एक्स्प्लोर

नागपूर शहरात प्रस्तावित लॉकडाऊनसंदर्भात पालकमंत्र्यांची भूमिका योग्य नाही, ते राजकारण करताहेत : भाजप   

आधीच लॉकडाऊन लावण्यासंदर्भातल्या प्रस्तावावर मतमतांतर असताना आता नागपुरात महापालिकेत सत्ता असलेली भाजप या प्रकारणात बहिष्काराच्या भूमिकेत आल्याने प्रस्तावित लॉकडाऊनचा मुद्दा आणखी तापण्याची शक्यता आहे.

नागपूर : नागपूर शहरात प्रस्तावित लॉकडाऊन संदर्भात पालकमंत्री नितीन राऊत यांची भूमिका योग्य नाही ते राजकारण करत असल्याचा आरोप भाजप शहर अध्यक्ष आणि विधानपरिषद आमदार प्रवीण दटके यांनी केला आहे. पालकमंत्र्यांना लॉकडाऊनच्या निर्णयप्रक्रियेत लोकप्रतिनिधींचा सहभागच नको असल्याचा आरोप भाजपने केला आहे. तसेच प्रस्तावित लॉकडाऊन टाळण्यासंदर्भात नागरिकांनी काय करावे, कसे वागावे या विषयावर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींकडून शहरात केल्या जाणाऱ्या जनजागृतीच्या कामातून बाजूला होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आधीच वादाचा मुद्दा ठरलेला प्रस्तावित लॉकडाऊनचा निर्णय आणखी चिघयलण्याची शक्यता आहे. एबीपी माझाशी बोलताना आमदार प्रवीण दटके यांनी सांगितले की शुक्रवारी महापौरांनी बोलावलेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे भाजप लॉकडाऊन संदर्भात जनजागृती करण्यासाठी राजकीय विचार बाजूला ठेऊन एकवेळ पालकमंत्र्यांच्या नेतृत्वात ही काम करण्यास तयार होती आणि आजही आहे. मात्र, पालकमंत्र्यांनाच लॉकडाऊन लावायचे की नाही याच्या निर्णयप्रक्रियेत लोकप्रतिनिधींचा सहभाग नको आहे. नागपूरात लॉकडाऊन करावे की नाही, त्याची खरोखर गरज आहे की नाही, हे फक्त प्रशासन ठरवेल अशीच नितीन राऊत यांची भूमिका आहे. त्यामुळे आम्ही भाजपचे लोकप्रतिनिधी लॉकडाऊन टाळण्यासंदर्भात आजपासून सुरू होणाऱ्या जनजागृतीच्या कामातून बाजूला होत असल्याचे दटके यांनी सांगितले. विशेष म्हणजे दोन दिवसांच्या जनता कर्फ्युनंतर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी लॉकडाऊन संदर्भात जनजागृती करण्यासाठी फिरतील असे काही दिवसांपूर्वी महापौरांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत ठरले होते. मात्र, कालच पालकमंत्री नितीन राऊत यांनी लॉकडाऊन संदर्भात घेतलेल्या वेगळ्या बैठकीत लॉकडाऊन संदर्भात सर्वकाही प्रशासन ठरवणार असल्याचे सांगितले. एवढेच नाही तर त्याच बैठकीत विभागीय आयुक्त यांच्या नेतृत्वात पाच सदस्यीय प्रशासनिक समिती ही स्थापन करण्यात आली. त्यामुळे भाजपने या मुद्द्यावर जनजागृतीच्या प्रक्रियेतून फारकत घेतल्याचे जाहीर केले आहे. मात्र, भविष्यात नागपूरच्या जनतेवर लॉकडाऊन लादले जाणार असेल तर भाजप आंदोलनात्मक भूमिका स्वीकारेल असे संकेतही दटके यांनी दिले. जनतेवर बळजबरीने लॉकडाऊन थोपू नका, त्याची आवश्यकता खरच आहे का? त्याच्यातून काही साध्य होणार आहे का? याचा ही विचार करा असा सल्ला दटके यांनी दिला. दरम्यान, आधीच लॉकडाऊन लावण्यासंदर्भातल्या प्रस्तावावर मतमतांतर असताना आता नागपुरात महापालिकेत सत्ता असलेली भाजप या प्रकारणात बहिष्काराच्या भूमिकेत आल्याने प्रस्तावित लॉकडाऊनचा मुद्दा आणखी तापण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Ravindra Chavan : सोशल मीडियावर आपण कमी पडतोय, भाजप कार्यकर्त्यांचे रविंद्र चव्हाणांनी टोचले कान
सोशल मीडियावर आपण कमी पडतोय, भाजप कार्यकर्त्यांचे रविंद्र चव्हाणांनी टोचले कान
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Nagpur : नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची मोर्चेबांधणी; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या बैठकांचा झंझावात
नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची मोर्चेबांधणी; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या बैठकांचा झंझावात
Maharashtra Rain: मुंबईसह पश्चिम उपनगरात पुन्हा पावसाच्या सरी; तर विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड; राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार?
मुंबईसह पश्चिम उपनगरात पुन्हा पावसाच्या सरी, पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी; तर विदर्भात गेल्या 12 दिवसांपासून पावसाचा खंड; राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार?

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
Embed widget