishore) आणि त्यांची टीमने वेगळ्या विदर्भ राज्यासाठी (seperate vidarbha state) खास व्यूह रचना आखली आहे. यामध्ये विदर्भातील विविध जिल्ह्यांत जाऊन तेथील आर्थिक भौगोलिक, नैसर्गिक संपदा आणि राजकीय स्थितीचा अभ्यास प्रशांत किशोर यांच्या चमूने केला आहे. त्यांच्या या पाहणी दौऱ्याबाबत केलेले निरीक्षण आदींची माहिती विदर्भातील नेत्यांसोबत ते आज चिटणवीस सेंटर येथे आयोजित कार्यक्रमात सादर करीत आहेत.


वेगळ्या राज्यासाठी विदर्भाची स्थितीबाबत सखोल चर्चा या कार्यक्रमात सुरु असून काही विदर्भवाद्यांनी या बैठकीवर बहिष्कार घातला आहे. तर अनेक विदर्भवादी या बैठकीत सहभागी झाले आहेत. प्रशांत किशोर वेगळ्या विदर्भाच्या चळवळीसाठी काय योगदान देऊ शकतात, ते कोणती रणनीती समोर ठेवतात हे जाणून घेऊ आणि पुढे विदर्भाची चळवळ तरुणांच्या माध्यमातून बळकट करू असे मत ज्येष्ठ विदर्भातील येथे विजय जावंधिया यांनी व्यक्त केले आहे.


दहा लोकसभेच्या जागा म्हणजे छोटे राज्य नव्हे


विदर्भाचे व्हिजन (Vision of Vidarbha) हे छोटे राज्य या संकल्पनेशी जोडलेले नाही. छोट्या राज्याशिवाय इथली भौगोलिक, आर्थिक, सामाजिक परिस्थितीही निगडीत आहे. त्यामुळे जे लोक या व्हिजनला लहान राज्य संबोधत आहेत, ते छोटे राज्य होणार नाही. इथे 10 लोकसभेच्या जागा आहेत म्हणजे हे काही छोटे राज्य नाही. विदर्भाला वारसा आहे, भौगोलिक, सामाजिक, आर्थिक स्थिती आहे, या लढ्यामध्ये माझी केवळ सल्लागाराची भूमिका आहे, हे लोक विदर्भाची चळवळ पुढे नेतील. असेही प्रशांत किशोर म्हणाले आहेत.


11 जिल्ह्यांचा अवहाल तयार


आजच्या बैठकीपूर्वी प्रशांत किशोर यांच्या 20 सदस्यीय टीमने जुलै महिन्यात राज्याचा दौरा करून विदर्भातील 11 जिल्ह्यांचा सविस्तर अहवाल तयार केला होता. विदर्भातील विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक संघटनांचे लोक त्यांच्या टीमसोबत संपर्कात होते. अनेक महिन्यांपासून या लोकांशी झूम कॉलद्वारे प्रशांत किशोर यांचे संभाषण सुरु आहे. नागपुरात होत असलेल्या या बैठकीमध्ये प्रशांत किशोर आज 5 तास या लोकांशी चर्चा करणार असून विदर्भ राज्यासाठी त्यांच्या काय सूचना आहेत, त्यानंतर भविष्याची रणनीती ठरवली जाईल असं प्रशांत किशोर म्हणाले आहेत.


इतर महत्त्वाच्या बातम्या


Cockfights in Maharashtra : कोंबड्याच्या झुंजीला खेळाचा दर्जा द्या; शेतकऱ्याची उच्च न्यायालयात जनहित याचिका


RTMNU : नागपूर विद्यापीठाचे वरातीमागून घोडे; दोन महिन्यांनंतर पाठविला नवा अभ्यासक्रम